पाऊस बनून जावं

Submitted by प्रतिक सोमवंशी on 14 June, 2019 - 08:20

पाऊसात भिजताना पाऊस बनून जावं
आपण कितीही कोरडे असलो
तरी पाण्यासारख वहाव

वाहून न्याव्यात कधी कागदाच्या बोटी
बरसण्यासाठी मिळतात नाणीही खोटी
कधी असच छोट्या सुखासाठी झगडावं
पाऊसात भिजताना पाऊस बनून जावं

अंगणी चिखल होतो कधी कधी
पण त्यामुळेच बहरतात पेरलेली दाणी
कधी येतो पूर, कधी वाहून जातात गायी
पण समतोलासाठी कधी अस पण करावं
पाऊसात भिजताना पाऊस बनून जावं

कधीतरी कुणाच्या अंगावर बरसाव
चातकाला कश्याला उगाच तरसवाव
असच कधी वागून पाहावं
पाऊसात भिजताना पाऊस बनून जावं
‌ ©प्रतिक सोमवंशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mstch

छान!

सुंदर....