चक्राता - ६ खडांबा, देवबन

Submitted by साक्षी on 5 June, 2019 - 13:36

या आधीचा भाग इथे वाचा.

एकंदर असं लक्षात आलं होतं की सूर्य उगवण्याआधी आणि मावळल्यानंतर तापमान खाली जायचे. रात्री वारा सुटलेला असायचा. त्यात रात्री दिवे गेले. जनरेटरवर गरजेच्या गोष्टी चालु होत्या. रूम्सवर एखादा पॉईंट आणि नाइट लॅम्प इतकच चालु होतं. कॅमेरा कसाबसा चार्ज केला त्यामुळे मोबाइल चार्ज झाला नाही. मोबाइलचा उपयोग पण फोटो काढण्यासाठीच होता. चारही दिवस सोशल मिडियाची आठवण फारच क्वचित आली.

दुसर्या दिवशीही Black Francolin च्या आवाजाने जाग आली. नाष्ता होईपर्यंत अजुन काही नविन काही कालचेच असे पक्षी बघितले. जाताना एक झर्यापाशी गाड्या थांबवल्या. स्वच्छ आणि गोड पाणी भरून घेतलं. या सगळ्या भागात थंडीच्या दिवसात बर्फ असतो तापमान कमी असल्यामुळे एका घळीत वरून घरंगळत आलेला आणि अजुनही साठून राहिलेला थोडा बर्फ आम्हाला मिळाला. हिमालयात येऊन बर्फ बघितला नाही असं आम्हाला आता म्हणायला नको.

जातानाची वाट
IMG_20190430_122948.jpg

इथे एक शेड होती. तिथे सगळे जरावेळ टेकलो.
IMG_20190430_125615.jpg

थोडं अबर चबर खाल्लं. पक्षी बघितले. तिथून परत थोडं अंतर चालत (चढ-उतार च, सरळ चालत जाणं असं फक्त रिसॉर्ट्जवळच्या रस्त्यावरच) आणि तिथल्या एका गेस्ट हाउस च्या आवारात गेलो. तिथे जेवण केलं. तिथे एक मस्त देवबन होतं. उंचावर आल्यामुळे इथे रॅप्टर्स दिसायला लागले होते. Himalayan Vultures दिसली.
Himalayan Vulture3.JPG

येताना एक अफलातून स्पॉट होता. तिथे आपण रॅप्टर्स च्या लेवलला असतो. कावळे पण गिधाडांच्या बरोबरीने उडत असतात आणि आश्चर्य म्हणजे त्यांना त्रास पण देत असतात. बरोबरीने उडण्याचे कारण गिधाडं आपलं खाद्य शोधतात तेव्हा त्यांच्याबरोबर कावळ्यांनाही खाउ मिळतोच. इथे पक्षी आणि बरोबर इतर फोटोग्राफी झाली.

ह्याला लायकेन म्हणतात. हे उत्तम हवामान असल्याचे दर्शवते. साधारण शेवाळ्यासारखे दिसते, पण रंग लाल्, पिवळा, केशरी असे असतात.
liken.jpg

आम्ही बसलो होतो तो स्पॉट
Kada.JPG

तिथे मागे असा कडा होता
IMG_20190430_164403.jpg

लेक आणि एक मित्र गाडीवर चढून बसले.
IMG_1051.JPG

इथे येत असताना रस्त्यवर एका झर्‍यापाशी गाय मरून पसलेली बघितली होती. पण तेंव्हा क्लिक झाले नाही. मेलेला प्राणी म्हणजे गिधाडं नक्की येणार. परत येत असताना घाईघाईत तिथे आलो. थोडं शोधल्यावर जवळच्या एका उंच झाड्याच्या शेंड्यावर गिधाड दिसलंही! पण आमचा २५ -२६ जणांचा घोळका बघून खाली आलं नाही. आम्ही तिथून गेल्यावर नक्की आलं असणार!

नेहमीसारखे ७:३०-८ ला परत आलो. ठराविक लोक दिवसभरात दिसलेल्या पक्षांची लिस्ट करायला जेवणाच्या आधी भेटली. जेवणानंतर गप्पा मारत बसायचा बेत होता. पण परत पाऊस आला अणि वीज गेली. पाऊस असल्याने आवारात पण फिरता येइना. त्यामुळे आज पण सगळे वेळेत झोपायला गेले. पाऊस आणि लाईट नाही या कॉम्बीमुळे ४ ही दिवस सगळे वेळेत आपापल्या रूम्सवर गेले.

या नंतरचा भाग इथे वाचा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users