अश्रू

Submitted by प्रांजलीप्रानम on 8 May, 2019 - 01:05

अश्रू
नयनात सांजवेळी,
दाटून आले पाणी
सांगू कशी कळेना,
ती मागची कहाणी
ना झाली विस्मृत ,
ती जगलेली गाणी
खोल दाटली स्मरणात,
ती ओथंबलेली वाणी
क्षणार्धात पालटले जग,
भरले ते आसवांनी
वाऱ्यासवे सुखसंवेदना,
गेल्या आहेत विरूनी
नुसतीच राहीली इथे,
एक तुझी आठवण स्मरणी
नवीन जग तूझेच,
ते वसलेले पाहूनी
विरक्त झाले या प्रेमात,
अशी तिलांजली वाहूनी
काही आशा ना उरली आता,
या भंगलेल्या मनी
सूकले हे फूल,
न देत वास
जरि भिजले अश्रूंनी
.....प्रांजली

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults