मर्द को दर्द नाही होता - खरा सुपरहिरो (चित्रपट परीक्षण)

Submitted by अज्ञातवासी on 17 April, 2019 - 09:14

हा चित्रपट बघणारा मी संपूर्ण थेटरात एकटा माणूस होतो.
आणि लगोलग त्याचा पुढचा शो बघणारा सुद्धा. पर्सनल स्क्रिनिंग म्हणा ना!
(आणि तिसरा शो झालाच नाही. लगोलग त्या स्क्रीनवर केसरी चढवला गेला.)
पण जे मी बघितलं, ते अदभुत होतं.
तर, जास्त पाल्हाळ न लावता, सादर आहे, मर्द को दर्द नही होता - cliche bollywood review!!!
जेव्हा पहिल्यांदा या चित्रपटाचं नाव ऐकलं, तेव्हाच माझ्या मनात एक नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली होती. जेव्हा पोस्टर बघितलं, तेव्हा तर अजूनच! म्हटलं हे काय B ग्रेड सिनेमासारख. नवा हिरो, नवीनच हिरोईन आणि गुलशन देवैय्या. म्हटलं असेल, एखाद्या बडे बापने आपल्या मुलाला लॉन्च करायला काढलेला (उदा रमय्या वस्तवैया, जिनियस... नको, नको त्या आठवणी)
मात्र हा काय प्रकार आहे, तो बघूयात म्हटल्यावर विकिपीडियावर बघितलंच! आणि, तिथेच मी पूर्णपणे चुकीचा ठरलो.
चित्रपटाची कथा सांगायची झाली तर, सूर्या या चित्रपटाचा हिरो, याला एक आजार असतो. याला कुठलीही वेदना जाणवत नाही. म्हणजे कापलं, खरचटलं, कुणी मारलं, काहीही वेदना नाही! अशातच लहानपणी आई एका अपघातात वारलेली. या कंडिशनमध्ये सूर्याची जगण्याची शक्यता खूप कमी असते, म्हणून त्याच्या बाबांनी त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक बंधने लादलेली असतात. मात्र त्याचे आजोबा त्याला यातून लपून छपून बाहेर काढून मार्शल आर्टसची ट्रेनिंग देतात. त्यातच एकदा त्याला १०० माणसांना एकहाती लोळवणारा लंगडा कराटे मास्टरचा विडिओ मिळतो. तो बघून त्याला एकलव्याप्रमाणे सूर्या आपला गुरू मानतो,आणि त्याच्याप्रमाणे बनण्याची स्वप्ने बघत मोठा होतो. मोठेपणी अचानक त्यांची भेट होते, आणि या चित्रपटाची कथा पुढे सरकते, आणि दोन्हीही एका मिशनवर निघतात. (जास्त स्पोईलर नको Happy
चित्रपटाची कथा ही आजपर्यंत मी बघितलेल्या सगळ्या मसाला चित्रपटांचीच आहे. मग ते बॉलीवूड असो व हॉलीवूड. पण, पटकथा अशी सुरेख बांधली गेलीये ना, इट्स माईंड ब्लोइंग... या कथेत हिरो आहे, त्याची लहानपणी वारलेली आई आहे, लहानपणीची दूर गेलेली आणि तरुणपणी भेटलेली मैत्रीण आहे, सायको विलेन आहे, एक चांगला एक वाईट डबल रोल आहे, सगळं आधी बघितलेलं आहे. पण, इथे प्रचंड भन्नाट अनुभव येतो. काही दृश्य बघताना तर हसूच आवरत नाही. काही संवाद...
'बेटा, तुझे ब्रूस ली नही, सहेली की जरूरत है!' (इथे मला तुंबाड आठवला. 'तब तक क्या?')
दर पाच मिनिटाला असे प्रसंग येतात की हसूच आवरत नाही. प्रचंड वेग, कुठेही फाफटपसारा नाही, आणि मध्येच अशी विनोदाची पेरणी... क्लास!!!
संगीत जमून आलंय. रप्पान रप्पी रॅप, नखरेवाली आणि किथो दा तू सुपरस्टार... ऐकाच...
चित्रीकरण जबरदस्त झालंय. पूर्णपणे रिअलिस्टीक. स्लो मोशनचा वापर फायटिंग मध्ये अजून रंगत आणतो. लोकेशनही सुरेख निवडल्या आहेत. ऍक्शन दृश्य तर इतकी सुरेख चित्रित झाली आहेत, की चायनीज चित्रपट हिंदी कलाकारांसोबत काढलाय का, असं वाटत राहतं. प्रत्येक किक आणि पंच खराखुरा वाटतो. (तरीही चित्रपट कमीत कमी बजेटवर बनलाय हे जाणवतच.) क्लायमॅक्सतर ऍक्शन चित्रपटांसाठी आदर्श ठरावा.
कॅरेक्टर डेव्हलपमेंटसाठी तर हा चित्रपट मास्टरपीस ठरावा. अगदी छोट्यात छोट्या कॅरेकटरचा नीट विचार करूनच ते पडदयावर उतरवलं गेलंय. लहानपणासून आपल्याच फॅन्टसी मध्ये जगणारा सूर्या समर्थपणे पडदयावर येतो. त्याचा शारीरिक वेदना न जाणवण, पण त्याबरोबर मानसिकही जास्त त्रास न होणं हेही जाणवतं. त्याचे वडील जेव्हा लग्नाचा दुसरा निर्णय घेतात, तरीही त्याला काही वाटत नाही. त्याचं जगच वेगळं दाखवलंय. त्याची काळजी करणारे, आणि तरीही साथ देणारे आजोबा. त्याची घरगुती हिंसेची शिकार पण स्ट्रॉंग मैत्रीण सुप्री, ओव्हर प्रोटेक्टिव्ह बाबा आणि दुसरं लग्न करताना सूर्याची काय प्रतिक्रिया असेल, याचा विचार करणारे बाबा. अतिशय ताकदवान पण आता असहाय, लाचार झालेला मास्टर मनी, आणि त्याचा सायको जुळा भाऊ जिमी. अक्षरशः सिक्युरिटी गार्डससुद्धा लक्षात राहतात... अप्रतिम...
कलाकारांच्या भूमिका तर इतक्या जमून आल्या आहेत, की त्यांच्याशिवाय त्या भूमिकेत दुसऱ्या कुणाचा विचार करणं अशक्य व्हावं. सूर्या म्हणजेच अभिमन्यू दसानी (भाग्यश्रीचा मुलगा...) तर भूमिका जगतो. एक पेनलेस माणूस दाखवताना त्याने जी कमाल केलीये, त्याला तोड नाही. राधिका मदन मला तितकीशी आवडत नाही, पण तिने भूमिका चांगली निभावलीये. सूर्याचे बाबाही भूमिकेत जीव ओततात. (त्यांचा टोनी स्टार्क लूक चुकवू नका)
सूर्याचे आजोबा... प्रेजेंटिंग महेश मांजरेकर... खरंच सॅल्युट... ह्या माणसाशिवाय कोणालाही या भूमिकेत न घेतल्याबद्दल! या माणसाने नुसती भूमिका केलीच नाही, तर ती रंगवली आहे. भूमिकेचा प्रत्येक कंगोरा व्यवस्थित मांडलाय.
...आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, किंबहुना बेस्ट... गुलशन दैवय्या...
मास्टर मणी आणि जिमी, दोन्ही व्यक्तिरेखा याने साकारल्या असल्या तरी कुठेही हा डबल रोल वाटतच नाही. मनीचा असहायपणा आणि जिमीचा सायकोपणा, दोन्हीही सारख्याच ताकदीने तो उभा करतो. डायलॉगतर काय मारतो राव, हसायला येतं आणि संतापही होतो.
सांगता करतांना, हा चित्रपट एक ठरवून बनवलेला एक सेन्सिबल नॉनसेन्स चित्रपट आहे. मागच्या काळातल्या पिटातल्या प्रेक्षकांसाठी म्हणून टवाळी केल्या गेलेल्या गीरफ्तार, पाप को जलाकर राख कर दूंगा, Drunken Master या चित्रपटांसाठी ही आदरांजली आहे. सुपरमॅन आणि आयर्न मॅन सारख्या(जुन्या आठवणी ताज्या झाल्या Wink सुपरहिरो मुविज वर भाष्य आहे. एकदातरी बघाच, कारण आय नो, एकदा बघितल्यावर पुन्हा बघण्याचा मोह आवरत नाही. (एक बार देखा है, बार बार देखने की हवस है Lol
१. 'बेटा तुझे ब्रूस ली की नही, सहेली की जरूरत है'
२. 'आप ऊसे समजाओगे ना, ऊसे माँ का प्यार मिले इसलीये मै शादी कर रहा हूँ'
'हा मै समजाउंगा, यु नीड या सेक्स, इसलीये शादी कर रहा है'
३. 'जादा सोचोगी तो प्लॅन मे लॉजिक नजर आने लगेगा.'
अजून काही रत्नासाठी नक्की बघा. Lol

