Submitted by प्रतिक सोमवंशी on 2 June, 2019 - 08:46
ढिगाने पडलेत ग तारे, रोज ढिगाने वाढतातही म्हणे
पण त्या ढिगात, तू बरोबर बोट करून कस मलाच ओळ्खतेस नेहमी?
बहुदा जास्त चमकत असेल ना मी
की तुझ्या डोळ्यातील आसवे मला पाहून जास्त चमकतात?
इथे एक एक जण खर्ची पडतो
तेंव्हा बहुदा एका ताऱ्याचा जन्म होतो नाही!
की तुम्ही लोकांनीच ही अंधश्रद्धा पाळलीय मनात
मी सांगतोय, मी नाहीय तो तारा
मी काय कुणीच नाहीय कोणता तारा
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख लिहिलंय! पु.ले.शु!
सुरेख लिहिलंय! पु.ले.शु!
तू बरोबर बोट करून कस मलाच
तू बरोबर बोट करून कस मलाच ओळ्खतेस नेहमी?
- ओळखतेस असा पाहिजे होता वरिल highlighted शब्द.
ळ आणि ख वेगळे करा.
बाकी सुंदर.
करून पाहिल होत ल आणि ख वेगळ
करून पाहिल होत ल आणि ख वेगळ पण ऑटो करेक्ट होऊन तसच होतंय असो भावना पोहोचल्या न बस