कथा - माझी बावळट बायको

Submitted by jayshree deshku... on 21 April, 2019 - 02:40

माझी बावळट बायको
आमची परिस्थिती तशी बेताचीच . लग्नाच्या बाजारात उभं राहताना इंजिनिअरची पदवी, आणि चांगल्या पगाराची कंपनीतली नोकरी, एवढच काय ते क्वालिफिकेशन. इस्टेट, घर-दार बाकी झिरो. त्यामुळे मुलीबाबतच्या माझ्या अपेक्षा पण माफक होत्या हो! बायकांचे साड्या,कपडे, दाग –दागिने, नट्टा-पट्टा याचा खर्च काही कमी असतो का? म्हंटल तिचा खर्च तिने उचलला तर बरच, तेव्हा बायको नोकरी करणारी असावी, त्यात सरकारी नोकरी असली तर उत्तमच. सर्वसामन्यांप्रमाणे माझी पण थोडी उच्च श्रेणीत जगण्याची स्वप्न होती ना! नोकरीवाली म्हणजे अर्थातच पदवीधर तर असावी, हे ओघाने आलेच ना! दिसायला हजार जणीत नाही पण दहा जणीत तर उठून दिसणारी हवी, ही तर माफकच अपेक्षा! मुख्य म्हणजे माझ्या आई-वडिलांशी त्यातले त्यात आईशी सांभाळून वागणारी हवी. वस्ताद नको. स्वभावाने गरीब असावी. ‘बैठ जा बैठ गयी ,खडी हो जा खडी हो गयी’ अशी नवऱ्याच्या आज्ञेत असावी. ही पण माफकच अपेक्षा ना हो! माहेरचा तोरा,माहेरच्या माणसांच कौतुक अजिबात नको. ही तर अगदीच अल्पशी अपेक्षा! देवाशपथ सांगतो, देवाने माझ सार ऐकल की हो! अगदी तशीच बायको मला मिळाली.
सुरुवातीला मला वाटलं आपल्याला हवी तशी बायको मिळाली. पण हळू हळू सहवास वाढला आणि मला समजून चुकल की आपली बायको गरीब स्वभावाची नाही तर बावळट आणि अव्यवहारी आहे. लग्नानंतरचा सुरुवातीचा किस्सा सांगतो, हिच्या माहेरी जायला आम्ही एस .टीने निघालो. रिझर्वेशन केलेलं होत. एस. टीला शाळेच्या सुट्यामुळे गर्दी होती. एस .टी फलाटावर लागली, लोकांची गर्दी एस टीत घुसू पहात होती. मी पण त्या गर्दीत एक सुटकेस घेऊन चढलो. हिच्या हातात पण एक सुटकेस होती. ही माझ्या पाठोपाठ चढेल असं वाटलं, पण हिला एका बाईने मागे सारल, गर्दी वर चढत राहिली आणि ही वेंधळी चढणाऱ्या गर्दीकडे पहात राहिली. सगळ्यात शेवटी ही बया चढली. आमच रिझर्वेशन मागच्या सीटच. जागा न मिळाल्याने बरेच लोक उभे होते. ह्या सर्व लोकांमधून वाट काढत, लोकांच्या त्रासिक, तिरस्काराच्या नजरा झेलत ही सीटपाशी आली. मी म्हणल, “ आधी नाही का चढायचं?”
तर म्हणाली, “ मला लोकांची धक्का बुक्की आवडत नाही. आणि रिझर्वेशन होतच ना!”
“पण आता भरलेल्या एस टीतून मागच्या सीट वर येताना ती झालीच ना!”
मग ही काहीच न बोलता गप्प बसली. मला वाटलं हिला उलट उत्तर देण नको असेल, म्हणून गप्प बसली असेल. हे चांगलच आहे ना! पण नंतर नंतर माझ्या लक्षात येत गेलं. हिला दुरुत्तर नाही तर लोकांना उत्तरच देता येत नाही. मग हिच्यावर अन्याय झाला तरी चालेल, ही गप्पच बसणार. आपलं ते खर करणाऱ्या, सासरच्या लोकांना पुरून उरणाऱ्या, न बोलून आपला मतलब साधणाऱ्या बायकाच माझ्या पाहण्यात होत्या. पण इथ मला वेगळीच काळजी लागली होती. आमच्या घरच्या बायकांनी जरा आवाज चढवला की हिची बोलतीच बंद व्हायची, घाबरून ही गप्पच बसायची, बायका त्यात माझी आईसुद्धा आपला मतलब साधून घ्यायची आणि वर पुन्हा बायकात कुचु कुचु बोलण व्हायचं, ‘ बोलत नाही आतल्या गाठीची आहे,’ हे ऐकूनही गप्प बसणाऱ्या बावळटीशी माझी गाठ पडली होती. मी तिच्या बरोबर असलो