मोगरा

Submitted by 'सिद्धि' on 17 May, 2019 - 05:43

मोगरा...

नावातचं सुहास, शितलता आणि प्रसन्नता जाणवते.
फक्त मोगरा अस मनातचं म्हणा...कसा कोण जाणे त्याचा वास आजु-बाजुला जणवायला लागतो. (माझ्या बाबतीत तरी असच होत बर्याच वेळेस)
मन त्याच्या आठवणीच गुलाम आहे, नसताना ही त्याच अस्तित्व जाणवत. तो सुगंध मना-मनात भरलाय .

नुसत डहाळि अन डहाळि भरुन यायचं, उमलन तेही शुभ्र धवल, दुसर्या रंगाचा नावालाही स्पर्श नाही .
जणु तयाचा रंगच न्यारा.
हिरव्या गर्द साडितील शुभ्र कांतिमय कन्या जणु, पण उमलताना येणार आपल्या सख्यांचा गोतावळा घेऊनच, मोगर्‍याला एकट- दुकट वेलीवर कधी पाहिल्याच आठवत नाही मला. कळ्यांचे घोस च्या घोस दिसतात. मस्त दिमाखदार, पण सौंदर्यचा जराही अभिमान नाही. उलट शितल, सज्जन, आणि खाणदानीपनाची झाक घेउनच याचा जन्म होतो, आणि आपल्या सुहासाने सारा आसमंत व्यापुन टाकत .

लता दिदीच हे आजरामर गाण म्हणजे मोगर्‍याच्या सौंदर्यच अचुक वर्णन आहे .

इवलेंसे रोप लावियलें द्वारी
इवलेंसे रोप लावियलें द्वारी
तयाचा वेलु गेला गगनावेरी ।
फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला
मोगरा फुलला मोगरा फुलला।।

.
मोगरा फुलावा.jpg
.
तर असा हा मोगरा...

मोगऱ्याची एक पोस्ट वाचल्यापासून काही लिहावंसं वाटत होतं. वेळेअभावी जमत नव्हतं. Finally आजचा मुहूर्त मिळालाय.

मी खुप कमी नाटक बघते, कारण खुप वेळ लागतो ना नाटक करायलाही आणि बघायलाही.
त्यातीलच एक काही वर्षांपूर्वी दिलीप प्रभावळकरांचं "वाह गुरू" नाटक पाहिलेलं. त्यात स्वतःचं मरण समजलेले एक प्रोफेसर आणि त्यांची बायको मिळून एक समारंभ ठरवतात ज्यात त्यांचे आप्त, विद्यार्थी, मित्रपरिवार असे सगळे जमा होतात. कार्यक्रम छान आनंदात पार पडतो. समारोपाला सर सगळ्यांना ती बातमी सांगतात, स्वतःचं मरणा बद्दल. "कि आपल्याला स्वतःचं मरण केव्हा हे समजलेल आहे
आणि अमुक अमुक या दिवशी मी मरणार." मग स्वतःच्या 3 शेवटच्या इच्छा ही सांगतात. हे सारं ऐकून काहीजण हळहळतात. प्रोफेसर खुप चांगले सज्जन ग्रुहस्थ असतात . भावना विवष होऊन काहीजण तर रडूच लागतात.

तेव्हाचं त्यांचं एक वाक्य "ईश्वराने मला थोडी तरी कल्पना दिली आहे की माझ्या हातात किती दिवस आहेत जगण्याचे, ते सत्कारणी आणि आनंदी घालवावे की कमी दिवस आहेत म्हणून रडत बसावे?"

दोनदा पाहिलं हे नाटक....जाम रुजलंय खोलवर मनात कुठेतरी. वाटतं खरंच आपण आपली शेवटची इच्छा कुठेतरी लिहून ठेवायला हवी किंवा कुणाला तरी सांगून ठेवायला हवी.जो दिवस मिळतो तो भरभरून जगायला आवडतं.
इतर कोणत्या इच्छा पूर्णत्वास जातील की नाही माहीत नाहीत. पण एक हमखास इकडे तुम्हा सगळ्यांना सांगावीशी वाटत आहे. (प्रज्ञा... same तुझ्यासारखीच आहे इच्छा)
ती म्हणजे ओंजळभर का होईना मोगऱ्याची फुलं माझ्या आजूबाजूला पसरवून ठेवा.
हा प्रवास कसा चाललाय माहीत नाही.
कित्ती सरलं आयुष्य कित्ती उरलं याची काहीच कल्पना नाही.
आपल आयुष्य ईतराना किती सुगंध देउन गेल याची गणना करन सुद्धा जमतं नाही.
पण तो प्रवास तरी सुगंधित आणि मनमोकळा व्हावा एवढीच ईच्छा.

( माझी सखी प्रज्ञाच्या मनातील भाव माझ्या शब्दांत. )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलय!
एकदम “लागले नेत्र रे पैलतीरी” मोड कसाकाय अॉन केलाय आज? Happy

धन्यवाद शालीदा...
काहीतरी लिहिण्याची ईच्छा स्वस्थ बसु देत नाही आणि मग अस मनातल पानावर येत राहत.

"वाह गुरू" नाटक पाहिल आहे मी.
उपमा अलंकार उत्तम वापरला आहे तुम्ही या लेखात.
हिरव्या गर्द साडितील शुभ्र कांतिमय कन्या जणु, पण उमलताना येणार आपल्या सख्याचा गोतावळा घेऊनच.
सुंदर वर्णन.

"वाह गुरू" नाटक पाहिल आहे मी.
उपमा अलंकार उत्तम वापरला आहे तुम्ही या लेखात.
हिरव्या गर्द साडितील शुभ्र कांतिमय कन्या जणु, पण उमलताना येणार आपल्या सख्याचा गोतावळा घेऊनच.
सुंदर वर्णन.

आदि- धन्यवाद.
उपमा जमली आहे तर मला. बर वाटलं ऐकुन.

अज्ञातवासी-अतिशय सुरेख लिहिलंय, काही उपमा तर...वाह!
मात्र शालिदा +१

आधी प्रतीसादासाठी धन्यवाद....
- लागले नेत्र रे पैलतीरी मोड- असं काही नाही हा जस्ट लिहावस वाटलं. जसा आयुष्याचा भरवसा नाही तसंच मनात काय काय इच्छा प्रकट होतील सांगता येत नाही.

मधू मागशी माझ्या सख्या परी
ही भा. रा. तांबे यांची कविता आहे. त्यातले शेवटचे कडवे आहे...
ढळला रे ढळला दिन सखया
संध्या छाया भिवविती हृदया
आता मधुचे नाव कासया
लागले नेत्र रे पैलतिरी

हा धागा मला दिसत नाहीए. कुणी प्रतिसाद दिला तरच दिसतो. मायबोलीवर नविन, माझ्यासाठी नविन कुठेच दिसत नाही. असे का?

भा. रा. तांबे च्या कवितेचे रसग्रहण-
कवी कळकळीने सांगतात ढळला रे दिन सखया आता आयुष्याची उतरण जवळ आलीय संध्याछाया मनाला भिववू लागल्यात वार्धक्यात पाऊल टाकलेय आता मधूचे नांव नको आता नवकवितेचा आग्रह नको माझे नेत्रा पैलतीरी लागलेत .

हा धागा मला दिसत नाहीए. कुणी प्रतिसाद दिला तरच दिसतो. मायबोलीवर नविन, माझ्यासाठी नविन कुठेच दिसत नाही. असे का? -
शालीदा खरंच मला याची काही कल्पना नाही.
ग्रूप चुकला वाटतं.

खुप सुंदर.आमच्याकडे पण आजकाल दररोज रात्री खिडकीत लावलेल्या मोगर्याचा मंद सुगंध पसरलेला असतो. Happy
मन्या ऽ - धन्यवाद

वाह गुरू" नाटक कुठे मिळेल?
च्रप्स, A आदि - लिंक मिळाली की नक्की टाकते.