सध्या तो काय करतो ?

Submitted by पुरूष हक्क समिती on 6 May, 2019 - 17:12

ऋन्मेष नावाचा एक आयडी होता ना इथे ?
दिसत नाही हल्ली.
मला चांगलं आठवतंय त्याच्या मागोमाग निघणा-या धाग्यांनी मायबोलीकर त्रस्त झाले होते. पण का त्रस्त आहोत हे सांगता यायचं नाही.
कारण ते सर्वच धागे निरूपद्रवी होते.
खरं तर तुसडेपणे न पाहता प्रेमाने पाहीलं तर ते सर्वच मनोरंजन होतं.
म्हणून मी तरी करमणूक करून घेतली.
क्वचित कधी तरी वैतागलो पण.

पण ऋन्मेष च्या धाग्यांमुळे मायबोलीवर एक जिवंतपणा रहायचा.
आता स्मशानशांतता नांदते.
त्याचं ललित लेखन, कथा, त्याचे चातुर्यपूर्ण प्रतिसाद हे काहीच दिसत नाही.

तो आजारी असल्याचं समजलं होतं. नंतर आला की नाही माहीत नाही.तो असेल
की त्याला मायबोलीवरून काढून टाकलं आहे ?
की तोच सोडून गेला आहे ?

शेवटच्या दोन्हीच्या बाबतीत का असं विचारावंसं वाटतं,
तो नाही तर एक पोकळी निर्माण झाली आहे. माणूस असताना त्याची किंमत कळत नाही.
तो नसताना मग समजते. तसंच झालंय

त्याला बोलवा प्लीज. जर काढून टाकलं असेल तर सन्मानाने परत घेऊन या.
तो आल्याषिवाय काही मायबोलीला चांगले दिवस येणार नाहीत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users