ते बारा तास - पुणे गटग चे... :)

Submitted by दक्षिणा on 7 April, 2009 - 02:38

लेखाचं शिर्षक पाहून संभ्रमात पडलात ना? Happy

साधारण मार्चच्या मध्यावर मला एके दिवशी विशाल्_कुलकर्णी ची खरड आली की पल्ली येतेय मार्च एन्ड ला तेव्हा पूण्यात गटग करायचा विचार आहे. मी हो म्हणाले खरी पण मनात धास्ती होती की पल्लीला आपण फार नाही ओळखत... मग कसं काय करायचं?

२८ मार्चला सकाळी विशालचा परत फोन आला की उद्या सगळे पुण्यात भेटतोय म्हणून... २९ चं गटग तसं छोटं पण एकदम इन्ट्रोडक्टरी होतं. विशाल, सायली (सौ. विशाल), अज्ञात, मी, पल्ली, श्रावणी आणि विल्लप थोड्या वेळा करीता भेटलो... बाहेर पडलो ते ठरवून की ४ ला एक गटग करायचं. पल्ली तशी फोनवरून वेळोवेळी बर्‍याच लोकांच्या सम्पर्कात होती. साधारण १/२ तारखेला पल्लीचा फोन की राज्या, लिम्बूला वेळ आहे ४ ला, गटग करूया का? मग जय्यत तयारी सुरू झाली.... ठिकाण तर आम्ही ठरवलं होतं, पल्लीचं घर.... आता कोण कोण येणार याची यादी मग कॉन्टॅक्ट्स सुरू झाले, मेला-मेली, फोना-फोनी... माझ्या फोनला तर उसंतच नव्हती.. मागचा आठवडा हापिसचं काम बाजूला ठेऊन Proud सगळं माबोचंचकाम केलं Wink

शनिवार ४ एप्रिल ला साधारण ६ वाजता पल्लीच्या घरी जमायचं, गप्पा गोष्टी करायच्या ८ च्या पुढे जितके उरतील त्यानी एकत्र जेवायला बाहेर जायचं असं ठरलं.... बेत तर ठरला.. इन्व्हिटेशन चा मेलही पाठवण्यात आला.

गटगचा दिवस उजाडला... मी ४ वाजता येते म्हणून सांगूनही ५ ला पोचले, आणि पोचल्या पोचल्या पल्लीच्या शिव्या खाल्ल्या, माझ्या मागोमाग येऊ घातलेला राज्या माझ्या आधीच तिथे पोहोचला होता...
हळू हळू लोक यायला लागले, माझ्या पाठोपाठ, लिंबू आणि तन्मय (लिम्बूचा मुलगा) आले. इन्व्हिटेशन तर पाठवलंय आता कोण कोण येतंय कोण कोण नाही याचीच धास्ती होती... ऐनवेळी १००% कन्फर्म असलेले काही मेंबर गळाले महत्वाच्या कामामुळे Sad

गेल्यापासून आमच्या तोंडाला आराम नव्हता, नुसती बडबड, खिदळणं सुरूच होतं.... पहील्यांदा भेटलोय असं वाटलंच नाही... अगदी जन्म-जन्मांतरीची ओळख असल्या सारख्या मुली तर एकमेकांना 'ए टवळे' शिवाय हाकसुद्धा मारत नव्हत्या... Proud

मंडळी जमली... मी, पल्ली, राज्या, नयना, लिंबू, तन्मय, अनघावन, कृष्णाजी, सौ वैशाली, (कृष्णाजी ची पत्नी), उमेश कोठीकर, दीपुर्झा, झकास.... सगळे जमले. खाण्याच्या डिशेस मध्ये; आम्ही बाजूला... गप्पा सुरू झाल्या... विनोद... खिदळणे... Lol
गृहकृत्यदक्ष अशा राज्याने सर्वांना त्याच्या हातचा कडक-मस्त्-जबरदस्त चहा पाजला.. Happy

