काल एका मुलीने माझा फोटो काढला.

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 May, 2019 - 16:54

उभा जन्म मुंबईत गेल्याने रिक्षा नामक तीन चाकी वाहनाशी दोन हात करायचा प्रसंग फारसा आला नाही. त्यातही शेअर रिक्षा या प्रकारापासून मी चार हात लांबच राहतो. कारण त्यात आपल्यासोबत आणखी चार-सहा हात बसवतात. ज्यांच्याशी आपली ओळख ना पाळख अश्यांसोबत एकाच रिक्षात खेटून प्रवास करायला नाही म्हटले तरी जरा संकोचच वाटतो. त्यातही जर दोन मुलींच्या मध्ये बसायची वेळ आली तर आणखी अवघड होते. तसे पाहता ईयत्ता पहिली ते चौथी दोन मुलींच्या मध्ये बसूनच मी माझे प्राथमिक शिक्षण पुर्ण केले आहे. पण तेव्हाचा काळ वेगळा होता. तेव्हाची लोकं भोळी होती. तेव्हाचे मन निरागस होते. पण आता मात्र....

असो, तर ईथे विस्तव तिथे शेकोटी. मधले लोणी पार विरघळून ताक झाल्यास नवल नाही. ज्यांना हे रोजच्या सवयीचे आहे त्यांचे ठिक असते, पण नसते एखाद्याला सवय तर नाही जमत. आज अशीच अग्नीपरीक्षा माझ्यातल्या रामाला द्यावी लागली. पण हे मोबाईलयुग असल्याने भलतेच रामायण घडले.

तर झाले असे,
मीटर रिक्षाची एक रांग होती आणि शेअर रिक्षाची एक रांग होती. मीटरची रांग मोठी होती आणि शेअरची रांग छोटी होती. मी जरा घाईत असल्याने शेअरने जायचे ठरवले. एका रिक्षात मागे तीन प्रवासी आणि पुढे ड्रायव्हर, आणि त्याच्या मांडीला मांडी लाऊन आणखी एक प्रवासी. असे एका रिक्षात टोटल पाच रहिवाशी. बहुधा रिक्षाचा पुढे होणारा निमुळता आकार लक्षात घेता, तिचा गुरुत्वमध्य आणि पॅसेंजरचा गुरुत्वमध्य यातील eccentricity कमीत कमी राखायला अशी पाच-तीन-दोन व्यूहरचना गरजेची असावी. तसेच सारे रिक्षावाले ईथून तिथून मिथुन किंवा गेला बाजार येण्णा रास्कला रजनीकांत असल्याने स्टेअरींगच्या उजव्या बाजूला बसून रिक्षा चालवणे त्यांच्या डाव्या हाताचे काम असावे. बहुधा रिक्षावाल्यांना लायसन देताना अश्या अवस्थेत रिक्षा चालवायची चाचणी मस्ट असावी.

असो. तर आम्हा पाच जणांचे लगेज भरताच लगेच ती रिक्षा भरघाव सुटली. जेवढ्या कमी वेळात एक फेरी पुर्ण तितका धंदा जास्त असे काळ काम वेगाचे साधेसोपे गणित असावे. रिक्षावाला ना सिग्नल पाळत होता. ना खड्डे टाळत होता. हातात दही घेऊन बसलो असतो तर ताक झाले असते, केळी घेऊन बसलो असतो तर शिकरण झाले असते, वांगी घेऊन बसलो असतो तर भरीत झाले असते. मी मुठीत जीव घेऊन बसलो होतो. त्याचे पाणी पाणी होत होते. रिक्षा वाशीची होती आता आम्हीही रिक्षावासी झालो होतो. बाजूने सानपाड्याचा रेल्वेट्रॅक दिसत होता. माझी स्मरणशक्ती मला दगा देत नसेल तर गुलाम चित्रपटातील आमीर खान आणि मंडळी दस दस ची दौड हा खेळ ईथेच खेळले होते. कदाचित रिक्षासोबत स्पर्धा करायची हिंमत नसल्याने त्यांनी ट्रेनचा सोपा पर्याय निवडला असावा. पण चक्राऊन तर मी तेव्हा गेलो जेव्हा वाशीहून सुटलेल्या ट्रेनला आमच्या समांतर चाललेल्या रिक्षाने केव्हाच मागे टाकले होते.

आता रिक्षाने वळसा घेत मेन रोड पकडला होता. आजूबाजूच्या अवजड वाहनांशी स्पर्धा करत रिक्षा पळत होती. शेजारून त्यांचे मोठाले टायर छातीत धडकी भरवत जात होते. ते पाहून मी जरा बाजूला सरकलो तसे तिकडची मुलगी अंगावर खेकसली. मी पुन्हा सावधपणे मधोमध बसलो.
रिक्षावाल्याला म्हटलं, जराआतल्या रस्त्याने घे राजा.
त्यावर तो म्हणाला भाऊ तिथे ट्राफिक असतो. आणि ट्राफिक हवालदार सुद्धा असतो. चौथा पॅसेंजर पकडला जाईल.
मी म्हटलं हमम, मी यातला एक्स्पर्ट तर नाही. पण.....
जर ट्राफिक असेल तर त्याचा एक फायदा सुद्धा आहे, आपण ट्राफिक हवालदाराला दिसणार नाही.
तसे त्याने एकवार मागे पाहिले. माझी खिल्ली उडवली. आणि पुन्हा रिक्षा भरघाव सुटली.

पुढच्या सिग्नलला मात्र त्याने गाडी आतल्या गल्लीत घेतली. आधी माझी तो कसोटी घेत होता, आता गल्ली क्रिकेट सुरू झाले. तिथे क्रिकेटमध्ये एकच आफ्रिकेचा एबी डीविलिअर्स मिस्टर ३६० डिग्री म्हणून ओळखला जातो. ईथे दर दुसर्‍या गल्लीतील तिसरा रिक्षावाला त्यासाठी प्रसिद्ध असतो. जो जागच्या जागी पुढचे चाक ३६० अंशात वळवू शकतो. कमालीचे हातपाय अ‍ॅण्ड आय कोऑर्डीनेशन. आपल्याला देखील आपली आय आठवते. मलाही माझी आठवली. त्या रिक्षाच्या मागे "आईचा आशीर्वाद" असे कोणासाठी लिहिले होते त्याचा उलगडा झाला. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. अचानक एका बेसावध क्षणी रिक्षा उसळली आणि मी डावीकडच्या मुलीवर हलकेच कोसळलो...

तिने एक तुसडा कटाक्ष टाकला तसे मी घाबरून उजव्या बाजूला सरकलो. एक कोपरखळी तिकडून पोटात बसली.
ठिक से बैठा करो, बीच के सीट पे क्यू बैठे हो, एक साईडमे नही बैठ सकते थे..
हायला! हे असे सुद्धा असते का? मी रांगेत जसा मान खाली घालून आय मीन मोबाईलमध्ये डोकं खुपसून उभा होतो तसाच आत चढलो होतो. पुढच्यामागच्या डावीउजवीकडच्या जगाची पर्वा करायची असते हे माझ्या ध्यानीमनीही नव्हते.
वाद घालण्यात अर्थ नव्हता. मी जितके अंग चोरून बसायचा प्रयत्न करत होतो तितके रिक्षा मला जास्त उसळवत होती. थोडा ओळखीचा भूभाग दिसताच मी रिक्षावाल्याला रिक्षा बाजूला घ्यायला लावली. शेअरचेही वीस रुपये झाले होते. कसली महागाई वाढली आहे. मीटररिक्षाने एकट्यादुकट्याने प्रवास करायलाच नको.

मी रिक्षातून खाली उतरून पाकिटात हात घालून पैश्यांची जमवाजमव करत असताना सहज माझे लक्ष रिक्षात बसलेल्या मुलीकडे गेली. तिच्या मोबाईलचे तोंड माझ्या दिशेने वळलेले, मुद्दामच वळवलेले मला स्पष्ट दिसत होते. काय करत असावी? माझा फोटो? माझा फोटो काढत असावी? वीजेच्या वेगाने लखकन विचार डोक्यात चमकला आणि माझी स्थिती डोक्यात वीज कोसळल्यासारखीच झाली. आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी माझा फोटो काढत होते आणि मी ईस्माईल देत नव्हतो. पुरेसा प्रकाश, हल्लीच्या मोबाईल कॅमेर्‍यांची क्लॅरीटी, त्या मुलीचा सराईतपणा आणि तिच्या चेहर्‍यावरील तुसडेपणाच्या भावाच्या जागी आता दिसणारा खट्याळपणा हेच सांगत होते की उद्या माझे पोस्टर सोशलसाईटच्या भिंतीभिंतीवर छापले जाणार होते. सोबत एखादी पोस्ट.! काय असेल? रिक्षात खुलेआम छेडछाड करणार्‍या एका मवाल्याचा मुलीने चपळाईने प्रसंगावधान दाखून टिपला फोटो. मग तीच पोस्ट कसलीही शहानिशा न करता छोट्यामोठ्या वृत्तपत्रात बातमी म्हणून झळकणार. काही स्वयंघोषित हौशी पत्रकार माझ्या घरी टपकणार. त्या मुलीची जात निघणार, माझा धर्म निघणार, रिक्षावाल्यांचा प्रांत निघणार, खाया पिया कुछ नही पण ईज्जतीचे वाभाडे निघणार. प्रकरणाला राजकीय वळण लागले तर मायबोलीवरही धागे झळकायला वेळ लागणार नाही. ती वेळ यायच्या आधीच आपणच का नाही धागा काढून आपली बाजू क्लीअर करावी म्हणून हा लिखाणप्रपंच !

