Submitted by अनन्त्_यात्री on 11 June, 2019 - 01:12
अज्ञाताच्या काठावर
शब्द होताना धूसर
अर्थ निरर्थाचे द्वैत
कल्लोळून झाले शांत
अदृष्टाच्या नजरेला
दिठी भिडविण्या आलो
अज्ञेयाच्या अनुल्लंघ्य
उंबर्याशी थबकलो
अथांगाच्या डोहावर
अनाहताचे तरंग
नश्वराच्या ओठावर
चिरंतनाचे अभंग
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कुठे आहात ?
कुठे आहात ?
मोजके शब्द , मोठा आशय हे तर कवितेचे वैशिष्ट्य...
खूप सुंदर...
खूप सुंदर. मोक्षाच्या अगदी
खूप सुंदर. मोक्षाच्या अगदी जवळ पोहोचल्यावर केवळ आनंद अनुभवायला येतो त्या स्थितीचं वर्णन वाटलं. निर्वैर, निखळ शांत अवस्था.
व्वाह.... क्या बात है...
व्वाह.... क्या बात है... अप्रतिमच...
दत्तात्रयजी, धन्यवाद!शोधत
दत्तात्रयजी, धन्यवाद!
शोधत होतो पुन्हा स्वत:ला
शक्तिराम, शशांकजी
शक्तिराम, शशांकजी प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार!
अप्रतिम.
अप्रतिम.
धन्यवाद, 'सिद्धि'.
धन्यवाद, 'सिद्धि'.
खूप दिवसांनी !
खूप दिवसांनी !
'रम्य वाटा' धुंडाळताना येणारे अनुभव अवर्णनीयच ! आपण सुरेख शब्दबद्ध करता.
काय सुंदर लिहिलय! अप्रतिम!
काय सुंदर लिहिलय! अप्रतिम!
अथांगाच्या डोहावर
अनाहताचे तरंग
नश्वराच्या ओठावर
चिरंतनाचे अभंग>>> आहा हा! भारीच!
फार छान
फार छान
शालीदा, डाॅ. विक्रांत धन्यवाद
शालीदा, डाॅ. विक्रांत धन्यवाद,
खूप छान!!!
खूप छान!!!
स्वतःचा नव्याने शोध घेणं आणि
स्वतःचा नव्याने शोध घेणं आणि स्वत्व सापडल्यावर होणारा आनंद.यामधला प्रवास खुप कठीण..पण प्रवासाच्या शेवटी होणारा आनंदच कायम लक्षात राहतो.
Anand, Manya s,
Anand, Manya s, Rohitkulkarni: Thanks for your comments!
विलक्षण प्रतिभा! खुपच छान!
विलक्षण प्रतिभा! खुपच छान!
वाह.. अप्रतिम
वाह.. अप्रतिम