नवा मेंबर आत आला कि त्याला पाणी देण्या अगोदरही आम्ही ओळख परेड करायला लावली. म्हणजे आत बसलेल्या माबोकरांपैकी 'कोण' "कोण" आहे ते ओळखायचं. उमेश कोठीकर कोणालाही ओळखू शकला नाही, नयना; लिंबूला आणि राज्याला ओळखू शकली नाही.. मला तर सर्वांनीच ओळखलं... आणि दीपुर्झाने ही सर्वांना ओळखलं. Happy

खरंतर आदल्या दिवशी मी राज्याला समसवर म्हटलं अरे जर का सगळे मुखदुर्बळ निघाले तर करायला काहीतरी अ‍ॅक्टिव्हीटी हवी की, काय करूया? मग त्याने असेच नेहमीचे अन्ताक्षरी, वन मिनिट असे (टुकार) खेळ सुचवले होते बॅकप म्हणून... पण त्यांची काही गरजच लागली नाही (सुदैवाने)

एका अत्यंत आवडत्या विषयावर बरीच ऊहापोह झाली Proud

८ वाजता; लवकर निघणार्‍या मंडळींकरिता आलू पराठा मागवण्यात आला, त्यांनी खाल्ला आणि आम्ही त्यांच्या तोंडाकडे पाहून घेतलं.. ९ वाजता पराठे खाऊन मंडळी गेली... मग आम्ही उरलेले गप्पा मारत बसलो.... आत्तापर्यंत हलके हलके विषय घेऊन बोललो होतो, मग वयोमानानुसार वास्तववादी विषय निघाले. एक जरूर शिकले की माणूस म्हणून एखाद्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. या गप्पांमध्ये वेळ कसा गेला ते कळलंच नाही... रात्री १२ वाजता आठवण झाली की आपण जेवलेलोच नाही.... ऑर्डर केलेलं जेवण गरम करून जेवायला बसलो.... ते तासभर... जेवणात फार कुणाचं लक्षं च नव्हतं...सगळं लक्ष गप्पांमध्ये. जेवल्यावर काही मंडळी जाऊ लागली पण हायवे वरून जाण्यास इतरांनी विरोधच केला.. मग परत गप्पा रंगल्या.... .... गप्पा मारून सुकलेले घसे पल्लीच्या हातची फॅन्टास्टिक कॉफी पिऊन ओले केले, परत गप्पा पर्व सुरूच.... मग जड वातावरण अजून हलकं होण्यासाठी मी २ गाणी गायली, पल्ली, राज्या तल्लीन होऊन ऐकत होते, आणि झकास माझ्या समोर डोळे मिटून बसला होता, मला वाटलं त्याला झोपंच यायला लागली (माझं गाणं ऐकून) मी गाणं म्हणायचं सोडून जी हसत सुटले.... Lol
दिपुर्झा झकास ला खूप ओरडला आणि म्हणाला तू दक्षिच्या मागं जाऊन बस
(किंवा झोप) समोर काय झोपतोस? Proud

राज्या तर रात्री १२ च्या गाडीने गावाला जाणार होता, तो आत्ता निघतो मग निघतो करत तिथेच... Happy

अखेर चक्क उजाडलं, गप्पा संपल्या नव्हत्या... अख्खे १२ तास सम्पले होते. गटग तात्पुरतं संपलं होतं पण मनात अजून सुरूच होतं... Happy पाय निघत नव्हता तरी सर्वजण निघाले.

इथे, ऑनलाईन भेटता भेटता कुणाची ओळख कशी झाली, कधी झाली कधी वाढली ते समजलंच नाही. पल्लीशी तर मी २९ मार्चच्या गटगच्या आधी अर्धा तास आधी पहील्यांदा बोलले होते. पण भेटल्यावर अज्जिबात असं वाटलं नाही की आपण पहील्यांदाच भेटलोय म्हणून... ज्यांना शक्य होतं, शक्य म्हणण्यापेक्षा ईच्छा होती ते आले त्याबद्दल त्यांचे मानावे तितके आभार कमीच. विशेष करून लिंबू आणि कृष्णाजी... लिम्बू येईल की नाही याची शाश्वती मला स्वत:ला नव्हती, कृष्णाला सुद्धा मी फोन केला तेव्हा तो ऑफिसातून घरी निघाला होता मग इकडे गटग ला येणार होता, उशिरा का होईना पण त्याने सपत्नीक हजेरी लावली... नयना, अनघावन सुद्धा लांब रहात असूनही, आणि जाण्या-येण्याची गैरसोय असूनही वेळात वेळ काढून आल्या.... उमेश कोठिकरच्या घरी सुरेश वाडकर त्याची वाट पहात बसले होते म्हणून तो ९ ला गेला... आम्हा बाकीच्यांना तर काय उद्योग नव्हतेच... Proud

विशेष कौतुक पल्लीच्या मुलीचं श्रावणीचं.... तशी माझ्याशी तिची बर्‍यापैकी ओळख झालेली होती.... पण इतर सर्व लोक अनोळखी असूनही ती आमच्यात खूप मिक्स झाली होती... तिच्या वयाचंच काय पण आसपासचं सुद्धा कोणीही नव्हतं (बुद्धिने आम्ही सर्व तिच्यापेक्षाही त्यावेळी लहान होतो :फिदी:) तरिही ती आमच्यात रमली, मध्येच चित्रं काढून स्वत:चं स्वत:ला रमवत होती... पण तिने एकदाही नाराजीचा सुर काढला नाही, अज्जिब्बात त्रास दिला नाही... आमच्या बरोबर बराच उशिर जागी होती.... पल्लीची मुलगी खरंच खूप शहाणी आहे.

लिम्बूचा मुलगा ही माबोकर नसूनही आमच्यात छान रमला, बाबांचं वेगळंच रूप त्याने त्या दिवशी पाहीलं (असेल) लिम्बूने मात्रं सांगितले की त्याला माबोवर सदस्यत्व घेऊ देणार नाही, अन्यथा तो अभ्यास काही करायचा नाही... Proud

रोजच्या त्याच त्यात रोटिनमधून वेगळं काहीतरी करावं असं आपल्याला सर्वांनाच वाटतं पण नक्की काय हा प्रश्न पडतोच.... हे गटग हे त्यावर एक जालिम, रामबाण औषध होतं म्हणा/उत्तर होतं म्हणा.. काहीही म्हणा. Happy

पण....... गटग करावं, आणि असं वेगळं आयुष्य निदान थोड्या वेळाकरिता का होईना जगावं अशी प्रेरणा देणार्‍या मायबोलीचे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे एकदम जोरात आभार... Happy

****************************************************
दक्षिणा
****************************************************

गुलमोहर: 

अगं घाईघाईने लिहिलेय्.समजून घे.

उमेश, मग जरा'मोकळे'पणानी तरी लिहायचं Proud

दक्स !! १०० प्रतिसाद !!

सहिये ! खूप मजा केलेली दिसतेय हां ...आम्हाला सोडून !

सॉरी नाही येउ शकलो....जुलैमधे नक्की ! Happy

(अजुन काहीच वाचलेले नाही ! निवांत वाचेन....खूप लिहीले आहे राव तुम्ही लोकांनी)

मस्तच लिहिलस रे उमेश! Happy छान!
खर तर तू पुरेसा सापडला नाहीस नाहीतर तुझ्या कार्यक्षेत्रातले "अ आणि अ" अनुभव ऐकायला मिळाले अस्ते तर अजुन मजा आली अस्ती! असो, नेक्स्ट टाईम Happy
बायदिवे, एट पॅक्स अ‍ॅब म्हणजे काय? माझ इन्ग्रजी कच्च हे! Sad

>>एट पॅक्स अ‍ॅब म्हणजे काय? माझ इन्ग्रजी कच्च हे>> Lol लिम्ब्या तुझा काही उपयोग नाही...

----------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/7028 - वृतांत पुणे गटग
----------------------------------------------------

गप्पे इन्द्रा, साला शेवटी ज्या रन्गाचा चष्मा घातला तसेच दिसणार! >> टूक टू़क... मी काय तुझ्या सारखा चश्मिष नाही काय... Proud

एट पॅक्स अ‍ॅब म्हणजे काय? >> उमेशने तुला एक आधुनिक पदवि बहाल केली आहे... आभार मान त्याचे...

दक्षे बघ ग फक्त वृत्तांत लिहिलास तर इतके शॉल्लेट रिप्लाय आले. कथा लिहिलस तर गुलमोहोर दुथडी भरुन वाहीलस वाटतय.. दिवे घेशीलच... Wink
-------------------------
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते..

जल्ला मुलुंडच्या GTGला खुद्द मुलुंडची लोकं टांग देतात... पुणं तर दुर राहिलं... >>>>
इंद्रा, अरे मुलुंडच्या लोकांना निदान माहिती तरी असते मुलुंडला किंवा गेला बाजार ठाण्यात जीटीजी आहे ते... जर पुण्यात जीटीजी आहे हे माहितीच नसेल तर त्याचे काय???
=========================
नूतन वर्षाभिनंदन..

>>>>> मी काय तुझ्या सारखा चश्मिष नाही काय...
अर्थात, नसलासच पाहिजेस, नेक्स्ट जनरेशनचा ना तू??? मग कॉन्टॅक्ट लेन्स वगैरेच वापरले पाहिजे!

दक्षिणा तुमचा १२ तासांचा ग ट ग छान गाजतोय बरं माबोवर Happy किती भरभरुन लिहिताहेत लोकं.
LT, उमेश, छान लिहिलत तुंम्ही. Happy
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
There are two eternities that can really break you down
Yesterday & Tomorrow
One is gone and the other doesn’t exist…So live today..

मग कॉन्टॅक्ट लेन्स वगैरेच वापरले पाहिजे>> माज्याकड हायती...कुनाला हवेत???
-------------------------
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते..

यो, दोन्ही वेगवेगळ्या रंगाच्या देवून टाक Proud
************
निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो |

म्हणजे २ रंगांची माणस दिसतील ना इंद्र्या आणि लिंब्याला?? हो ना रे??
-------------------------
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते..

उमेश, छानच व्रुतान्त!
खरच का मी एवढी अडचण केलेली?
खरे म्हणजे मी आधी उमेश शेजारी बसलोच नव्हतो!
दिवाणवर दिप्पू आणि लिम्बूच्य मध्ये बसलेलो.... पण काय झाले की ८ मजले पायर्‍या चढून आल्या सारखा घमाघूम झालो होतो... ( ह्याचे कारण म्हणजे ६.३० ला मल फोन आला तेंव्हा मी ऑफिसातून बाहेर पडलेलो.. आणि चैत्रात वैशाख वणवा सुरु झाल्याने रानवारा शोधत होतो धावत पळत येऊन कसाबसा रानवारा गाठला आधी मंजिरी शोधण्यातच १५ मिनिटे गेलेली....
तिथल्या एक सूज्ञ रहिवाश्याला विचारले तर म्हणे बिल्डींग नंबर सांगा तो कुणाला माहिती?
मंजिरी कशीबशी सापडली तर ८ वा मजला!! म्हणे मग काय आमची ५ वर नव्हे ८ वर धारण!! परंतु सुदैवाने लिफ्ट सापडली Happy
आणि वर पोहोचे पर्यन्त उपरोक्त अवस्था झालेली मग माझी घाम पुसायची केविलवाणी धडपड पाहून पल्लीने कीव येउन मला उमेश जवळ बसायची सुचना केली आणि खरोखरी तिथून रानवारा जाणवत होता! Happy

आयला लोकं पानच्या पानं भरुन लिहितायेत अन मला माहित नाही? Sad
दक्षे, लिंब्या मस्त रे! मस्त लिहिलस!
दक्षे मी राज्याला ओळखल होतं...खोट लिहु नकोस... पहिल नाव मी राज्याचच घेतलं होतं ! हां मी लिंब्याला ओळखल नाही..... त्याला पहिल्यांदा बघुन मी हादरलेच..! ज्याला आपण लिंबु - टिंबु समजत होतो तो टिंब नाहीतर आख्ख लिंबाच झाड आहे हे मला माहीत नव्हतं! Happy

पण पल्लीला माझी कीव नाही आली हो.

का गं नयने, ते लिंबू मिर्चीची माळच घालून आले होते का? Proud
************
निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो |

नेक्स्ट जनरेशनचा ना तू??? मग कॉन्टॅक्ट लेन्स वगैरेच वापरले पाहिजे! >> लिंब्या कॉन्टॅक्ट लेन्स वापरून कॉन्टॅक वाढतात का रे?

किशोर वृत्तांत आवडला... S&S Happy

नाय गं! ज्या माणसाला आपण ए लिंब्या अन लिंबोण्या काय काय म्हणत होतो तो ११वीतला पोरगा नाही तर.. त्याचा पोरगा ११वीत आहे हे तेव्हा समजलं..! Proud

Happy
************
निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो |

मला तर दक्षीच गडाबडा लोळणं च आठवतय फक्त..! Happy

नयने, तेव्हा तु नव्हतीसंच... Happy
तुम्ही गेल्यावर पण मी एक ऐतिहासिक लोळण घेतलं होतं... Lol
----------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/7028 - वृतांत पुणे गटग
----------------------------------------------------

आयशप्पथ...कितव्या मजल्यावरुन गं ? की जिन्यावरुन?

बरं झालं, पल्लीची फरशी आपोआप साफ झाली असेल नीट पुसली जावून.
************
निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो |

तुम्ही गेल्यावर पण मी एक ऐतिहासिक लोळण घेतलं होतं... >>>>>>>

मला तर बिल्डींग पडते की काय असं भ्या वाटंत हुतं Happy
तसेच पल्लीला विचारणार होतो की जवळपास एखादं हॉस्पिटल आहे का?

************
To get something you never had, you have to do something you never did.

माझ्या बाजुला माझा बॉस आहे..हाकलुनच देईल मला...
-------------------------
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते..

>>>ज्याला आपण लिंबु - टिंबु समजत होतो तो टिंब नाहीतर आख्ख लिंबाच झाड आहे हे मला माहीत नव्हतं
Lol
>>तुम्ही गेल्यावर पण मी एक ऐतिहासिक लोळण घेतलं होतं
>>मला तर बिल्डींग पडते की काय असं भ्या वाटंत हुतं
तरी म्हणल भुकंपाची नोंद कशी झाली परवा Wink

>>दक्षे आता ह्यानंतर लिहिशील तेव्हा डोक्यावर बर्फ ठेवुन लिहत जा...
त्याना फ्रिज मध्ये टाकून मग लिहिलेस तरी चालेल..

---------------------------------------------------------------------------
जब लोग तुम्हारे खिलाफ बोल रहे हो तो समझो तरक्क्की कर रहे हो Wink

बरं झालं, पल्लीची फरशी आपोआप साफ झाली असेल नीट पुसली जावून.>>

अश्विनी, अगं आता पल्ली विचार करत असेल फुटलेल्या फरशा लावायला किती खर्च येइल त्याचा Wink
दक्षे, बघितलंस ना बयो, किती लोकांचं कित्ती कित्ती प्रेम आहे तुझ्यावर ते ! Wink
____________________________________________

कृष्णासारखा सखा पाठीशी असेल तर येणारी संकटेही असामान्यच हवीत.
संकटे जर सामान्य असतील तर तो कृष्णाच्या देवत्वाचा अपमान ठरेल ना !! Happy

मंडळी,

पुढच्या वेळी सगळ्याना नक्की बोलवा. (मला अक्षतांसहीत आमंत्रण हवे:)

२०१० पर्यंत कुणीतरी अक्षता असा आय्.डी. घ्या रे !
************
निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो |

Pages