थॅंन्क्स अ‍ॅण्ड द रिगार्ड
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोठे विमानतळ (आंतरराष्ट्रीय वगैरे) हे बहुधा महानगरांच्या बाहेरच असतात. १९२८ साली जेव्हा सांताक्रूझ विमानतळाचे काम सुरू झाले तेव्हा ही जागा मूळ मुंबईच्या सीमेच्या बरीच बाहेर होती. १९२८ साली दादरसुद्धा पूर्ण वसले नव्हतें. जी आय पी दादरच्या आसपास असलेल्या वाड्या खाचरांतून हिंदु कॉलनी नुकती उभी राहात होती. दादर टी टी आणि शीव टी टी ही नगरपालिकेतली वहनाची शेवटची स्थाने होती. माहीमला वसती अशी फार नव्हती. तरी मुंबई हद्दीतले शेवटचे स्टेशन म्हणून माहीम चर्च पासून (ते एक महत्त्वाचे लॅंड मार्क होते म्हणून) बसचे एक दोन रूट होते. १९७० सालापर्यंत मालाड ते दहिसरचे लोक नोकरीसाठी ' मुंबईला' जात असत. (गिरगावचे लोक कोटात किंवा फोर्टात जात असत.) आजही मुंबई शहर आणि उपनगरांसाठी वेगवेगळे विकासनियम, कर आहेत. एफ एस आय वेगळे आहेत. त्या काळात सांताक्रूझ पूर्व, खार पूर्व, कोळि कल्याण हा भाग खाजण होता. इतकेच काय विले पारले पश्चिमेलाही समुद्राच्या पाण्याचे आत शिरलेले पट्टे दिसत. सहार विमानतळ हा शहराबाहेरच होता आणि आजही थोड्या प्रमाणात मुख्य शहराबाहेर आहे. अर्थात विमानतळ हे सर्वात नजीकच्या मुख्य शहराच्या नावानेच ओळखले जातात.

हिरा उत्तम माहिती. नेहमीप्रमाणे. तुम्ही गूगल विकीपिडीया पुरातत्व विभागात वगैरे कामाला आहात का? कुठून अशी विविध विषयांवरची रोचक माहिती आणता Happy

पुरुष ड्रायव्हरशेजारी मुलगी>>
हे कलकत्त्यात मी १९९५ पासून (तेव्हा पहिल्यांदा गेलो इथे) पहात आहे.

>>>>>>

एकाचा तरी विश्वास बसेल का तुमच्यावर Happy

भारी लिहिलं आहे..! ते मुंबईची हद्द नेमकी कुठे चालू होते, कुठे संपते, दोन मुलींमध्ये तिसऱ्याला बसू देतात की नाही, दही हातात धरलं तर त्याचं लगेच ताक कसं होईल अशा डीटेल्समध्ये न जाता वाचलं मी..अतिशयोक्ती आहे काही ठिकाणी हे कळत होतं पणा जाम खुसखुशीत झालंय प्रकरण..! आवड्या...

@भावना गोवेकर आणि ऋन्मेऽऽष
अभ्यास वाढवा. रिक्षा कुठून सुरू होते आणि कुठे संपते, यावरून मुंबईची हद्द ठरवत नाहीत.>>
अभ्यास काय वाढवायचा त्यात... 'मुंबई' .. महानगर अन तिच्या उपनगरांना धरुन संबोधल जातं.. मागच्या काहि वर्षापासुन उपनगरं जास्त विकसित झाली आहेत. इथे ७ नगरपालीका अन १५ नगर परिषद आहेत. यासगळ्यांची देखरेख आता MMRDA करतं... अजुन माहिती देवु शकते तुर्तास इतकं पुरे..
मी चेंबुर या उपनगरात राहते इकडे सगळ्या रिक्षाच आहेत अन आमच्या नातेवाईकाकडे जेव्हा आंम्हाला दादर-नायगाव ला जायचं असत तेव्हा रिक्षावाला सायनच्या पुढे नकार देतो.. इथुन टॅक्सी घ्या म्हणतो... म्हणजेच इथुन महानगची हद्द सुरु झाली..

