अमेरिकेतील बासुंदी

Submitted by उनाडटप्पू on 2 May, 2019 - 11:49

कुणी अमेरिकेत बासुंदी बनवली आहे का?
आमच्या घरी सगळयांना खूप आवडते, परंतु इथल्या दुधाची होईल का हि एक शंका आहे आणि करायची असल्यास कोणते दूध वापरावे, काही इतर क्रीम ऍड करावे का? असले सगळे प्रश्न आहेत.

कोणाला माहिती असल्यात रेसिपी द्या ....

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

फुल फॅट/ हाफ अँड हाफ... आणखी बेस्ट म्हणजे टिन मधल्या इव्हॅपोरेटेड मिल्कला उकळलं तर झटपट होईल.
डिस्केमरः मी बासुंदी केली नाही. मी भारतात किंवा अमेरिकेत कुठेही बासुंदी खात नाही.

मी करते वर्षातून एकदा तरी. अगदी ट्रॅडिशनल पद्धतीने. नो शॉर्ट कट्स Happy होल मिल्क जाड बुडाच्या हार्ड अनोडाइज्ड भांड्यात मंद आचेवर जवळजवळ निम्मे होईपर्यन्त आटवते. २-३ तास लागतील . सक्काळीच भट्टी लावायची चहाबरोबर, मग बाकीची कामं होईपर्यन्त लक्ष देत आणि ढवळत रहायचं. पेशन्स चे काम आहे. सगळ्यात शेवटी साखर आणि केशर वेलची घालायची. एकदम ऑथेन्टिक आणि सुंदर होते बासुंदी. हाफ न हाफ किंवा एवॅपरेटेड मिल्क एखादा लहान कॅन आणून ठेवते कन्सिस्टन्सी अ‍ॅडजस्ट करायला.

नेहमी करते. फुल फॅट दुध (शक्य असेल तर ऑर्गॅनिक. चवीत खुप फरक पडतो) आणि दुधाच्या निम्म्याने त्यात कॉस्टको मधले व्हिपिंग क्रीम घालते.
उकळायला मंद गॅस वर ठेवते. पातेल्यात एक छोटी प्लेट घालते म्हणजे अज्जिब्बात दुध लागत नाही. गॅस जवळच रहावे आणि अधुन मधुन दुध हलवावे. पण गॅस जवळच रहावे. साधारण १ १/२ तासात बासुंदी आटते. साखर वेलची घातली कि झाले.
कॉस्ट्को क्रीम आणि ऑर्गॅनिक दुध खुप महत्वाचे आहे चवीसाठी.

उनाडटप्पू, बासुंदी करुन मला बोलावलंत तर गाळणंही द्या Wink
मी दूध आणि हाफ अँड हाफची केली आहे. जाड बुडाचं पातेलं प्लस कढई टाईप ओपन तोंडाचं भांडं असलं की पटापट आटते बासुंदी.

मी पण गाळणंवाला मेंबर. Proud
अमेरिकेतली बासुंदी मी फुल फॅट दुधाची आणी १ कॅन इवॅपोरेटेड मिल्क असं वापरून करते. बाकी नेहेमीचे यशस्वी कलाकार जायफळ, वेलेदोडा पूड, केशर (नो चारोळी) मधे मधे काही तोंडात आलेले चालत नाही म्हणून.

अवांतर
माझी एक मैत्रीण रिकोटा चीज आणि कंडेन्स्ड मिल्क वापरूनही करते पण ती थोडी रबडीसारखी होते.

प्राजक्ता तूच कर बरं आणि इथे सविस्तर लिही रेसिपी. मी इंटरनेटवर रेसिपी पाहिल्या आहेत पण अजून करायचा धीर झाला नाही कधी. आम्ही होल दूध + हाफ & हाफ क्लबवाले. गाळण्याऐवजी इमर्शन ब्लेंडरने एकजीव करुन घेते मी.