.

Submitted by स्स्प on 23 April, 2019 - 01:18

राम राम सर्वांना

मला आमरस पातोळ्या ची रेसिपी हवी आहे. एका कथेत वाचताना त्याचा संदर्भ आला.. मी आजपर्यन्त कधी खाल्ले हि नाही आणि पहिली हि नाही

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमरस पातोळ्या- नेट वरून....
एका कढईत किसलेला ओला नारळ व गुळ घेऊन ते विरगळे पर्यंत परतुन घेणे नंतर त्यात ४ चमचे आमरस घालून परतणे व वेलची जायफळ पुड घालणे. एक पेला पाणी घेउन त्यात मिठ व एक चमचा तुप घालणे.
पाण्याला उकळी आली की एक पेला तांदुळाचे पीठ घालून ढवळणे व १० मिनिटे झाकून ठेवून नंतर ते मउ सुत मळुन घेणे. त्यांचे गोल गोळे करुन केळी च्या पानांवर लाटुन त्यात चव भरून पान बंद करून वाफवुन घेणे.

नारळाच्या किसाला चव पण म्हणतात काही ठिकाणी, टु बी स्पेसिफिक खवलेला ओल्या नारळाचा गर म्हणजे चव.

असेच एक चायनीज व्हर्जन पाहिले, त्यात दाण्याचा कूट व गुल घालतात,

गोळे गरम जिंजर सिरपमध्ये सोडून देतात.

हे करायची तीव्र इच्छा आहे.

https://www.betterbutter.in/recipe/838/peanut-dumplings-with-ginger-syrup/

सिरप व गोळे सर्व्ह करताना एकत्र करतात. गोळे शिजवून घेतात, सिरप तयार करतात, मग सर्व करताना एकत्र करतात