तो आणि ती
दोघांच एक वेगळ जग, त्या जगात बाकी कोणालाच जागा नाही.
दोघांनी ठरवलं होतं काहीही झालं तरी हे जग असंच राहील, सुंदर, निर्मळ.
दोघांच्याही मनात कोणतेच वाईट भाव नव्हते. ना होती कसली अपेक्षा.
दोघांना फक्त एकच पाहिजे होतं, समोरच्याने आनंदी राहावं.
आणि ह्या एका गोष्टीसाठी दोघं आपआपल्या परीने झगडत होते.
हे सगळं करतांना एकमेकांना जपत होते.
एकमेकांवर बाकी जगाच्या पलीकडे प्रेम करत होते.
पण कोणास ठावूक कशी, पण त्यांच्या ह्या नात्याला बाकीच्या जगाची नजर लागली.
तरी त्यांच नात अजूनही अभेद्य होतं.
त्रास दोघांना होता, पण दोघानाही एक माहित होतं,
कि आपला त्रास समोरच्याला समजला तर त्याला जास्त त्रास होईल,
म्हणुन दोघही सगळा त्रास मुकाट्याने सहन करत होते.
तिच्या डोळ्यात आलेला प्रत्येक अश्रू त्याच्या मनावर असंख्य घाव करत होता.
आणि त्याच्या ओठांवरच्या हसण्यामागचं दुखः तिच्या अश्रूंमध्ये भर टाकत होतं.
आली वेळ, निघून गेली. नात्यातला आपलेपणा तसाच ठेवून गेली.
अजूनही ते सोबत आहेत, एकमेकांच्या सुखासाठी अजूनही झगडताय.
दोघं तीच आहेत, नात्याचं नाव फक्त वेगळ झालय.
तो आणि ती...
Submitted by जयश्री साळुंके on 31 May, 2019 - 01:22
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
भावनोत्कट लिखाण. शेवटच्या
भावनोत्कट लिखाण. शेवटच्या ओळीतला पंच भावला. हे लेखन कथा/कादंबरी नाही काव्याच्या अधिक जवळ जाणारे आहे. पुलेशु.
धन्यवाद.
धन्यवाद.
काव्यलेखन मध्ये देखील टाकलं आहे.
सुंदर..ह्रद्यस्पर्शी लिखाण..
सुंदर..ह्रद्यस्पर्शी लिखाण..
मुक्तछंद! छान आहे.
मुक्तछंद!
छान आहे.
भावनास्पर्शी लिखान...
भावनास्पर्शी लिखान...
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद