जगत रहावे धुंदपणाने..

Submitted by T. J. Patil on 4 May, 2019 - 02:54

जगत रहावे धुंदपणाने..।

हळूच फुलूनी यावे कळीने
फूलही अलगद उमलत जावे
कविता मजला सहज सुचावी
गीत मनाचे ओठांवर यांवे

झुळझुळना-या झ-यासारखे
बोल सुचावे सहजपणांने
स्वरलहरींची जमून मैफिल
शब्दांचे व्हावे मंजूळ गाणे

रिमझीमणा-या श्रावणसरींसम
बरसत यावी अोली कविता
जिवनगांणे असे सुचावे
शब्दजलाची वाहती सरिता

विरूनी जावे माझे मीपण
गात रहावे मंद स्वराने
मंतरलेल्या या काव्य मैफिली
जगत रहावे धुंदपणाने..।

.... टी.जे.पाटील

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users