भाग १५ चा धागा : https://www.maayboli.com/node/69988
भाग १६ :
अशीच एकदा सकाळीच रेवती शुटींगला निघाली होती .ती म्हणाली “केदार तुही चल ना माझ्या बरोबर”
“शुटींग बघायला ?”
“बघायला असे नाही ?पण अक्टिंग खेरीज तिथे इतरही अनेक गोष्टी असतात . स्क्रिप्ट रायटिंग असते, एडिटिंग असते, असिस्टंट डायरेक्टर असते.बघ तुला एखादे आवडले तर.”
“मला कपडेपट सांभाळायला तेवढे जमेल”.
“गप बैस .चल लवकर .“
केदारचे सेटवर चांगले स्वागत झाले. रेवती ग्रीनरूम मध्ये गेली.स्पॉट बॉयने केदारला खुर्ची टाकून दिली, त्याच्या डोक्यावर छत्री लावून दिली.वैभव सूदला केदार आल्याचे समजताच तो त्याला भेटायला आला आणि त्याच्या शेजारी बसला. थोड्याच वेळात शुटींग सुरु झाले.पहिला शॉट रेवती आणि वैभव यांच्यावर होता . कहाणी नेहमीसारखी श्रीमंत बापाची मुलगी आणि एक कार मेकॅनिक यांच्या प्रेमावर आधारित असते . नेहमीच्या पठडीतला अभिनय असल्याने सीन पटापट ओके होत जातात . प्रत्येक सीन नंतर वैभव केदार जवळ बसायचा आणि शॉट कसा झाला असे विचारायचा .केदारही मुक्त कंठाने... ‘लाजबाब’ ‘बेहतरीन’ अशी विशेषणे बहाल करून टाकायचा . कहानीमे twist वाला सीन सुरु होतो .नायकाची आई त्यांचे लग्न लाऊन द्यायला तयार होते . पण नायिका ‘मुकर जाती है’ नायक चिडतो. नायिकेला दुषणे देतो.
सीन संपल्यावर रेवती ग्रीन रूमकडे जाते. वैभव केदार जवळ बसतो . केदारला हा सीन आवडलेला नसतो. वैभवने ‘कैसा हुवा’ म्हणून विचारल्यावर तो म्हणतो ‘ठीक हुवा’ वैभवला ते चांगलेच खटकते तो म्हणतो...
“ठीक हुवा ?.मतलब अच्छा नाही हुवा”
केदार सावरून घेत म्हणाला...
“नाही नाही अहो फारच छान झाला.”
“क्या खामिया थी ये भी बता दो “.
स्व:तशी बोलावे तसे केदार म्हणाला “अभिनयात कुठे कमी पडला असे नाही पण प्रेयसीने झिडकारले तर काय होते.? राग येतो का दु:ख होते.? आपण चिडतो. कोणावर ?तिच्यावर /समाजावर /स्व:तावर तसे तर ऑमलेट खरपूस भाजले म्हणून मोलकरणीवरही चिडतोच की .चिडण्या चिडण्यात काही फरक हवा की नको ?”.
केदार काय बडबडतोय ते वैभवला कळेना. तो म्हणाला...
“ तुम क्या बोल रहे हो.मेरी तो कुछ समझमे नही आ रहा है . ओमलेटका क्या बोल रहे हो.तुम मुझे अक्टिंग करके दिखाव तो मै मान लू”
“मै ऐसेही बडबडा रहा था.उसका कोई मिनिंग नही.just neglect it” .
”करके दिखीइये ना.मुझेभी कुछ सिखनेको मिलेगा”.
वैभवने केदारला दंडाला धरुन उठवले आणि पुढे मोकळ्या जागी आणले. आणि म्हणाला...
‘”दिखाव..."
“अहो मला नाही जमणार.मी अगदी सहज काहीतरी बोललो.”
“करके दिखाव”
आता केदारचा नाईलाज होता.त्याने एका ज्यु .आर्टस्ट मुलीला बोलावले . तिला म्हणाला “स्टार्ट दे “.
“रितेश ,मुझे माफ करना ,मै तुमसे शादी नही कर सकती”
“ये क्या बचपना है.उधर मेरी मा शादीकी तैयारी कर रही है.और ऐसे वक्त तुम मुकर रही हो.लेकीन कयो? कुछ वजह भी तो होगी.”