की माझ्या पुणेरी स्टाईल मध्ये लोकांना उत्तर द्यायचो. पण सगळ्या ठिकाणी मी थोडाच तिच्या बरोबर राहू शकणार होतो? त्यामुळे व्हायचं तेच होत गेलं, सगळे हिला, पर्यायाने मला लुटत गेले. मी पण वाहत्या गंगेत हात धुवून घेत होतो. तिला तिच्या पगारात घरातले खर्च करायला लावायचो. कधी कधी फिस्कारायची, पण माझ्या डरकाळी पुढे नमत घ्यायची. तिच्या ऑफिस मध्ये असच चालायचं. ही ऑफिसच्या सगळ्या कामात एक्स्पर्ट, अमुक एक गोष्ट कशी करायची हे तिचे सहकारी तिला विचारायचे आणि गोड बोलून हिच्याकडून काम करवून घ्यायचे. काम झाल्यावर ही गोष्ट हिच्या लक्षात यायची. ऑफिस मध्ये ही कॉफी घ्यायची तर बाकी चहा घेणारे असायचे. आपल्या कॉफीला जास्त पैसे पडतात तेव्हा इतरांना जादाचा भुर्दंड का? म्हणून आपल्या कॉफीच्या पैशांबरोबर ही दहा जणांचे चहाचे पैसे देऊन मोकळी व्हायची. त्यातच कोणी तरी नाश्ता पण हाणायच आणि सगळ्यांचे पैसे ही बावळट सचोटीने देणार.(म्हणजे स्वत:च्या कॉफीच्या तिप्पट हो ) मला जेव्हा ही असे किस्से सांगयची तेव्हा खरोखरीच मला हिची चीड यायची., मी हिला चिडून म्हणायचो, “ अग बावळटे सगळ्यांचे पैसे देण्यापेक्षा स्वत:च्या कॉफीचे पैसे देऊन मोकळ व्हावं.” मग मला तत्वज्ञान शिकवायची, “ जाऊ दे सुवासिनींना चहा पाजल्याच पुण्य मिळेल.” मग तर माझा अजूनच संताप व्हायचा. मी म्हणायचो, “अग, ह्या तुझ्या ऑफिसच्या भवान्या, फुकट्या, त्यांना चहा –नाश्ता देऊन पुण्य जमा करण्यापेक्षा एखाद्या गरीब विद्यार्थ्याला मदत कर, किंवा कोणी अडचणीत असेल त्याला पैसे दे”. मग लगेच बारीक चेहरा करून गप्प बसायची., मग मलाच वाईट वाटायचं. संसारात बऱ्याच ठिकाणी हिचा देवभोळा स्वभाव नडत गेला. हिला बऱ्याच वेळा नाही नेहमीच असं वाटायचं, माणसांनी कृतीतून आपल्या भावना व्यक्त कराव्यात.,बोलून दाखवू नये. नाही तर आपलं, ‘कोरडी माया उपाशी नीज ग बाया’ काय उपयोगाची? ही आपली प्रत्येकाच्या आवडीचा स्वयंपाक बनवायची, किंवा बाहेरून प्रत्येकाच्या आवडीच घरात काहीतरी आणत रहायची. पण बोलायची काहीच नाही. माझ्या भावजया त्याच्या विरुद्ध करायच्या, म्हणायच्या, “ सासूबाई तुमच्यासाठी अमुक एक गोष्ट आणू का?, मामांजी थंडीच स्वेटर घातल्याशिवाय बाहेर पडायचं नाही बरका!” प्रत्येक्षात आईसाठी घरात घालायला स्लीपर किंवा बाबांसाठी स्वेटर हिने कधीच आणून ठेवलेला असायचा. पण बोलायचं नाही कधी ना! मग माझे आई- बाबा म्हणायचे, “ह्या पोरीं ना आमची भारी काळजी घेतात, अगदी जीव लावतात, पण तुझ्या बायकोच्या मनात कुणाविषयी कणभर सुद्धा प्रेम नाही हो!” एकदा तर रागामध्ये माझे बाबा हिला चक्क ‘दगड’ म्हणाले.वाईट मला सुद्धा पण हिची बाजू घेऊ शकलो नाही. ही नेहमीप्रमाणे मुसमुसत राहिली. सुरुवातीला मलाही तसच वाटायचं मग खरी गोष्ट उमजली. मग मी हिला म्हणायचो, “ अग मनात असो वा नसो प्रेमाने बोलत जा” मग ही फणकारत म्हणायची, “मी सगळ्यांसाठी सगळ करते, तुम्हाला दिसत नाही का?” मला तिला समजावून सांगाव लागायचं, “बाई ग माणसांना कृती फार उशीरा लक्षात येते. हे जग सध्या दिखाव्याचे झाले आहे, एखाद्या साठी काही केल नाही तरी चालत, पण गोड बोलेल माणूस लक्षात ठेवतो. गोड बोलणारा माणूस जास्त जवळचा वाटतो. मनात नसेना का पण ढोंग करता आल पाहिजे, ते आधी शिक, तुझ्या ढोर मेहनतीचा नाही तर काहीच उपयोग होणार नाही”. माझी बायको म्हणजे ग्रेट त्यावर अक्कल पाजळायची; म्हणायची,
