गुलमोहर

Submitted by Asu on 1 May, 2019 - 05:53

सातार्‍यात १ मे हा दिवस 'गुलमोहर डे' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करणारे सातारा हे बहुधा जगातले पहिलेच शहर असावे. १९९९ सालापासून सातार्‍यात हा दिवस साजरा केला जात आहे.
या ‘गुलमोहोर डे’च्या निमित्ताने-

*गुलमोहर*

आकाशाच्या निळ्या पटावर
केसरलाल गुलमोहर फुलला
नसता हाती मज रंग कुंचला
निळ्या कागदी कसा उमटला

असुनि मी घरीच एकला
निसर्ग सारा कसा प्रकटला
पंख पसरून पक्षी उडाला
अलगद येऊन वृक्षी बैसला

डोळे मिटता डोळी शिरला
भिंती विरल्या, आधार सुटला
निळाशार पट मनी प्रकटला
गुलमोहर मी खुडून आणिला

अलगद हिरव्या रानी ठेवला
धुंद होऊनि गदगदा हलवला
बिन पुष्पाचा सडा शिंपला
गुलमोहर माझ्या स्वप्नी आला

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

गुलमोहोराचे सदा सर्वदा हिरवेगार तजेला देणारे, डोळ्यांना शीतल गारवा देणारे, मोहोरल्यावर लाल शेंदरी रंग सांडणारे वृक्ष खूप सुंदर दिसतात. सुंदर कविता.