रेटिंग - ***** + * फॉर गुलशन दैवेय्या अँड महेश मांजरेकर.(आणि झिरो, ठाकरे, उरी आणि अकसिडेंटल प्राईम मिनिस्टरच दुःख कमी केल्याबद्दल)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.
मला पहायचा होता, पण थेटरात टिकलाच नाही !
आता नंतर टिव्ही वर आल्यावर पाहणं आलं..

चांगलं परीक्षण.
म्हणजे हा पिक्चर सिपा डिसऑर्डर बद्दल आहे तर.
प्राईम वर आला की बघेन.
कदाचित नाव ओव्हरकील ठरलं असेल.

छान लिहीलंय. सिनेमाचं नाव खास नाही म्हणुनही पहावासा वाटला नसेल लोकांना की जाहीरात केली नव्हती जास्त? हल्ली मार्केटिंगला पर्याय नाही. भाग्यश्रीचा मुलगा छान आहे. फोटोतच पाहिलाय म्हणा.

लाचार झालेला मास्टर मनी, आणि त्याचा सायको जुळा भाऊ जिमी. >>>>>हा एकच ऍक्टर आहे हे मला मुविच्या शेवटी न्युपपेरच्या हेडिंग मध्ये कळाले.

छान लिहलंय. गुलशन दैवया शैतान, हंटरमधे आवडला होता. मस्त काम करतो.

पण एकच प्रेक्षक असताना सिनेमा दाखवतात तुमच्याकडे? कमीतकमी १० तिकीट विकली गेली तरच शो होतो ना?

श्रद्धे हसतेस काय, तू अशी सिच्युएशन इमाजिन करून बघ, भीती वाटते.
@उर्मिला - लागोपाठ बघितले.
@ मित - हो ना, नाही टिकला, मी वर लिहिलंच आहे, केसरी लावला गेला. नाहीतर तिसरा शोही नक्की बघितला असता.

छान परीक्षण Happy

रमय्या वस्तवैया, जिनियस. >>>>>>> ह्यान्ची गाणी मात्र छान होती. Happy

@blackcat - वर लेखात लिहिलंच आहे.
@अंजली - अगदी।मनातलं बोललात.
@mi_anu - हो त्याविषयीच आहे. लवकर यायला हवा प्राईमवर. पुन्हा बघायला मिळेल. आणि नावाविषयी वर लिहिलंच आहे. अगदी B ग्रेड वाटतं. माझीजी आधी निगेटिव्ह प्रतिक्रिया झाली होती. सो तुमचा मुद्दा बरोबर वाटतो.
@shital pawar - बऱ्याच दिवसांनी मायबोलीवर दिसलात, वेलकम बॅक. तुमचा प्रतिसाद बघून छान वाटलं.
अवांतर - तुमची एक रेसिपी कायम आमच्या घरी होतेय, त्याबद्दल खुप धन्यवाद

