अज्ञाताच्या काठावर

Submitted by अनन्त्_यात्री on 11 June, 2019 - 01:12

अज्ञाताच्या काठावर
शब्द होताना धूसर
अर्थ निरर्थाचे द्वैत
कल्लोळून झाले शांत

अदृष्टाच्या नजरेला
दिठी भिडविण्या आलो
अज्ञेयाच्या अनुल्लंघ्य
उंबर्‍याशी थबकलो

अथांगाच्या डोहावर
अनाहताचे तरंग
नश्वराच्या ओठावर
चिरंतनाचे अभंग

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कुठे आहात ?
मोजके शब्द , मोठा आशय हे तर कवितेचे वैशिष्ट्य...
खूप सुंदर...

खूप सुंदर. मोक्षाच्या अगदी जवळ पोहोचल्यावर केवळ आनंद अनुभवायला येतो त्या स्थितीचं वर्णन वाटलं. निर्वैर, निखळ शांत अवस्था.

खूप दिवसांनी ! Happy
'रम्य वाटा' धुंडाळताना येणारे अनुभव अवर्णनीयच ! आपण सुरेख शब्दबद्ध करता.

काय सुंदर लिहिलय! अप्रतिम!

अथांगाच्या डोहावर
अनाहताचे तरंग
नश्वराच्या ओठावर
चिरंतनाचे अभंग>>> आहा हा! भारीच!

स्वतःचा नव्याने शोध घेणं आणि स्वत्व सापडल्यावर होणारा आनंद.यामधला प्रवास खुप कठीण..पण प्रवासाच्या शेवटी होणारा आनंदच कायम लक्षात राहतो. Happy

Anand, Manya s, Rohitkulkarni: Thanks for your comments!