रिक्षामधील प्रवासवर्णनानेच लेखामध्ये जास्त जागा घेतल्याने तुम्ही सांगत असलेल्या मूळ मुद्द्याकडे कोणाचे जास्त लक्ष गेले नाही आणि त्यावर तुम्हाला अपेक्षित असणारी पुरेशी चर्चा झाली नाही. त्याच वेळी त्या मुलीला त्याबद्दल विचारून आपला फोटो तिच्या मोबाईलमधून डिलीट करण्यास सांगावा. ती तसे करणार नसल्यास रिक्षाचालक आणि इतर सहप्रवाशांकडून आपले वागणे छेडछाड करण्यासारखे होते का ते तेव्हाच स्पष्ट करून घ्यावे. रिक्षाचा नंबर, रिक्षाचालकाने नाव वैगैरेची नोंद करून घ्यावी, पुढेमागे साक्षीदार म्हणून गरज लागली तर.

आवडला असेल तिला तुमचा चेहरा. इतकं टेंशन नका घेऊ. फार तर दुसर्‍या दिवशी मैत्रिणीला दाखवेल ती की अशा हीरोसोबत रिक्षात प्रवास केला म्हणून...

हे भारी आहे Lol
शप्पथ तुम्ही माझे अर्धे टेंशन दूर केले ..
सिरीअसली.. ही शक्यता सर्वाधिक आहे. मला घाबरल्याने सुचलीच नाही ..

गोल्डफिश छान सल्ले दिलेत.
पण हे त्यावेळी सुचणे, किंबहुना अमलात आणने तितके सोपे नाही. किमान माझ्यासाठी तरी..

राहून राहून एक विचार येतोय
तिनी तुम्हाला सोम्य शब्दात च
समज का दिली.
दुसरे तिनी पुढचं कॅमेरा वापरून तुमचे जे वर्तन रिक्षा मध्ये होत होते त्याचे चित्रण केले असते

निलिमा धन्यवाद Happy

राजेश, त्या मुलीचा शोध मी घेतोय. एकदा लागला की आपले प्रश्न नक्की विचारतो

मला पडलेला एक प्रश्न
चक्क तू त्या मुलीला म्हणाला नाहीस की,तू माझा फोटो काढला आता मी तुझा फोटो काढतो म्हणून?
बाकी लेखातल्या बैठक व्यवस्थे विषयी मी पूर्ण सहमत आहे,गेली 10वर्षे मी शेअर रिक्षेनेच प्रवास करतेय,त्यामुळे त्याबाबत पुर्णतः सहमत

चक्क तू त्या मुलीला म्हणाला नाहीस की,तू माझा फोटो काढला आता मी तुझा फोटो काढतो म्हणून?
>>

खरे तर मला माझा फोटो काढून घ्यायला आवडतो, दुसर्‍याचा फोटो काढायला नाही. अगदी निसर्गाचेही फोटो मी काढत नाही. माझ्यामते जोपर्यंत फोटोत तो निसर्ग माझ्या बॅकग्राऊंडला येत नाही तो पर्यंत त्याला शोभा येत नाही Happy

आणि हो, हे जोक्स द अपार्ट नाहीये तर खरेच मी यासाठी बदनाम आहे Happy

ईथे गोची अशी झाली की मला शंभर टक्के खात्री नव्हती वा त्या तश्या खात्रीने तिला हटकता आले नाही. जर तिने माझा फोटो काढला नसता वा मी हटकताच चपळाईने डिलीट मारत कांगावा केला असता तर मी स्वतःच्याच पायावर रिक्षाचे चाक नेले असते.

Welcome back Runmesh...!!!
तुमचे लेख आणि प्रतिसाद ही वाचायला आवडतात मला....

काहीच्या काही वाटतेय पण लिहीलेले आवडले खरे...

