२०२४ पंतप्रधान कोण असेल

Submitted by कटप्पा on 8 June, 2019 - 10:31

मित्रानो, २०१९ निवडणुका संपल्या आहेत आणि जनतेने भाजपा ला भरभरून मते दिली आहेत
विरोधी पक्षाकडे चांगले नेतृत्व नसल्यामुळे मोदींचा एकहाती विजय झाला. भाजपा चे काही निर्णय लोकांना पटले नाहीत पण भारतासारख्या देशाचे भविष्य समोरच्या माणसाच्या हातात देणे म्हणजे खूप मोठी चूक ठरली असती हे जाणून लोकांनी कल दाखवला. वाईट आणि आणखी वाईट मधून काय निवडणार?
२०२४ मध्येही भाजपा सत्तेत येईल हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्या वेळी पंतप्रधान कोण असेल?
परत एकदा मोदीच ?
की शाह किंवा गडकरी यांना संधी मिळेल?
की योगी किंवा साध्वी?

सांगा अंदाज।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

येऊन येऊन येणार कोण ? मोदींशिवाय आहेच कोण?

शहांनी काश्मीर प्रश्न सोडवला किंवा अगदी सोडविण्याच्या जवळ आणून ठेवला तर त्यांना उपपंतप्रधानपदाची संधी आहे.

अर्थात रागा ने प्रचार जोरदार करायला पाहिजे.

प्रियांका चोप्रा जोन्स

तिने इच्छा व्यक्त केली आहे, नाव प्रियांका असल्याने चालू शकेल कदाचित Happy

<<< २०२४ मध्येही भाजपा सत्तेत येईल हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. >>>
नाही, आम्हाला माहीत नाही. आयुष्यात कधीही काहीही होऊ शकते, ५ वर्षं तर खूप दूरचा पल्ला आहे.

आयुष्यात कधीही काहीही होऊ शकते, +१११
२०२४ मध्ये देशात फक्त भाजप उरलेला असेल त्यामुळे विरोधकच नाही उरणार तर निवडणूक का आणि कशासाठी !!

विरोधक असतीलच. आणि BJP ला जसं निवडून दिलं तसं bjp ने perform नाही केलं तर जनता bjp ला दूर लोटू शकते.

मला वाटतं NDA ने दणकून perform करावं, जनतेचा विश्वास अजून घट्ट करावा आणि बाकी सारं जनतेवरच सोडून द्यावं. २०२४ वगैरेचं जनताच ठरवेल. गेल्यावेळी निवडून आल्यादिवसापासून पूर्ण ५ वर्ष bjp ला हैराण करायचे, पाय खेचायचे, खच्चीकरण प्रयत्न झालेच होते. ह्या टर्मलाही होतीलच. त्याचा कामावर परिणाम होवू देवू नये. No party should play politics at the cost of citizens.

शक्तीरामपंतप्रधान.
कटप्पा यांना मी कॅबिनेट मंत्री म्हणून माझ्या मंत्रिमंडळात घेईन.

२०२४ पंतप्रधान कोण असेल?>>>> पुढील निवडणूक भाजपा आणि मित्र पक्ष जर चांगली कामगिरी करून जिंकले तर.... कदाचित नितिन गडकरी वा तत्सम विकासाविषयी सजग नेता.

साधारण कामगिरी करून जिंकले तर.... योगी वा तत्सम हिंदुत्ववादी चेहरा.

खराब कामगिरीमुळे जर विरोधी पक्ष जिंकले तर.... सांगता येत नाही.
(सांगता येत नाही...... हीच भारतीय राजकारणातील आजची सर्वात वाईट परिस्थिती आहे. )

वरील प्रतिसादात नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख केला नाही. कारण राजकारण्यांसाठी वयाची अट त्यांना अपेक्षित आहे.

पसंतीक्रम:

१. राहुल शेठ गांधी.
२. गडकरी साहेब.
३. मायावतीजी!

राजकारण्यांसाठी वयाची अट त्यांना अपेक्षित आहे.
>>

आस असतंय होय? नियम बनवणाऱ्यांसाठी थोडीच असतात ... अर्थात हे सगळं भाजप जिंकली तर Wink

२०२४ ला वेळ आहे अजून, त्यापेक्षा क्रिकेट वर्ल्ड कप कोण जिंकेल ते सांगा. पाकिस्तान??

२०२४ ला वेळ आहे अजून, त्यापेक्षा क्रिकेट वर्ल्ड कप कोण जिंकेल ते सांगा. पाकिस्तान??
आस्सं नै ब्वा. नवा धागा काढा त्यासाठी.
रच्याकने माबोवर सट्टा लावावा का? पैशांवर नाही पण जेवण आणि दारू द्यायची.

कोणीच नाहि. कारण निवड्णुकाच नसतील त्यामुळे लोकशाहि नसेल त्यामुळे पंतप्रधान नसेल. मोदी डिक्टेटर असेल .

>>> कोणीच नाहि. कारण निवड्णुकाच नसतील त्यामुळे लोकशाहि नसेल त्यामुळे पंतप्रधान नसेल. मोदी डिक्टेटर असेल . >>>

२०१४ च्या निवडणुकीपूर्वी २०१९ च्या निवडणुकीबद्दल ढोंगी
जातीयवादी असेच बरळत होते व २०२४ च्या निवडणुकीनंतर असेच बरळत असतील.

२०१९ ची निवडनुक ही शेवटची निवड्नुक असेल असे सगळे बोलले होते. जरा वाचत जा बातम्या मोदी पुराण सोडुन.

https://www.indiatoday.in/india/story/prithviraj-chavan-says-2019-polls-...

>>> २०१९ ची निवडनुक ही शेवटची निवड्नुक असेल असे सगळे बोलले होते. जरा वाचत जा बातम्या मोदी पुराण सोडुन. >>>

जळी स्थळी काष्ठी पाषाणी कोणाला मोदी फोबिया झालाय ते दिसतंच आहे. लवकर बरे व्हा.

>>> बातमी दिली मी चव्हाणांची आणी हा एल्जी चा ठोकळा जो बंद पडला आहे तो बंदच आहे >>>

लवकर बरे व्हा. वाटल्यास एखाद्या धनगराकडून किंवा युनानी हकिमाकडून किंवा गजानन विनायक कागलकर कडून उपचार घ्या. शुभेच्छा!

टेप अडकली आहे ती आहेच. अरे त्या एलजी कप्मनीच तरी अपमान करु नको .
काहिहि झाले की जातीपातीवर येणार चड्डी. दुसरे डोक्यात येतच नाहि याच्या, आरक्षणाची थापेबाजी केलीच आहे धनगरांना , आता अपमानहि करायला लागला हा !

Pages