जागरण....

Submitted by अत्रुप्त आत्मा on 11 June, 2019 - 03:23

काल झोपता झोपता, वेळ बाराची आली.
आमच्या बालकानी काल, जरा लै(च) रात केली.

अडीच वाजता पुन्हा,बालकाला आली जाग
त्याला वाटलं,अंथ-ऋण नव्हे..ही तर बाग!

बागडू लागलं,खेळू लागलं,
माझ्या हिच्या अंगावरून,मुक्तपणे लोळू लागलं!

बरच खेळल्यावर मग, त्यालाही पेंग आली.
पण तोपर्यंत आमची ,पहाट लाले लाल झाली.

मेली झोप, मोडून अंगं!
मीच दिली मग, कोंबड्यासारखी बांगं!

अश्या अवस्थेत, उठून आवरायला,
झुलतच मी गेलो, टॉवेल धरायला!

धरला टॉवेल ओ-रडली ही,
मला म्हणते, "गाऊन सोडा...शीSssssss!"

मी म्हटलं, "अर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र तुझा आला का गाऊन???"
ती म्हणाली, "चपाती ऐवजी पोस्टकार्ड बघाल का खाऊन?"

आता माझी झोप, पुरती उडाली.
शिल्लक असलेली, बादलीच्या तळाशी बुडाली.

घेतले चार तांबे, उरकली अंघोळ.
पण मग सुरू झाला, पुढचा खरा घोळ.

अंगात शर्ट का शर्टात आंग?
डोकं अस पिसल जणू प्यायली भांग

अंग ओढतच मग, मी कामाला गेलो.
बी आकारा ऐवजी, बी बारा'त पोहोचलो.

तिथले यजमान, डोळे चोळतच उठले.
मला भटजीला बघून, भसकन फुटले.

आत विचारतात "अगं ...,आज पूजा आहे का गं!????"
आतून आला आवाज,"नाही हो!झाली की मागं!!!"

मग आम्ही झटकन, उघडली डायरी.
बी आकरा वाचलं ,म्हटलं-"चुकलीच पायरी!"

मग आम्ही फ्लॅट नंबर बी आकारात गेलो.
आतली पूजेची तयारी पाहून अंमळ सुखावलो!

तोपर्यंत तिथे बी 12, पेपर घ्यायला आला.
आणि बी 11च्या कानात, कुजबुजायच तेच कुजबुजला! (दुष्ट दुष्ट! )

बी आकरा मग पूजा होईपर्यंत, आमच्याकडे बघून हसत राहिले.
त्यांचे हसणे आम्हाला, काम संपेपर्यंत टोचत राहिले.

निघालो तिथून दक्षिणा घेऊन,म्हटलं बी 11 नामी आहे.
पण मनात विचार आला,आपल्या
नशिबात 'एकंदरच' बी-12 कमी आहे!!!

ठरवलं मनात पुढच्या वेळी, या बी बारा ला 'खायचं!'
पण मनात आला विचार, आपल्याला तेव्हढं कुठून जमायचं?

सोडून दिला नाद मनातून ,म्हटल लवकर घरी जाऊ.
बालक मोठं होईपर्यंत ,दहीभातच खाऊ!

बालक जागरणं संपायची , तेव्हा ती संपू दे!
हे रहाट गाडगं देवा, असच मला ओढू दे!

शेवटी बी आकरा किंवा बी 12 ला, खाल्लं काय?न खाल्लं काय!???
तुझ्या कृपा छत्रा शिवाय, खरी शक्ती यायची नाय!

आमच्याच मनाचा खेळ आहेस तू, हे जसं सत्य आहे..
तसच..,आमचंही 'त्याशिवाय' होत नाही काही,ह्यातही तथ्य आहे!

चला..,गेला थकवा मनाचा,दोन्ही(ही!) डोळे उघडले!
रात्र चालली होती जागरणात,पण आज खरे उजाडले!
=====०=====०=====०=====०=====०=====०
अतृप्त..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आवडली... Happy
बाराची शांती करता आली तर बघा. वैधानिक इशारा आम्ही भटजी नाही . तरी अशा सल्ल्याची हमी घेतली जात नाही. Happy
... .कृपया ह. घ्या.

वाहहह