झडलेले बाबा न पडलेली आई

Submitted by प्रतिक सोमवंशी on 11 June, 2019 - 13:27

हिम्मत नाही माझ्यात
त्याच्या उरात दाटलेल्या
भाबड्या प्रश्नांना उत्तरे द्यायची
मी तर नेहमीच टाळत असतो
पण गणित, भूमितीचे सोडून तो फालतु प्रश्न जास्त विचारतो
हे असंच का? न ते तसच का?
सगळ्या डोक्याची आईबहीण करून सोडतो
आज जरा शांत होता तो , म्हटल आज तरी सुटलो
तेवढ्यात त्याच्या तोंडाच्या बंदुकीतून एक गोळी सुटलीच
कर्म माझ...
“दादा, ते पान कश्याला पडत झाडावरून” -तो
“सोड रे, पडल झडल तरी पानच ते उगेल परत
उगेल रे दुसर, सोड ना बाबा” -मी
मग झडलेले बाबा न पडलेली आई परत का उगवली नाही?-तो
(मी निरुत्तर)
©प्रतिक सोमवंशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग झडलेले बाबा न पडलेली आई परत का उगवली नाही?- >>>> नाही उगवत आईबाबा परत. त्यांची नवी पानं म्हणजे आपण त्यांनी आधीच उगवून ठेवली असतात. नवी येतात, जुनी गळून पडतात ... हाच सृष्टीचा नियम... आदि पासून अनंतापर्यंत valid असणारा. हा नियम आहे म्हणून सृष्टी पुढे चालू आहे. काही गोष्टी very close to heart असल्या तरी कठोर होवून स्वीकारायच्या असतात.

आपण तर मध्यम किंवा जून आहोत. कोवळी पानेही निव्वळ फांद्या फांद्या राहिलेल्या निष्पर्ण झाडाच्या गाठींमधून डोकावत असतात, त्या खोडाच्या आधारे वाढतात व ते झाड पुन्हा बहरते. मग यथावकाश ती पानेही पिकून गळून पडतात नव्या पानांच्या पेशींचं अस्तित्व जागृत ठेवून. त्या नव्या पालवीसाठी झाडासाठी अन्न तयार त्यांनीच करून ठेवलेलं असतं. हे चक्र असंच चालतं.

आपल्याला तर आईबाबा काही काळ तरी मिळाले. कितीतरी पिल्लं जन्मताच सोडून दिलेली असतात. त्यांचं पालनपोषण करणाराही कुणीतरी भेटतोच. तो कुणीतरी समाजाचाच एक अंश असतो. तो त्या पिल्लासाठी आईबाप बनतो Happy