खरेच खरे घडले आहे का...?
Uhoh
लेखकाच्या प्रतिसादातून वाटतेय

ऋन्मेष,
तुम्ही तो दिवस निट आठवा
शर्ट उलटा घातला नव्हा ना...?
शर्टवर काही funny , विसंगत लिहिले नवते ना..?
चेहरयावर पावडर किती थापली होती...?
उनाळ्यात sweater कींवा raincoat घातला नवता ना...? अशक्य वाटेल पण मी चुकून उन्हाळ्यात sweatshirt घातले होते... घाईघाईत साधे टिशर्ट घालण्याऐवजी त्याच रंगाचे sweatshirt घातले होते। घरात असतानाच लक्षात आले म्हणून...!
तुम्हाला काही ईश्वरी देणगी आहे का...? दूर्मीळ eyecolour, दूर्मीळ haircolour, लांब मान, शुभ्र रेखिव दात वगेरे... Social mediaवर टाकण्यासाठी अनेकदा अशा दूर्मीळ लोकांचे फोटो काढले जातात

ही शक्यता पण विचारात घ्या

>>>> लेखक स्वतःला गरीबांचा शाहरूख खान आणि मध्यमवर्गीयांचा स्वप्निल जोशी समजतो !

या सगळ्या लेख प्रकारात वरील ओळीकडे कुणाचेच लक्ष कसे गेले नाही?
ती मुलगी मबो वर असावी किंवा वरील ओळींतील दोन्ही व्यक्तीसारखा ऋन्मेष नक्कीच भासला असेल अन अशा व्यक्तीमत्वासोबत अंगाला अंग खेटून ( की अंगचटीला येवून !?) काही मिनीटे प्रवास केला याची आठवण ठेवण्यासाठी तिने तुझा फोटो काढला!

पुढील प्रवास शेअर रिक्षानेच करा जेणेकरून तुमचे फॅन्स भेटतील.

Happy

रत्न Lol

तुम्ही तर रत्नपारखी निघालात Happy
तसा मी दुर्मिळ आहे. पण दिसण्यात नाही तर विचारांनी..

पाषाणभेद, मी स्वतःला गरीबांचा शाहरूख खान आणि मध्यमवर्गीयांचा स्वप्निल जोशी समजतो. आहेच असे नाही. पण जे मला जवळून ओळखतात ते याला मान्यता देतात. अपवाद गर्लफ्रेंडचा..

अरे क्या गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड लगाय है भाई.
लग्न झालेल्या माणसाने गर्ल फ्रेंड आहे हे सगळ्या जगाला सांगू नये- लपवून ठेवावे.

च्रप्स माझी तीन लग्ने झाली आहेत. पण त्याचा ईथे गर्लफ्रेंडशी काय संबंध ? रिक्षात शेजारी बसणारया मुलीचे लग्न झाले आहे की नाही हे तिच्या सौभाग्यलंकाराकडे बघून ओळखता येऊ शकते. पण शेजारची मुलगी आपले लग्न वा गर्लफ्रेंड कशी ओळखणार?

माझ्या मित्राच्या सांगण्यानुसार त्यांच्याईथे (वेस्टर्न मुंबई) कॉलेजच्या पोरी रिक्षावाल्याच्या बाजूलाही चौथा पॅसेंजर म्हणून बिनधास्त बसतात. आता बोला Happy >>

हे परवडले एक वेळेस पण फक्त स्त्री आहे म्हणून मागे आरामात दोन कुल्हे टेकवून बसलेल्या पुरुषाला पुढे रिक्षा वाल्याच्या शेजारी मांडी गांडीचा काँकेव काँवेक्स करून बसायला लावणाऱ्या प्रकारची भयंकर चीड येते.

अरे वर्ष झाले बरोब्बर्र्र या लेखाला आणि घटनेला Happy
धन्यवाद कटप्प्पा..
हा बायकोला वाचायला देता येईल.. फेबूवर सुद्धा शेअर करता येईल.. आता रिस्क नाहीये Happy

च्रप्स माझी तीन लग्ने झाली आहेत. पण त्याचा ईथे गर्लफ्रेंडशी काय संबंध ? रिक्षात शेजारी बसणारया मुलीचे लग्न झाले आहे की नाही हे तिच्या सौभाग्यलंकाराकडे बघून ओळखता येऊ शकते. पण शेजारची मुलगी आपले लग्न वा गर्लफ्रेंड कशी ओळखणार?
Submitted by ऋन्मेऽऽष on 28 May, 2019 - 23:04

>>> सांभाळून रे... बायको विचारेल याबाबत....

Pages