“तो परमेश्वर बसला आहे वरती, सगळ्यांचे हिशोब ठेवत असतो. तुम्ही लोकांनी जरी माझ्या चांगल्या कृत्यांचा हिशेब ठेवला नाही तरी तो ठेवतो, तो माझ शेवटी चांगलच करेल”. हिला लोक फसवत रहायचे, हिला soft टार्गेट बनवून हिच्याशी वाईट वागायचे तरी ही म्हणणार , “ तो माझा परमेश्वर बसला आहे, तो बघून घेईल, कुणाला काय शिक्षा द्यायची ते, मला कुणाशी वाईट वागता येत नाही, भांडता तर त्याहून येत नाही.” तरी मी तिला समजावत असतो. “देव असा प्रत्येकाची लढाई लढण्यासाठी रिकामा बसलेला नाही. प्रत्येकाला स्वत:ची लढाई स्वत:च लढावी लागते. तो फक्त सारथ्य करत असतो., तू जशास तसं वागायला शिक, तुझ्याशी प्रतारणा करणाऱ्या लोकांसाठी मदतीचा हात पुढे करत जाऊ नकोस. तुला स्वाभिमान आहे हे त्यांना पण कळू दे.” माझ्या ह्या उपदेशाच्या डोसा वर ती नुसतीच मान हलवते पण प्रत्यक्ष वेळ आली की ती शत्रूशी सुद्धा चांगली वागते. मला हा तिच्यातला चांगुलपणा तिचा दुबळेपणाच वाटतो.
एकदा अशी परिस्थिती आली, माझी तब्येत ठीक नव्हती. ऑफिसमधल्या सहकाऱ्याच्या अंत्यविधीसाठी जाणे मला शक्य नव्हते. कुणाचा फोन आला तर मी घरात नाही असं सांग असं हिला म्हणल, तर म्हणते, मला खोट बोलण जमणार नाही. मग मुलीने माझ काम केल. हिच्या नको तेव्हा सत्यवादी वागण्याचा मला रागच आला.दोन दिवस हिच्याशी अबोला धरला. पण हिच्या शिवाय सत ना गत करतो काय, झकत बोलायला सुरुवात केली.
घरात कुणी आजारी असल की, त्याला दवाखान्यात नेण, औषध आणणं, पथ्याच जेवण बनवण सगळ करणार पण मायेने कपाळावर हात ठेवून आता कसं वाटत आहे? हे बोलण तिला जमायचं नाही. हे काम माझ्या भावजयना बरोबर जमायचं आणि सर्वांच्या लेखी त्या मोठ्या व्हायच्या.. आणि ही रडत बसायची, “मी सगळ करून कुणाला माझी किंमत नाही म्हणायची. घरात सगळे तुमच्या भावजयशी मन मोकळ करतात त्यांना मोठेपणा देतात, त्यांना मोठेपणा मिळतो म्हणून मला वाईट वाटत असं नाही. पण मी कुठे कमी पडते? हे मला समजत नाही.” मी पुन्हा हिला तेच म्हणायचो, आधी नीट बोलायला शिक, कृती नंतर महत्वाची. आणि पुन्हा हसत हसत म्हणालो, ‘manegr never works, they manages all the things’ हिने चिडून मला चिमटा काढला.
माझी मुलगी सुद्धा हिला हातोहात उल्लू बनवत असते. लहानपणी हिच्या प्रत्येक गोष्टी ऐकणारी,हिला सोडून कुठलाही खाऊ न खाणारी, भातुकली मधला खाऊ सुद्धा आईला नेऊन देणारी आमची चिमु आता वस्ताद झाली आहे. स्वत:च्या वाटणीच खाऊन पुन्हा हिच्या वाटणीच पण लंपास करते. स्वत:चे नव्या fashion चे कपडे तर वापरतेच,पुन्हा हिने स्वत:साठी आणलेले ड्रेस आवडले तर तेही लंपास करून मोकळी होते. हिची कानातली, गळ्यातले सेट तुला नाही शोभत ममा असं म्हणते आणि लंपास करून मोकळी होते. आणि मी मध्ये पडलो तर हीच मातृ वात्सल्य लगेच उफाळून येत. लेकीची कड घेऊन म्हणते, “ जाऊदे पोर जिन्नस आहे, खाऊ दे , माझ्या पोटात्त थोडच त्याच सोन होणार आहे?, वापरू दे माझे ड्रेस, तिच आता नटण्या –मुरडण्याच वय आहे. वापरू दे माझे दागिने, मी थोडीच आता कानातली गळ्यातली बदलून मिरवत रहाणार आहे?” तिने असं म्हणल की माझी बोलतीच बंद होते. हेच मी हिला सांगत असतो, “माझ्या पुढे हजरजबाबीपणा दाखवण्यापेक्षा लोकांसमोर दाखवत जा. त्यांची बोलती बंद करायला शिक. स्वत:च्या हक्कासाठी भांडायला शिक.” की हीच पुन्हा तत्वज्ञान सुरु, “ हक्क कृतीतून मिळवायचा असतो, भांडून ओरबाडायचा नसतो.” ही तत्वज्ञानात गुरफणार ,तेवढ्यात माझ्या भावजया आणि बहिणी आई-वडिलांची मालमत्ता हडप करून बसायच्या. माझी बायको ही अशी बावळट म्हणून शेवटी मनात नसताना मला एकदा बायकांच्या भानगडीत पडाव लागलं. आई म्हणत होती, “अरे मी तुझ्या बायकोला विचारलं, “बाई ग तुला माझे कोणते दागिने हवे आहेत?, तर म्हणाली, सासूबाई मला काही नको आहे.” तेव्हा मीच म्हणल, “अग आई माझ्या बायकोला काही नको असेल पण तुझ्या नातीला तरी देशील ना!” माझ्या लेकीला जेव्हा कळल तेव्हा तिने मध्ये पडून आपल्याला हवे ते दागिने आजीकडून पदरात पाडून घेतले. वर पुन्हा आजीलाच सुनावून मोकळी झाली, “ कर्तव्य पार पाडायला आई आणि फायद्या साठी इतर का?”
हिच्या बरोबर बाजारहाट करण्यासाठी मी कधी जात नसतो. अशा कामांचा मला नेहमी कंटाळा. पण एक दिवस ही म्हणाली, “अहो, आपण बाहेर फिरायला जात आहोत तर जाताना तेवढ पाच मिनिट वाण्याकडे जाऊन येऊ, त्याने खूप खवट खोबर दिल आहे. ते परत करू.” मी बर म्हणल. वाण्याकडे आम्ही गेलो तर, वाण्याने गर्दी मध्ये आधी दहा मिनिटे हिच्याकडे लक्षच दिले नाही, मीच मग म्हणालो, “आम्ही पण तुमचेच गिऱ्हाईक आहोत, दहा मिनिटे ताटकळत उभे आहोत.” मग तो आमच्याकडे वळला, ही म्हणाली, “ तुमच्याकडून परवा खोबरे नेले ते खराब आहे हो, बदलून देणार?” हीच हे इतक्या साजुक भाषेतलं बोलण, त्यावर वाणी म्हणाला, “ भाभी सगळा असाच माल आहे.” मला राहवलं नाही, मी मध्ये पडलो आणि आवाज चढवून म्हणलो, “ तर मग आम्हाला नको आहे ते! आम्ही काही कवड्या मोजल्या नाहीत. परत घ्या हे”. वाणी चपापला, आतून लगेच दुसरे चांगले खोबरे घेऊन आला. आणि ही आळीपाळीने माझ्या आणि वाण्याच्या तोंडाकडे पहात राहिली. नंतर मी हिच्याशी रस्त्यात शांतपणे चर्चा करत चाललो होतो,म्हणालो, “असाच बावळट सारखा बाजारहाट करत राहातेस का ग?” तर तेव्हा हिच्या डोळ्यात पाणी आलं म्हणाली, “नाही हो!, मला बोलायला सुचत नाही असे नाही. पण मला भांडण आवडत नाही. मी घाबरते भांडणाला. मी लग्नाआधी ज्यांच्या कडे पेईग गेस्ट म्हणून रहात होते, त्यांच्या घरात सारखी भांडण असायची, कित्येक वेळा त्यांच्या भांडणाच्या पायात मी उपाशी राहिले आहे, घरात अन्न शिजायच नाही.त्या भांडणाचा शेवट घर डूबण्यात झाला. घरातली चांदीची भांडी,सोन-नाणं सगळ मोडीत निघालं. बँकेची जप्ती आली होती घरावर. म्हणूनच आपल्या घरात कोणी भांडणाचा सूर छेडला की मी गप्प बसते. कुणी तरी नमत घ्याव लागत तेव्हा भांड्यांचा खडखडाट थांबतो, नाहीतर तो घराबाहेर जायला वेळ लागत नाही.” मी म्हणालो, “हे जरी बरोबर असल तरी कायम गप्प बसण, माघार घेण म्हणजे आपला दुबळेपणा दाखवण होत. लोक आपल्याला चिरडत रहातात. लुबाडत रहातात. लोकांकडून फसवणुक करवून न घेण्या इतका धूर्तपणा आपल्यात नक्कीच हवा.” हिला माझं बोलण पटत होत, मग म्हणाली, अहो माझी मैत्रीण नीता पण मला हेच म्हणत होती, “ अग आता तुझ्या मुलीचं लग्न होईल, जावई येईल, अशीच गरीब रहाशील तर जावई आणि मुलीच्या सासरचे लुबाडत राहतील, आधीच तुझ्या सासरच्या लोकांनी तुला लुबाडून झालेच आहे.” मी म्हणालो, “तूच बघ, तुझ्या जवळच्या मैत्रिणी सांगतात तेव्हा तरी तुला पटत आहे ना?” हिने मान डोलावली खरी पण मनापासून नव्हती. म्हणाली,