@सुनिधी - सुनिधी दर दहा सेकंदानी प्रत्येक जाहिरातीत केसरीची क्लिप लागायची टीव्हीवर, पण याचा साधा उल्लेखही झाला नाही.
युट्युब आणि फिल्म फेस्टिवलमध्ये मात्र जबरदस्त भाव खाल्ला.
आणि अभिमन्यू चांगला दिसलाय. कामही जबरदस्त केलंय, आणि स्टार कीड असूनही वेगळ्या मार्गाचा चित्रपट केला, त्याबद्दल तर विशेष कौतुक.

@अजनबी - धन्यवाद. हो गुलशनला पहिल्यांदा किंवा कमी पाहिलेलं असेल तर वेडेवाकडे केस आणि दाढी मिशी वाढलेला, एक पायाने लंगडा म्हणून हालचाली नीट करू न शकणारा, असहायपणे, लाचारपणे बोलणारा मणी आणि पिंक गॉगल्स, सायको वागणूक, जीभ तोंडात घोळवत बोलणारा, पोनिटेल बांधलेला व गुळगुळीत दाढीमिशी केलेला जिमी ओळखूच येणार नाही.

@ॲमी - धन्यवाद. असा काही नियम आहे असं मलाही माहीत नव्हतं. आणि दोन्ही शोजला हीच परिस्थिती होती. त्यामानाने मी नशीबवान म्हणायला पाहिजे...
पण असं याआधीही झालंय. सुपर डीलक्स ला सुद्धा मी धरून थेटरात सहा लोक होते, तरीही शो झाला.
एक थेटरवाला ओळखीचा आहे, विचारायला हवं...
(पण तू नक्की हा चित्रपट बघ, आणि छोटासा रिवयू दे. तू पुस्तकांची चांगली समरी लिहितेस, म्हणून!)

@सुलू - गाणेच बघून गेलो, (रमय्या वास्तवाईया, जिनियस जरा कन्सेप्ट प्रॉमिसिंग वाटली, आणि नवाजुद्दीन होता म्हणून) आणि फसलो...
तुम्हाला आवडेल असं उदाहरण देतो.
हे तर सुबोध भावे बघायला मिळेल म्हणून 'तुला पाहते रे' बघावं, आणि इशा बघायला मिळावी असं झालं...
Rofl

तसा काही नियम नसावा. फायदा नाही ठिकय पण किमान चित्रपट दाखवायचा खर्चतरी भरून निघावा यासाठी साधारण तेवढी तिकिटं विकली जावी अशी थिएटरमालकाची अपेक्षा असते.
तुझ्या ओळखीतल्या थेटरवाल्याला विचारून बघ.

> (पण तू नक्की हा चित्रपट बघ, आणि छोटासा रिवयू दे. तू पुस्तकांची चांगली समरी लिहितेस, म्हणून!) > आभार Lol बघेन सहज कुठे सापडलातर.

सिपा डिसऑर्डर वगैरे माहित नव्हतं मला पण हे वाचून लिसबेथ सॅलॅन्डरचा सावत्र भाऊ आठवत होता.

@ॲमी - Bingo! मलासुद्धा विकीवर पहिल्यांदा या चित्रपटाचं पेज उघडल्यावर तोच आठवला.

बघितली मुव्ही आणि कारण कळालं, तु back to back 2 shows का बघितले याचं.
परीक्षणाशी word to word सहमत आहे...
(मी तर मुव्ही बघता बघता pray करत होती की हिरो मरू नये शेवटी.. Happy )

भक्त? नाय.
Friend मन्या.पण नाय बघता येणार इथं काकुकडे नाहीए HD channels.

Pages