“वजह जानकर क्या करोगे? दुखही पाओगे”.
“क्या कहा .वजह जानुंगा तो दुख पाउंगा? मतलब तुम्हे लगता है की मै तुम्हारे लायक नही हू”
“मैने ऐसा तो नही कहा “
“बिलकुल सच.तुमने ऐसा नही कहा .लेकीन तुम्हारे पापा ने कहॉ और तुम मान गयी. मै तो शुरुसेही कहता था की तुम उंचे खानदानकी हो. अच्छा है की हम दूरही रहे. लेकीन तुमने कहा था प्यारमे बडी शक्ती होती है .आज देखो वो प्यार तुम्हारी ताकद नही बल्की तुम्हारी कमजोरी बन गयी . अगर तुम्हे अपने पापाका इतनाही खयाल था तो मुझे प्यारके सपने दिखानेसे पहेले ये सोचना था .मै तो कहेता हू प्यार करनेसे पहेले जात ,बिरादरी ,आर्थिक स्तर, सामाजिक स्तर ये सब देखाना चाहिये.ऐसी सावधानता बरतोगी तो ना कोई देवदास होगा ना सैराट.”
केदारच्या डोक्यात तिडीक उठली .कळ दाबत, तो खुर्चीकडे यायला लागला वैभवने त्याला आधार देवून खुर्चीत बसवले.एका स्पॉटबॉयने त्याला पाणी दिले.सगळे गोळा झाले.केदारने रुमालाने नाक पुसले. त्याच्या रुमालावर रक्ताचा डाग पडला होता. डाग पाहून बॉय म्हणाला “साहेबांच्या नाकातून रक्त येतय. डॉक्टरकडे नेले पाहिजे.”
दुसऱ्या एकाने रेवतीच्या ड्रायव्हरला फोन करून गाडी मागविली.एवढ्यात रेवती धावत आली.ती म्हणाली...
“केदार काय होतंय तुला”
वैभव म्हणाला...
“कुछ समझमे नही आ रहा.अचानक एक्साइट हो गये.”
केदार आता बराच सावरला होता तो म्हणाला...
“ I am sorry रेवा.sorry वैभव ,very sorry ”
तेवढ्यात गाडी आली .स्पॉटबॉयने गाडीचे दार उघडले.केदार सरळ गाडीत जाऊन झोपला .
रेवती म्हणाली...
“मी पण जाते.”
--------------------------------------------------------------------------------
केदारला सकाळी थोड्या उशीराच जाग आली. त्याने डोळे उघडले तर समोर रेवती आणि शर्मिष्ठा चिंताक्रांत चेहेरे करून बसलेल्या. लगेचच केदारला कालचा प्रसंग आठवला . तो म्हणाला “रेवा,I am really sorry. माझ्या मुळे तुझी अक्वर्ड पोजिशन झाली.”
रेवती...
“असे काहीही नाही. पण आता तुला कसे वाटतेय .“
“छान .मी एकदम फ्रेश आहे.”
शर्मिष्ठा...
“पण जीजू ,काय झाले ? तुम्ही एवढे का चिडलात ?.”
“मी तिथे गेल्यावर त्या लोकांनी मला खुर्ची दिली.माझ्या डोक्यावर छत्री लावली.पण वैभव आल्यावर माझी छत्री काढून त्याच्या डोक्यावर लावली शर्मिष्ठा मिश्कील स्वरात म्हणाली...
“वा ,जीजू .मस्त मस्त”
“अग,नाही ग बाई ,मला मत्सर वाटला म्हणून नव्हे तर ऊन लागले म्हणून माझा पारा चढला.”
रेवती म्हणाली...
“पण आता डॉक्टरकडे जाऊन तपासून घे”.
“मला काहीही झालेले नाही .खूप राग आल्याने मी अनावर झालो.पण इथून पुढे दक्षता घेईन. डॉक्टरकडे जायची काही आवश्यकता नाही.”
रेवतीने इंटरकॉमवरून शिवरामला बोलावून घेतले.तो आल्यावर ती म्हणाली...
“शिवराम. तू याला घेऊन इंगळे डॉक्टरांच्या कडे जा.काय होतंय ते डॉक्टरना नीट सांग.”
रेवतीच्या आणखी काही सूचना असतील म्हणून शिवराम वाट पहात थांबला.रेवती म्हणाली...
“काय झालं .जमणार नाही का तुला ?मग मी थांबते.आणि त्याला दवाखान्यात घेऊन जाते.”
“दिदी मी केदारसाहेबाना दवाखान्यात घेऊन जातो. मला काही अडचण नाही.तुमचे आवरले की या साहेब.मी खाली आहे.”
केदार गेल्यावर शर्मिष्ठा म्हणाली...
“काल सेटवर काय झालं ग दिदी?”
“ते दोघे चांगल बोलत बसले होते एकदम हा का एक्साईट झाला तेच कळत नाही.”
“जीजू वैभवबद्दल जेलस तर झाले नसतील?”
“तसे असेल तर अवघडच आहे.”
“मला वाटते आता जीजूना अक्सेप्ट करण्याशिवाय पर्याय नाही”
“अग काहीतरीच काय बोलतेस.मला नाही वाटत मी त्याच्या बरोबर आयुष्य काढू शकेन.?’
“असे का म्हणतेस. जीजू चांगले आहेत ग.”
“शमा,माणूस सालस असणे पुरेसे नाही .त्याचे काही कर्तुत्व हवे की नको?”
“ बर बाई ! चलते “
--------------------------------------------------------------------------------------
डॉ .इंगळेनी केदारला तपासले.टॉर्चने नाकात,कानात, घश्यात झोत पाडून तपासले ते म्हणाले...
“तसे काही गंभीर वाटत नाही.मी चार दिवसाचे औषध लिहून देतोय. पण पुन्हा त्रास झाला तर औषध रिपीट करू नका.आपण एमआरआय टेस्ट करून घेऊ. सकाळी मोरावळा किंवा गुलकंद घ्या.जेवणात ताक दही भरपूर घ्या.आणि उन्हात जाऊ नका.”
शिवरामने औषध ,मोरावळा ,गुलकंद घेतला .डॉ.ची फी त्यानेच दिली. त्यामुळे केदारची तुटपुंजी शिल्लक शाबूत राहिली. सकाळी त्याची काळजी करणारी रेवती सायंकाळी केदारची विचारपूस करायला विसरून गेली. त्यामुळे केदार नर्व्हस झाला.
-----------------------------------------------------------------------------------
अण्णासाहेब पार्टनर बरोबर कामकाजासंदर्भात चर्चा करत बसलेले होते.शिवराम त्याच्यासाठी चहा घेऊन आला. गावडेनी विचारले...
“काय शिवराम, पाहुणे काय म्हणतात ?"
“बरे हायेत. “
“बरे आहेत म्हणतोस. पण आवाजात नाराजी दिसते ”
“काय तर ?.साहेबांचे काही ना काही बिनसत असते.”
अण्णासाहेब,,,
“त्यांना आपले जेवण आवडत नाही का?”
“नाही नाही. जेवणाची काही तक्रार नाही.पण त्यांना करमत नाही.त्यांच्याशी कोण बोलत नाही.इथे येऊन मी अडकलो.अशी किरकिर चालू असते .आणि सारखे प्रश्न विचारत असतात.”
“ते एकटे पडलेत. त्यामुळे त्यांचा स्वभाव किरकिरा झालाय.आपण त्याच्या कलाने घ्यायचे”.
”हो. आम्ही सांभाळून घेतोच”
शिवराम गेल्यावर अण्णासाहेब म्हणाले...
“आता काय करायचे ह्यांचे ?.शमा म्हणाली ते एका बाजूला पडलेत,म्हणून त्यांना रेवतीच्या खोलीत रहायला सांगितले. त्यांना घरची काळजी नको म्हणून मिनाक्षीने पंधरा लाख रुपये पाठवून दिले. सगळ्यांना त्यांच्याशी सौजन्याने वागायला सांगितलय. मागच्या आठवड्यात रेवती त्यांना सेटवर घेऊन गेली तर त्या वैभवशी काहीतरी कुरापत काढली.नोकरांशी सुद्धा सतत कटकटी करणे बरोबर नाही”.
“मला वाटते त्यांना सायकीयास्ट्रीकला दाखवावे”
“नाही.सायकीयास्ट्रीकला दाखवण्याइतके काही झालेले नाही.”
“सायकीयाट्रिकची ट्रीटमेन्ट चालू असणे आपल्या दृष्टीने सुरक्षित असते:”
अण्णासाहेब काळजीत पडले आता केदारला सायकियास्ट्रीककडे चल असे कसे म्हणायचे? तो म्हणेल मला काय वेड लागलाय का? पण पार्टनरांचा सल्ला टाळूनही चालणार नव्हते. कारण पार्टनर फार दूरदर्शी होते..
-------------------------------------------------------------------------------
केदार लायब्ररीत पुस्तक बदलायला गेला होता. बरेच दिवसांनी आज शिंत्रे काकाची भेट झाली . पुस्तक बदलून झाल्यावर शिन्त्रेकाका म्हणालेच...
“ चला कॉफी प्यायला.”
केदार...
“नको .काका ,खरच नको “.
“साधी कॉफी प्यायची त्यात काय संकोच करायचा?”
“आता मी काय सांगू तुम्हाला?”
“रानडे, तुमची अडचण मला माहित आहे . तुम्ही येताना मोजके पैसे घेऊन आलात . त्यामुळे तुम्हाला अवांतर खर्च करायला धाडस होत नाही.म्हणून मी तुम्हाला कधी बिल देऊ देत नाही.तुम्ही माझ्या बरोबर भीड करू नका.”
कॉफी पिता पिता शिंत्रेकाकांनी विचारले...
“आता ठीक आहे ना सगळे?”
“काय खरे नाही “
” मागच्या वेळेला तुम्ही म्हणाला होतात की तुम्हाला रेवतीने तिच्या रुममध्ये राहायला दिलंय.त्यामुळे तुम्ही खुष होतात.”
“मी तिच्या रुममध्ये रहातो इतकेच . पण ती माझ्याशी अंतर राखूनच आहे. सकाळचा चहा आता रूम मध्ये मिळतो आणि फोनचे एक्सटेन्शन वापरायची परवानगी आहे .याखेरीज बाकी सर्व पहिल्यासारखेच आहे.”
“ठीक आहे.आहे ही परिस्थिती मान्य करून तुम्हाला राहावे लागेल. बाकी काही त्रास तर नाहीना?”
“पण मला मानसिक स्वास्थ्य नाही.त्यांनी मला का ठेऊन घेतलय हे मला समजत नाही तो पर्यंत मला स्वस्थता लाभणार नाही.”
“मग रेवतीला विचारा.म्हणाव मी तुम्हाला सहकार्य करतोय आणि पुढेही करीन पण हे सगळ का करताय?”
“मी असे काही विचारले तर रेवती माझ्यावर नाराज होईल .ती माझ्याशी बोलण सोडून देईल . आणि मग मला तिच्या खोलीत राहणे अशक्य होइल.”
शिंत्रे काका हसू आवरत म्हणाले...
“निदान अण्णासाहेबाना विचारा ”
“अण्णासाहेबाना विचारले तर चालेल?”
“अहो त्यांनी तुमचे जीवन उध्वस्त केले .त्यांना तुम्ही जाब विचारलाच पाहिजे.इतकेपण मुखदुर्बळ असू नये माणसाने”.
“बरोबर आहे .मी प्रयत्न करतो”
तो विचारात पडला.अण्णासाहेबाना एकांतात केंव्हा गाठावे .नक्की काय विचारावे ?
तेवढ्यात दुसरीच एक कल्पना त्याच्या डोक्यात आली त्याने शिन्त्रेना विचारले...
“समजा मी पळून गेलो तर ते पोलीसात तक्रार करतील?”
“बहुतेक कोणी police complaint करणार नाही. पण तुम्ही पळून कुठे जाणार ? समजा तुम्ही तुमच्या गावी गेलात तर मिनाक्षी आणि आश्विन डीस्टर्ब होतील. त्यांना आता तुमच्याशिवाय रहायची सवय झाली आहे.त्यामुळे तुम्ही तिथेही उपरे ठरणार. शिवाय तुमचा खर्चही तिलाच सोसावा लागणार. तुम्हाला तिथे मिळणे अवघड आहे. त्यातुलनेत इथे नोकरी मिळवणे सोपे आहे. आधी तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करा.नोकरी मिळाली की तुम्ही वेगळे राहायला लागा. मग रेवतीला वाटले तर ती तुमच्याकडे येईल किंवा मीनाक्षीला वाटले की तुम्ही निर्दोष आहात तर ती तुमच्याकडे येईल. निदान तुमचा आत्मसन्मान शाबूत राहील”. केदार गप्पच झाला त्याचा चेहेरा उतरला. शिंत्रे म्हणाले...
”sorry ,मी जास्तच बोललो”.
”नाही काका तुम्ही निखळ सत्य माझ्या समोर मांडलेत .मी चार महिने वाया घालवले . उद्या पासून पहिले काम नोकरी शोधणे .
----------------------------------------------------------------------------
दुसरेच दिवशी रेवती गेल्यावर लगेचच त्याने पेपरचा गठ्ठा घेऊन नोकरीचा शोध सुरु केला. शंभर जाहिराती वाचल्यावर त्याला केवळ तीन जाहिराती सापडल्या ज्यांची अपेक्षित पात्रता त्याच्या शैक्षणीक पात्रतेशी मिळती जुळती होती.त्याने कॉम्पुटरवर बायोडाटा तयार करायला घेतला. तिन्ही ठिकाणी त्याने अर्ज पाठविले. तेवढ्या कृतीनेही त्याला खूप बरे वाटले.त्या तीन पैकी वरळीची small figures या कंपनीची नोकरी त्याच्या दृष्टीने अनुकूल होती. ही कंपनी त्यांच्या क्लायंटसाठी सर्व्ह करणे ,डाटा अनालिस, स्टार्ट अपचे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे अशी कामे जॉबवर्क बेसीसने करून देत होती कंपनीने टीप लिहीली होती की भारतात कोठेही पोस्टिंग होऊ शकते.अण्णासाहेबांचे कक्षेतून बाहेर पडण्याचे दृष्टीने ही इष्टापत्तीच होती.त्यारात्री केदार सुखाने झोपला.
--------------------------------------------------------------------------------------
सायंकाळी ५ चा सुमार होता .केदार नुकताच चहा पिऊन टीव्ही पाहत बसला होता. त्याला शांताक्का घरात येताना दिसल्या .सायंकाळचा स्वयंपाक वहिनीसाहेब किंवा शर्मिष्ठा करत असत . त्यामुळे त्याने विचारले...
“आज काय विशेष? संध्याकाळी आलात?”.
“हो.जेवायला दीदींची मैत्रीण येणार आहे.. सगळा ताजा स्वयंपाक करायचा आहे”
केदार काळजीत पडला.आता आपण काय करायचे .खाली थांबायचे का वर रूम मध्ये जायचे? रेवती तिच्या मैत्रिणीबरोबर आपली ओळख करून देणार आहे का?असे बरेच प्रश्न त्याला सतावू लागले. तो हॉलमध्ये थांबला. टीव्ही पाहण्यात पेपर वाचण्यात दोन अडीच तास निघून गेले.त्याला वाट पाहत बसायची सवयच झाली होती.काहीही कारण नसताना तो वाट पाहत बसायचा.आता शिवराम त्याच्या समोर दरवाज्यात एका स्टूलावर बसून तो रघू ड्युटीवर येण्याची वाट पाहत होता. रघू आल्यावर त्या दोघांची शाब्दिक बोलाचाली झाली. रघू नियमित उशिरा येई पण उशिरा येण्याचे प्रत्येक वेळी नवे कारण देई.शिवराम गेल्यावर रघु काहीसे स्व:तशी काहीसे केदारची साक्ष काढल्यासारखे म्हणाला...
“आणि सकाळी ह्यो कधी टाईमात आलाता?”
केदारने मान हालवून माफक सहमती दर्शविली. तोवर रघुला स्वयंपाक घरातून शांताक्कानी हाक मारली. रघू आत गेला आणि भरलेले जेवणाचे ताट घेऊन आला .केदारसमोर टीपॉय वर ताट ठेवत म्हणाला...
“जेवा गरमगरम”.
जेवणाचा थाट जबरदस्त होता.केदारचे जेवण झाले .तरी तो तिष्ठत बसून राहिला कारण रेवतीच्या मैत्रिणीला “हाय/ हलो “ म्हणणे आवश्यक होते. पावणे दहा वाजता रेवतीची गाडी पोर्चमध्ये थांबली. आणि केदार आश्चर्याने पाहतच राहिला कारण रेवतीच्या मागोमाग मिनाक्षी गाडीतून उतरली. रघु तत्परतेने पुढे गेला आणि मीनाक्षीची सुटकेस घेऊन रेवतीच्या खोलीत गेला. रेवती आणि मिनाक्षी हॉलमध्ये आल्या .रेवती सरळ तिच्या रूमकडे गेली केदारला पाहून मिनाक्षी थांबली.स्मित करीत त्याला म्हणाली ...
“कसे आहात ?”
“तू कशी काय अचानक ?”
“रेवती बोलवत होती .म्हटलं एकदा सगळ्यांना भेटून येऊ”
“अश्विन कुठे आहे ?”
“रमाकांत भाऊजीच्या घरी “
“राहिला तो? “
“अगदी आनंदाने “
इतक्यात शर्मिष्ठा आली मीनाक्षीला बिलगत म्हणाली...
“बर वाटल .तू आलीस ?”
“मला ही तुम्हा सगळ्यांना भेटायचे होते.”
“जा वर ,फ्रेश होऊन ये .जेवायला बसू "
“काय जीजू कस झालाय जेवण ?”
डायनिंग हॉलमध्ये तिघीजणी हसत खेळत जेवत होत्या .वहिनीसाहेब आग्रह करून वाढत होत्या. केदार हॉल मध्ये बसून विचार करत होता. मिनाक्षी का आली असावी .बहुतेक त्याच्या बद्दल काहीतरी ठरवायचे असेल.पण अण्णासाहेब तर बाहेर गावी गेले होते.बहुतेक त्यांच्याशी आधीच बोलणे झाले असेल.केदारने बसल्याजागी देवाला हात जोडले...
”देवा सुटका कर”
तिघीचे जेवण झाले रेवती आणि मिनाक्षी वर निघाल्या जाता जाता मीनाक्षीने केदारकडे पाहून मान हलवून निरोप घेतला.केदारचा विरस झाला.शर्मिष्ठा बाहेर आली म्हणाली...
“जीजू खूप उशीर झालाय .झोपा आता.रूम सापडेल ना?का रघुला सोडायला सांगू?”
केदारने तिला कोपरापासून नमस्कार केला . ती हसत हसत पळून गेली.
--------------------------------------------------------------------------------------
( क्रमश: )
“मी असे काही विचारले तर रेवती
“मी असे काही विचारले तर रेवती माझ्यावर नाराज होईल .ती माझ्याशी बोलण सोडून देईल . आणि मग मला तिच्या खोलीत राहणे अशक्य होइल.” >>> आता या केदार ला माराच, किमान कोणीतरी गुंडानी धु धु धुतला असे तरी दाखवा पुढे.
4 महिने काहीही न करता, कोणी धड बोलत नसताना राहतोय. सायको आहे खरच. सायको दाखवा पुढे.
बाकी रेवतीचे घरचे किती उलट्या काळजाचे एखाद्याला अशी तुच्छ वागणूक देणे स्वतःच्या स्वार्थासाठी? काळ्या पाण्याची शिक्षाच जणू.
केदार ला वाचवत (reading)
केदार ला वाचवत (reading) नाहीये पूढे
@Shitalkrishna >> अगदी सहमत..
@Shitalkrishna >> अगदी सहमत..
अतिलांबड.
अतिलांबड.
फक्त कथाच आहे असं असलं तरीही
फक्त कथाच आहे असं असलं तरीही पटत नाहीये.
सॉरी. पण रटाळ होतेय कथा..!
लिहीत राहा.कथेचा पेस थोडा
लिहीत राहा.कथेचा पेस थोडा डेली सोप चा असला तरी कथा रोचक होते आहे.आम्ही रोज वाट बघतो आणि रोज एक भाग येतो.केदार च्या मनात नक्की इच्छा यातून सुटावं ही आहे का रेवती बरोबर ऑफिशियल सुखाने नांदता यावं ही आहे अशी शंका यायला लागलीय.
शिवाय केदार बरोबर चं कोणीही त्याला बायकोला गृहीत धरून असा लग्नाचा वेड्यासारखा निर्णय घेतला म्हणून त्याचा निषेध करत नाहीये.ही कथा थोडी जुन्या काळातली असावी.(90 ज कींवा 85ज मध्ये मूल असलेलं जोडपं.)
लॉल
लॉल

एकंदर केदार बुवांचं छान
एकंदर केदार बुवांचं छान एन्जॉय करणे चालूय की ! एक रेवती सोबत ऑफिशियल विबासं आणि कदाचित अजुन एक होऊ घातलेले पुढील चोरी चोरी चुपके चुपके टाइप शर्मिष्ठावाले विबासं