इंग्रजी-मराठी पुस्तके उपलब्ध असणारी लायब्ररी.

Submitted by मन्या ऽ on 15 April, 2019 - 05:34

इंग्रजी-मराठी पुस्तके उपलब्ध असणारी लायब्ररी पुण्यात कोठे आहे?माझ्या माहीतीतल्या लायब्रीत फक्त मराठी पुस्तके उपलब्ध आहेत म्हणून जाणकरांनी नक्की सांगा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

पुण्यातच नाही, पण तुम्ही ऍमेझॉन बुक्स वगैरे का ट्राय करत नाहीत... वर्ल्डवाईड ऑप्शन आहेत..

मन्या साहेब? साहेब नाय ओ अजुन दादा! Happy dependant student आहे,म्हणून तुमचा option costly आहे सध्यातरी माझ्यासाठी!

उत्तम मराठी पुस्तकांसाठी `पुणे मराठी ग्रंथालय' . पण नारायण पेठेत आहे. विश्राम्बाग वाड्यात पण शासकीय ग्रंथालय आहे. पण तिथे नाव-नोंदणी फार वेळखाऊ आहे आणि वेटिंग अस्त. तीही तुम्हाला लांबच होईल. संतोष हॉल च्या मागच्या भागात दोन आहेत; त्याबद्दल जास्त माहिती नाही.

फिनिक्स लायब्ररी कुमठेकर रस्त्यावर आहे. पुस्तकांचं कलेक्शन उत्तम आहे. पुस्तकांची खूप काळजी घेतात.
फ्लिप साइडच्या गोष्टी म्हणजे इतर वाचनालयाच्या मानाने कमी वेळ चालू असते. आपल्या कामाची / राहण्याची जागा जवळ नसेल, तर मुद्दाम लांब चक्कर मारायला त्रासदायक ठरू शकतं. तसंच वर्गणीही चढी आहे.
ही त्या लायब्ररीबद्दल तक्रार नाही. पण अंतर आणि अन्य काही वैयक्तिक मतभेदांमुळे माझे सूर तिथे जुळले नाहीत. शेवटी मी घराजवळची कमी पुस्तकं असलेली, स्वस्त लायब्ररी लावली आणि त्याव्यतिरीक्त जी पुस्तकं वाचायची असतील, ती विकत घेऊ लागले.

पौड रस्त्यावर पालवी नावाचं रेस्टॉरंट आहे ( की होतं?) त्याच्या मागे विश्वास लायब्ररी आहे. तिथे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमधली पुस्तके आहेत. चांगली लायब्ररी आहे.
अर्थात माझीही माहिती जुनी आहे Happy

Pai friends library खूपच चांगली आहे. जरी तुम्हाला costly वाटली तरीही सांगावसं वाटलं. एकतर ते पुस्तक घरी आणून देतात. ऑर्डर ऑनलाइन किन्वा फोनवर करू शकता आणि मुख्य म्हणजे पुस्तक कितीही दिवस ठेवू शकता. कलेक्शन सुद्धा चांगले आहे.

Thanks to all..रावी संतोष हॉलच्या आसपास नेमकं कुठे कळलं असतं तर शोधायला सोपं पडल असतं तरी नक्की चौकशी करते.

चैतन्य आणि हेमाली तुम्ही दिलेली माहिती वाया जाणार नाही, मला नक्कीच पुढे कधीतरी उपयोगी पडेल.

संतोष हॉलच्या आसपास नेमकं कुठे कळलं असतं तर शोधायला सोपं पडल असतं तरी नक्की चौकशी करते. > संतोष हॉल शेजारच्या लेन मधून सरळ गेल्यावर डेड एन्ड ला आहे. तिथे उजवीकडे वळून गेल्यावर एका मठाजवळ दुसरी आहे. ही माहिती ऐकीव अहे. मी प्रत्यक्ष तिथे गेले नाहीये कधी.

पुणे नगर वाचन मंदिराची वारजे येथे शाखा आहे. संग्रह चांगला आहे. इंग्लिश पण आहेत पण संख्या जरा कमी आहे. शुल्क अत्यल्प आहे. केवळ ३० रु. महिना.

i SAW YOUR OLD QUERY. HAVE YOU JOINED ANY LIBRARY YET ? IF NOT I WILL RECOMMEND JUST BOOKS . ALL LATEST ENGLISH BOOKS
ONE BRANCH IS IN VARAJE . ANOTHER IN MAYUR COLONY.

प्रतिसादासाठी धन्यवाद..मी सध्या नारायण पेठेत पुणे मराठी लायब्ररी जॉईन केली आहे. तिथे english पुस्तकही मिळतात.
आणि वारजे, मयुर कॉलनी साईडला जास्त ये-जा होत नाही.. पण कधी गरज पडली तर नक्की कळवेल. Happy

मी एक सर्व मत खंडन आणि ब्रम्हविद्या रहस्य पुस्तक शोधत आहे. कोणा कडे असेल तर जरूर कळवा

वर उद्ध्रुत केलेल्या लायब्रर्या पुस्तकान्चे डोनेशन घेतात का? प्रत्येक वेळी भारतात आल्यावर अनेक मराठी, सन्स्क्रुत व इन्ग्रजी पुस्तके विकत घेतली आहेत. इथे देखिल पुस्तके विकत घेतली आहेत येथे माझ्या युनिवर्सिटीला, येथील स्टेट लायब्ररीला व चेस क्लबला १२०० पुस्तके दिली आहेत तरी अनेक उरली आहेत म्हणून व घर downsize करत आहे म्हणुन विचारत आहे. पुस्तके as new condition मधे आहेत. पाठवायाचा खर्च मीच करेन. उत्तम वाचक मिळावेत ही अपेक्षा. या लायब्रर्यान्चे पत्ते मिळाल्यास मी त्यान्च्याशी सम्पर्क साधेन. धन्यवाद.