भेटली फारा दिसांनी

Submitted by चैतन्य दीक्षित on 18 April, 2019 - 06:47

भेटली फारा दिसांनी
बोलली मनमोकळे
बदलले संदर्भ तरिही
हास्य ओठी कोवळे!

प्रश्न होते जे मनातच
लाभली त्यां उत्तरे
अन् नव्या प्रश्नावलीचे
भेटले मज चेहरे

बोलणे, बघणे तिचे
अन् मौन वा झुकती नजर
शक्यतांच्या शक्यतांचे
लाघवी फसवे पदर!

भेटल्याची एक तृप्ती
आणि हुरहुरही जरा
यातले लपवू न शकला
कोणताही चेहरा!

भेटणे पुन्हा घडावे
वाटते दोघांसही
पण कधी? केव्हा? कसे?
ठाऊक ना दोघांसही!

~ चैतन्य

Group content visibility: 
Use group defaults

छान.

तयारी असेल तर जावा पळून. डेरींग इज नेसेसरी फॉर सक्सेस इन लव्ह. आल्सो इन आदर गोष्टी बट लव्ह इज लव्ह. इफ यू गेट लव्ह नो आदर गोष्टी इंपारटन्ट.
(विषयांतराबद्दल क्षमस्व.)

दत्तात्रयजी, धन्यवाद.
मुग्धमानसी यांची खूप सुंदर कविता वाचायची राहून गेली होती.