चक्राता - ४ हिमालयन पॅरेडाइज परिसर

Submitted by साक्षी on 5 June, 2019 - 12:49

या आधीचा भाग इथे वाचा.

दगडी बांधकाम केलेल्या आणि लाकडाचा भरपूर वापर केलेल्या खोल्या मस्त उबदार होत्या. पांघरूण १.५-२ इंच जाडीचं आणि चांगलं जड होतं. ४:३० चा गजर बंद केला पण पांघरूणातून बाहेर येऊ वाटेना. परत झोप लागणार असं वाटत होतं तोवर अंदाजे ५ वाजता पक्षांचे आवाज येऊ लागले होते. प्रोमिनंट येत होते ते आवाज होते Black Francolin आणि Great Barbet यांचे! किका म्हणतात Black Francolin चा कॉल 'चीक पान बिडी सिगरेट' असं म्हणल्यासारखा असतो हे अगदी तंतोतंत पटलं. न रहावून बाहेर आलोच.

रिसॉर्ट असं होतं
Risort1.JPG

२-३ रूम्सना मिळून कॉमन बाल्कनी होती आणि खाली ओपन स्पेस वर बसायला जागा होती. समोर सगळ्या बाजूंनी डोंगर!
हे असं
IMG_20190430_054743.jpgIMG_20190430_054755.jpg

अजुन एक व्ह्यू. ह्या समोर दिसणार्‍या खिडक्या आमच्या रूमच्या!
Risort2.JPG

अजुन पुरतं उजाडलं नाहिये म्हणेपर्यंत ५:३० पर्यंत पूर्ण उजाडलं. आम्ही कॅमेरा, दुर्बिणी घेऊन खाली पळालो. समोरच्या डोंगरावर Black Francolin दुर्बिणीतून दिसत होता. Russet Sparrow, Himalayan Bulbul, Black Bulbul रिसॉर्ट्च्या आवारतच नाचत होते. खालच्या बाजूच्या झाडांवर Blue Whistling Thrush गात होते. इथला कावळा काव काव न म्हणता आव आव म्हणतो. haahaa2

५:३० पासून ७-७:३० पर्यंत आम्ही समोरच्या डोंगर दर्‍यातच भरपूर पक्षी बघितले. ८:१५ पर्यंत आवरून ब्रेकफास्ट्ला आणि ९ वाजता बाहेर पडायचं ! ४ही दिवस आमचं हेच रुटीन होतं.

हे काही फोटो
Red-billed Blue Magpie - महाराष्ट्रात न दिसणार्‍या या पक्षाने आम्हाला रिसॉर्टच्या आवारात येथेच्छ दर्शन दिले.
RedBilledBlueMagpie.JPGRedBilledBlueMagpie1.JPG

Himalayan Bulbul - हिमालयन बुलबुल चा तुरा आपल्या बुलबुलच्या तुर्‍यापेक्षा जास्त बाकदार पुढे कपाळापर्यंत असतो आणि वेंट लाल नसून पिवळे असते.
Himalayan Bulbul.JPG

Black Bulbul - ह्याला तुरा नसतो.
Black Bulbul 2.JPG

Blue Whistling Thrush - हा लांबून आम्हाला कावळाच वाटला पण सुंदर गातो आणि जवळून बघितला तर दिसतो पण सुंदर.
Blue whisling Thrush.JPG

Grey Bushchat - ही इवलूशी बया नंतर पण आम्हाला असंख्य वेळा भेटली. आणि मुख्य म्हणजे भरपूर फोटो काढून देत होती.
Gray Bushchat 2.JPG

Russet Sparrow - आपल्या चिमणीपेक्षा थोडी वेगळी असते.
Russet Sparrow_0.JPGRussette Sparrow 1.JPG

या नंतरचा भाग इथे वाचा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users