“आपल्या चांगल्या वागण्याचा हिशेब परमेश्वराजवळ नक्कीच असतो. आपण लोकांना मुठीने दिल तर तो आपल्याला ओंजळीने देतो. आणि आपण चांगल वागून सुद्धा जे आपल्याला फसवतात ते नियतीकडून कधीतरी लुबाडले जातातच.” त्यावेळी मी हिला जास्त काही बोललो नाही. मला हिच्या चांगुलपणाची कीव आली, हिची दया आली, म्हणल, ‘परमेश्वरच तुझ कल्याण करो.’
आमच्या चिमुच लग्न ठरल म्हणजे तिनेच ठरवलं आम्ही त्याला नुसता होकार दिला. तर सांगायची गोष्ट म्हणजे मला वाटलं आता माझी खर्चाकडून चांगलीच धुलाई होणार. लेकीच्या सासरचे तर लुबाडणारच आणि त्याबरोबर घरचे पण हात धुवून घेणार. हिच्याकडून भारी भारी साड्या वसूल करणार. ही मोठ्या मनाने सगळ्यांना तथास्तु म्हणणार आणि पैठण्या घेऊन देणार. मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक आलेच पुन्हा. सगळ्यांना ही ओंजळ भरून देत राहणार. पुन्हा हौस मौज, जावयाच लेकीच कौतुक ह्यापायी आम्ही लुटले जाणार. म्हणल , ‘परमेश्वरा तूच आवर रे माझ्या बायकोला’
पण मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. हिच्या मैत्रिणी, आमचे नातेवाईक झाडून सगळे हिच्या मदतीला धावून आले तेही निरपेक्षपणे. कोणी हिच्याकडून काही अपेक्षा ठेवली नाही. उलट स्वत:च्या खिशाला वेळप्रसंगी झळ लावून घेऊन मदत केली. आख्खं रुखवत सगळ्या मैत्रिणीनी बनवून दिल. वाणी, दुधवाला न सांगता घरात हवी ती मदत करत होते. वाणी वाट पहायला न लावता घरपोच वाजवी दारात सामान आणून टाकत होता. सोसायटीचा रखवालदार सोसायटीचे लोक सारखं हिला विचारून येत जाता काम करून जात होते. साऱ्या सोसायटीची सजावट सगळ्या लोकांनी मिळून केली. लेकीच्या सासरच्यांनी तर फक्त नारळाची मागणी केली.लेक तर खुप इमोशनल झाली होती. म्हणाली, आयुष्यभर माझ्यासाठी खूप केल आईने आता माझ्यासाठी जास्त खर्च करू नका.आणि मला तिचा एकही दागिना नको आहे. तिनेही थोडक्यात खर्च आवरता घेतला. लग्नाचा खर्च माझ्या अपेक्षेच्या अर्धा झाला. तरिही लग्न धुमधडाक्यात पार पडलं. हिने आयुष्यभर सगळ्यांसाठी दिलेला मदतीचा हात वेळेला उपयोगी पडला. हिच्या परमेश्वराने आखेर हिच्या पदरात झुकत माप टाकल होत.
आता आमचं सगळ चांगल आहे. जावई आणि लेक परदेशात सुखात नांदत आहेत. मोठ्या पगाराच्या, मोठ्या हुद्द्याच्या पोस्ट वर आहेत. हिलाही चांगली पेन्शन आहे. २००० स्क़्वेर फिटच्या flat मध्ये रहात आहोत. सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आनंदात व्यतीत करत आहोत.हिच्या म्हणण्याप्रमाणे हिला लुबाडणारे फारसे शांतीचे जीवन जगत नाही आहेत. कुठे तरी मनात सल घेऊनच जगत आहेत. असो , आता हिच्यातही बराच बदल झाला आहे. जास्त फसवली जात नाही. सावध असते. पण अहो मलाच बेमालूमपणे फसवत असते. आणि म्हणतात ना , मेरी बिल्ली मुझपर म्याव असं झालं आहे आता.

जयश्री देशकुलकर्णी
९४२३५६९१९९

Group content visibility: 
Use group defaults

तुम्ही आयुष्यात कुणाला, बावळट आहे, सरबरीत आहे असं म्हणत असालच की. मग का आंजावर फक्त गुडीगुडी वागुन/ लिहुन दुसर्‍याचा निषेध करायचा.>>> नाही, मी माझ्यापुरते तरी सांगू शकते की मी असे दुहेरी वागत नाही, अन राहिली गोष्ट निषेधाची, तर तो ही मी नोंदवला नाही, फक्त जे पटले नाही, आवडले नाही ते स्पष्ट सांगितले इतकेच

गुडीगुडी वागुन/ लिहुन दुसर्‍याचा निषेध करायचा.>>>> व्ही.बीचा स्टँड अजिबात तसा वाटला नाही.वरच्या प्रतिसादात तिने स्पष्ट केलंय.

अरे जाऊ द्या- प्रत्येक जण आपल्या नवऱ्याला आणि बायकोला कधी ना कधी बावळट म्हणतोच( मनातल्या मनात तरी)

सस्मित - योग्य मुद्दा !!! हे असे आहे म्हणून मी मायबोली वर काही लिहत नाही, लिखाण स्वातंत्रच नाहीय ☺️

हे असे आहे म्हणून मी मायबोली वर काही लिहत नाही>>>> लिहा ओ तुम्ही. लिखाण स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला. फक्त प्रतिसादांचा लोड घ्यायचा नाही. Happy

तरी बरं की कथा एका स्त्री ने लिहिली आहे. पुरुष लेखक असता तर हा लेखक स्वतःच्याच बायकोला बावळट म्हणतोय म्हणून तुटुन पडले असते सगळे.+१

प्रतिसादा बद्दल सर्वाना धन्यवाद
ऑफिस मध्ये मैत्रिणीला पडखाऊपणे वागताना आणि तिचा इतरांनी फायदा घेताना मी पाहिलं आहे. ती माझी जवळची मैत्रीण असल्यामुळे मी तिला चिडून म्हणायची सुध्दा “ तू बावळट आहेस का ग?” त्यावर ती म्हणायची “ मला नात्यातली सहजता आवडते. तेढ आवडत नाही.” मी तिला बऱ्याच वेळा म्हणलं, “मी तुझ्यावर कथा लिहिणार आहे.” तेव्हा ती खेळकरपणे म्हणायची, “खुशाल लिही.”
माझा नुकताच ८ फेब्रुवारीला ‘परीसस्पर्श’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. त्यातल्याच काही कथा मी इथे पोस्ट केल्या आहेत. ह्या कथासंग्रहा मधल्या बहुतेक कथा सत्यकथा आहेत. फक्त पात्रांची आणि स्थळांची नावे बदलली आहेत, आणि थोडाफार फेरबदल केला आहे. सर्वात प्रथम माझ्या मैत्रिणीने माझा कथासंग्रह विकत घेतला आणि मला अभिप्राय कळवला.

प्रतिसादा बद्दल सर्वाना धन्यवाद
ऑफिस मध्ये मैत्रिणीला पडखाऊपणे वागताना आणि तिचा इतरांनी फायदा घेताना मी पाहिलं आहे. ती माझी जवळची मैत्रीण असल्यामुळे मी तिला चिडून म्हणायची सुध्दा “ तू बावळट आहेस का ग?” त्यावर ती म्हणायची “ मला नात्यातली सहजता आवडते. तेढ आवडत नाही.” मी तिला बऱ्याच वेळा म्हणलं, “मी तुझ्यावर कथा लिहिणार आहे.” तेव्हा ती खेळकरपणे म्हणायची, “खुशाल लिही.”
माझा नुकताच ८ फेब्रुवारीला ‘परीसस्पर्श’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. त्यातल्याच काही कथा मी इथे पोस्ट केल्या आहेत. ह्या कथासंग्रहा मधल्या बहुतेक कथा सत्यकथा आहेत. फक्त पात्रांची आणि स्थळांची नावे बदलली आहेत, आणि थोडाफार फेरबदल केला आहे. सर्वात प्रथम माझ्या मैत्रिणीने माझा कथासंग्रह विकत घेतला आणि मला अभिप्राय कळवला.

प्रतिसादा बद्दल सर्वाना धन्यवाद
ऑफिस मध्ये मैत्रिणीला पडखाऊपणे वागताना आणि तिचा इतरांनी फायदा घेताना मी पाहिलं आहे. ती माझी जवळची मैत्रीण असल्यामुळे मी तिला चिडून म्हणायची सुध्दा “ तू बावळट आहेस का ग?” त्यावर ती म्हणायची “ मला नात्यातली सहजता आवडते. तेढ आवडत नाही.” मी तिला बऱ्याच वेळा म्हणलं, “मी तुझ्यावर कथा लिहिणार आहे.” तेव्हा ती खेळकरपणे म्हणायची, “खुशाल लिही.”
माझा नुकताच ८ फेब्रुवारीला ‘परीसस्पर्श’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. त्यातल्याच काही कथा मी इथे पोस्ट केल्या आहेत. ह्या कथासंग्रहा मधल्या बहुतेक कथा सत्यकथा आहेत. फक्त पात्रांची आणि स्थळांची नावे बदलली आहेत, आणि थोडाफार फेरबदल केला आहे. सर्वात प्रथम माझ्या मैत्रिणीने माझा कथासंग्रह विकत घेतला आणि मला अभिप्राय कळवला.

ॲमी , झकास प्रतिक्रिया.
इथले काही प्रतिसाद वाचून कळलं, माहेरची साडी इतका का गाजला होता.

त्या मैत्रिणीला माहित आहे हे सगळे, तर मग प्रश्नच मिटला, आवडो वा न आवडो, जिच्यावर लिहीलेय , तिला काही हरकत नाही मग झाले

पुढच्या वेळी मैत्रिणीचा कंसेंट घेतला नाही तरी चालेल,माबो वरच्या या सर्व आयडींचा कंसेंट आधी घ्या.☺️

पुढच्या वेळी मैत्रिणीचा कंसेंट घेतला नाही तरी चालेल,माबो वरच्या या सर्व आयडींचा कंसेंट आधी घ्या >>> +११११

सस्मित+१

बकी मला कथा आवडली नाही. सुरुवात वाचुन काही तरी गमतीशिर शेवट असेल असे वातले होते की नवरा तिला बावळट समजत असतो पण ती ढलगज निघते आणि नवर्‍यालाच बावळट बनवते टाईप्स.. किंवा किमान नवरा तिला बावळट समजत असतो आणि नंतर तिच्या परोपकारी वृत्तीने त्याचे डोळे उघडतात टाईप्स..
असो!

वापर करून घेण्यासाठी म्हणूनच मी जिच्याशी लग्न केलं तिचा इतरांनी(यात माझे आईवडील, आमची मुलगीदेखील आलेच) (गैर?)वापर करू नये असे मला वाटते.<- असे विचार असणारा पुरुष 'बावळट' नक्कीच नाही. Its complicated आहे.
===

बाकी जयश्रीचे लेखन मला रोचक वाटते. स्त्रियांची व्यक्तीरेखा बऱ्यापैकी human पद्धतीने रंगवतात (देशपांडे बाई, मोकळा श्वासमधल्या मुली) त्या. नाहीतरी मराठी आंजावरच्या स्त्रीव्यक्तीरेखा बऱ्याचदा श्यामची आई साच्यातून काढलेल्या असतात Sad
खरंतर नंदिनीची एक कथा (बाळाला अफू देऊन झोपावणारी आई) आणि चैतन्य रासकरची एक कथा (नवऱ्याच्या डोक्यात कुकर घालावासा वाटणारी बायको), राजश्रीची जैन शेजारीण याखेरीज अजून कुठली ऋण स्त्री व्यक्तीरेखा लगेच आठवतदेखील नाहीय.
===

आणि हो
आपण जाणूनबुजून ट्रोल करत नाहीय याची खात्री जोपर्यंत स्वतःला असते तोपर्यंत लेखाबद्दल ऋण प्रतिसाद अगदी बिनधास्त द्यावेत. लेखकाने स्पोर्टींगली घ्यायचे कि कसे हेकाही आपल्या हातात नाही. ज्या लेखकाना ऋण फीडबॅक नको आहे त्यांनी तसे सांगावे, म्हणजे त्यांचे लेख वाचणं बंद करता येईल Wink

आपण जाणूनबुजून ट्रोल करत नाहीय याची खात्री जोपर्यंत स्वतःला असते तोपर्यंत लेखाबद्दल ऋण प्रतिसाद अगदी बिनधास्त द्यावेत. लेखकाने स्पोर्टींगली घ्यायचे कि कसे हेकाही आपल्या हातात नाही. >>>>> +१

ज्या लेखकाना ऋण फीडबॅक नको आहे त्यांनी तसे सांगावे, म्हणजे त्यांचे लेख वाचणं बंद करता येईल> >>>>>>>>> किंवा वाचुन प्रतिक्रिया ऋण असेल तर प्रतिक्रिया देणं बंद करता येइल.

पुढच्या वेळी मैत्रिणीचा कंसेंट घेतला नाही तरी चालेल,माबो वरच्या या सर्व आयडींचा कंसेंट आधी घ्या >>> +११११
च्रप्स यु सेड इट. Happy

वाचकांनी धन आणि ऋण प्रतिक्रि या अनु क्रमे निळया आ णि लाल रंगात द्या व्यात. ज्यांना फक्त धन प्रतिक्रिया हव्यात अशा ले खकांची आ णि त्यांच्या फॅन्सची सोय होईल. Wink

मी ऋण प्रतिसादांना घाबरत नाही. लेखकाच्या/लेखिकेच्या दृष्टीकोनातूनच वाचकांनी कथेकडे पहावे या मताची मी नाही. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. म्हणूनच तर कथेला विषय मिळतात.

कथा आवडली नाही.
आता काही तरी ट्विस्ट येईल मग येईल अशी आशा काही काळाने मावळली. मग स्क्रोल करत शेवट वाचला.
तुमची लेखनशैली चांगली आहे, पुढे काय झालं असेल हे समजण्याची उत्कंठा ही सुरुवातीला मला वाटू लागली पण कंटेंट फारच साधा होता त्यामुळे मजा आली नाही.
सत्यकथा असेल का काल्पनिक कथा वाचणार्‍याला कथेच्या शेवटाला जे घडतं ते तसं का झालं हे पटण्यागत काही तरी स्पष्टीकरण मिळणे मला आवशयक वाटते. ते त्याला/ तिला पटो न पटो, ते अगदी सर्वमान्य लॉजिकल असलं पाहिजे असा ही आग्रह नाही, गूढ, जादू काहीही असेल पण ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसला नाही.

कथा पूर्ण वाचवली नाही, दोन तीन परिच्छेदानंतर अशक्य झाले पुढे वाचणे, थेट शेवट वाचला.

पण म्हणून अशी माणसे नसतात, कथा काल्पनिक आहे असे अजिबात नाही. असेही लोक असतात, मग तुम्ही त्यांना बावळट म्हणा नाहीतर मूर्ख म्हणा. त्यांना समजून शहाणे करायचे कितीही प्रयत्न केले तरी ते ढिम्म राहतात. कोणी नोकरी करतेय म्हणून शहाणे असणार असे अजिबात नाही.

पुढील लेखनाला शुभेच्छा.

मी ऋण प्रतिसादांना घाबरत नाही. लेखकाच्या/लेखिकेच्या दृष्टीकोनातूनच वाचकांनी कथेकडे पहावे या मताची मी नाही. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. म्हणूनच तर कथेला विषय मिळतात>>>

बरे वाटले वाचून. प्रतिसाद उलट सुलट येणारच. त्यातून शिकून पुढे अजून लिहा. तुम्हाला शुभेच्छा!

<मी ऋण प्रतिसादांना घाबरत नाही. लेखकाच्या/लेखिकेच्या दृष्टीकोनातूनच वाचकांनी कथेकडे पहावे या मताची मी नाही. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. म्हणूनच तर कथेला विषय मिळतात.>

छान वाचलं वाटून. ऋणप्रतिसादविरोधी संघटनेच्या सदस्यांनी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे.

बरंच विचार मंथन चालू आहे. मला वाटते वाचकाला जरुर ऋण प्रतिसाद देण्याचा अधिकार आहे. तसाच लेखकाला देखील त्याच्या पाहण्यात/कल्पनेत आले ते मांडण्याचा. लेखक देखील आपल्यापैकीच एक असतो. तोही चुकू शकतो. त्याने लिहिलेले ब्रह्मवाक्य होत नाही. पण कधी कधी ऋणप्रतिसादाची भाषा पाहिल्यावर वाटते की या प्रतिसादाचा उद्देश भरकटलाय. मग कुणीतरी सांगावं लागतं कथेकडे कथा म्हणून पहा. माणसाच्या प्रत्येक कृतीला एकाच तर्काची जोड देता येईल असे मला तरी वाटत नाही. तसे असते तर सर्वांंचे वर्तन सारखे झाले असते. म्हणून गोष्टी जन्म घेतात. मला जसे वाटते तसेच इतरांनी वागावे असे म्हणण्यासारखेच आहे हे. माणूस कुठल्या परिस्थितीत कसा वागेल यांचे ठोकताळे कधीच नव्हते आणि नसतील.
कथेत एखादी गोष्ट चुकीची असू शकते ती जरुर सांगावी लेखकाला पटले तर तो ती सुधारु शकतो.

पण म्हणून अशी माणसे नसतात, कथा काल्पनिक आहे असे अजिबात नाही. असेही लोक असतात, मग तुम्ही त्यांना बावळट म्हणा नाहीतर मूर्ख म्हणा. त्यांना समजून शहाणे करायचे कितीही प्रयत्न केले तरी ते ढिम्म राहतात. कोणी नोकरी करतेय म्हणून शहाणे असणार असे अजिबात नाही.>>> Agadi barobar.
Mi swataha perfect example aahe.
Jau aani sasu barobar bahini hi asach vagatat mazya barobar hi. Mi 30 varsha purvichi nahi sadhya pan ashich aahe. I'm in my thirtees.
I'm in good in my professional life all.
He many karanyasathi pan mala 4divas lagale manachi tayari karayala.

Pages