वंदन माते

Submitted by Asu on 12 May, 2019 - 13:02

आज ‘मदर्स डे’च्या निमित्ताने सर्व मातांना आप्तेष्टांना आणि रसिकांना हार्दिक शुभेच्छा!

वंदन माते

जन्म देऊनि मला घडविला
देऊनि लाख लाख संस्कार
वंदन करितो माते तुजला
थोर तुझे उपकार

तुझ्या प्रेमाची उब देऊनि
उठविलेस मज रोज सकाळी
घेऊनि मज पदराखाली
घाव सोशिले संकटकाळी

ऋण ना फिटो सातजन्मी
हीच प्रार्थना देवापाठी
तुझ्याच पोटी जन्मोजन्मी
जन्म मिळू दे, आस मोठी

देवा तव एक, प्रार्थना
मातेविण जगण्या असो अर्थ ना
सदा जन्मू दे श्रावणबाळ
मातांच्या पोटी अनंतकाळ

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults