"आपल्या नात्याला ५-६ वर्षे झाल्यामुळे तोचतोचपणा आला आहे"
"काहीतरी थ्रिलिंग आणि इंटरेस्टिंग झालं पाहिजे"
"ह्या प्रश्नाचं उत्तर आहे माझ्याकडे"
"काय?"
"विबासं"
तो फक्त हसला.
"असं छद्मी हास्य करून काही साध्य होणार नाहीये. मला काहीतरी वेगळं केलंच पाहिजे आणि ते म्हणजे विबासं. हे माझं निश्चितपणे ठरलंय"
"बरं, मग? माझा काय संबंध? तुला हवं ते करायला तू स्वतंत्र आहेस"
"संबंध नाही कसं? ही समस्या तुझ्यामुळेच निर्माण झाली आहे. तूच हा गुंता सोडवायला हवास. मी आज विबासं करू शकत नाही ते केवळ तुझ्यामुळे. जरा गंभीरपणे विचार कर. तुलाही ह्यातून कदाचित जीवनातले हरवलेले थ्रिल गवसेल"
"बास कर बडबड………………………………………………………………….................................................................
मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे”
---------------------------------------------------------------------------
**किल्ली**
--------------------------------------------------------------------------
मागे एकदा कमिट केल्याप्रमाणे मी हे विबासं केले आहे.
ह्य शशक ची प्रेरणा कोणती हे अख्या माबोला माहिती आहे.

कृपया केवळ मनोरंजन म्हणून ह्या कथेचा आस्वाद घ्यावा.

रच्याकने,
विबासं म्हणजे विवाह बाह्य संबंध
धन्यवाद अनामिका, मन्या आणि
धन्यवाद अनामिका, मन्या आणि दीपिका
किल्ली... छान आहे शशक
धन्यवाद उमानू
धन्यवाद उमानू
हाहा... छान आहे शशक!!
हाहा... छान आहे शशक!! रच्याकने चा अर्थ काय? अजून मायबोलीच्या शब्दांचे अर्थ शिकते आहे
रच्याकने -> रस्त्याच्या कडेने
रच्याकने -> रस्त्याच्या कडेने -> By the way
@अतुल.. धन्यवाद, आईशप्पथ हे
@अतुल.. धन्यवाद, आईशप्पथ हे कधीही कळलं नसतं.... हेमावैम वगैरे समजलं लगेच पण हा मात्र बाऊन्सर होता ....
Pages