काही इतर हिपोक्रिसी

Submitted by कटप्पा on 13 April, 2019 - 12:57

१. मला स्मोकर्स अजिबात आवडत नाहीत.
हो का? तुझी आवडती व्यक्ती कोण आहे?
शाहरुख खान !

२. मी एक ओपन माइंडेड नवरा आहे, पण तू शॉर्ट स्कर्ट घातलेले मला आवडले नाही.

३.भारतात काय साला करप्शन आहे, कधी थांबणार काय माहीत. मागच्या सिग्नल वर 500 ची नोट द्यावी लागली पोलिसाला सिग्नल तोडला म्हणून.

४. मुक्या प्राण्यांवर दया करा. भूतदया विसरत चालले आहेत लोक.
जेवताना - ही घ्या तुम्ही ऑर्डर केलेली चिकन बिर्याणी आणि मटण करी.

५. ती-प्रेमात लुक्स आणि पैसा कधीच नाही बघितला पाहिजे. सौदा नाही आहे हा, प्रेम बघितले पाहिजे.
तो -बरे झाले तू म्हणालीस - बरेच दिवस तुला माझया मनातले सांगावं म्हणतोय. आय लव यु.
ती- काय? थोबाड पाहिलंयस का आरशात. माझ्या एक वेळचा शॉपिंग चा खर्च तरी झेपणार आहे का तुला??

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

THANK YOU!

अज्ञातवासी >>> मी ही हसलेय त्या वाक्याला, कारण ते वाक्य ईथल्या बर्याच जणांना लागु पडते.
मलातर थोडीफार माहिती होती शशिराम प्रकर्णाची (ते ही त्यांचा आयडी ऊडाल्यावर) तरी सुद्धा वरील वाक्य वाचुन ते फक्त शालींसाठी असेल असे वाटले नाही.
माझ्यासारखे कदाचित अजुन लोक असतील ज्यांना हे सुचले नाही पण तुम्ही ते हायलाईट केले अन लक्षात आणुन दिले. __/\__

कारण ते वाक्य ईथल्या बर्याच जणांना लागु पडते.
>> VB बरोबर. पण लोकांना संबंध जोडण्यापासून थांबवू शकत नाही.

भारतातील एक अभिनेता अमेरिकेत गेला होता. तिथे त्याची कपडे उतरवून चौकशी झाली असावी. तो म्हणाला.
>> मी विशिष्ट धर्माचा आहे म्हणून मला अशी वागणूक दिली.

काय हे. या देशात अजिबात सरकारचं लक्ष नाही. रस्ते किती खराब, रेल्वे अस्वच्छ. किती घाण आहे जागोजागी.
>> मार्च महिना-- अहो इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी काय करावे, कुठला बॉण्ड घेऊ. सीए लाच विचारावं.

आम्ही अध्यात्म करतो. माणसाने अहंकारी असू नये,असं आमचे गुरुजी सांगतात.
>>>> मला समारंभात जेवणाचा आग्रह झाला नाही.. हा मी चाललो..

<अहो इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी काय करावे, कुठला बॉण्ड घेऊ. सीए लाच विचारावं.>

यात काय चुकीच आहे? ही सोय सरकारनेच करून दिली आहे. कुठेतरी गुंतवलेले पैसेही देशाच्या अर्थ व्यवस्थेसाठीच वापरले जातात.
पी पीएफ , एन एस सी मध्ये गुंतवले म्हणजे सरकारला कर्जाऊ दिले की.

सरकारी नोकरांची कर वाचवण्यासाठी चाललेली धडपड जवळून पाहिली आहे. इतकी धडपड काम करताना दिसली नाही. म्हणून म्हणालो. नाही म्हणायला आता लिमिट पाच लाख रुपये झालंय बहुतेक.

अर्थव्यवस्थेबद्द्ल इतकी महान समज असणारे नेहमी भाजप्समर्थकच कसे असतात? कर बुडवणे आणि करनियोजन करणे दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
आणि हो पुरेसा कर रुपी पैसा मिळून तो लोक कल्याणकारी योजनांत लावतांना खाबुगीरी करण्यात जाण्याचा आणि नागरिकांनी कर बुडवण्याचाही काही संबंध नाही.

श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये

यासारखी सर्वोत्तम हिपोक्रिसी अजून कोणती? तिचा मात्र या धाग्यावर अद्याप उल्लेख कसा झाला नाही?

"मळमळतंय, तळमळतंय अरे घ्या ना मग XXX हिर्डा"

=> हि प्रतिक्रिया व्यवसायिक उत्पादनाची जाहिरात करणारी होती. त्यांनी नंतर दुरुस्ती केली. धन्यवाद. हा प्रतिसाद दुर्लक्षित करावा.

मी व माझी मुलं काही झाले तरी राजकारणात येणार नाही.
>> आई अध्यक्ष झाली, आज पोर्गा आहे उद्या पोर्गी व्हयील.

"बायको चं नाव बदलून श्रद्धा ठेवावं म्हणतोय"

=> नावासाठी पण श्रद्धा शब्दच निवडला जातो. अंधश्रद्धा नाही. हि सुद्धा हिपोक्रिसी झाली.

महाराष्ट्रीय >> फार हुशार लोक इथं संधी नसल्याने अमेरिकेत जात आहेत. ब्रेनड्रेन मुळे देशाचे नुकसान होते.
महाराष्ट्रीय >> स्साले युपी,बिहारचे भय्ये सगळीकडे पसरलेत.

परप्रांतीय फेरीवाल्यांमुळे खूप त्रास होतो, त्यांना परत पाठवले पाहिजे.
>> फेरीवाल्यांकडे वस्तू विकत घेणारे निष्पाप आहेत, स्वस्त मिळतंय म्हणून घेतात लोकं.

मी मुसलमानांचा मनःपूर्वक द्वेष करतो, त्यांच्या कडून काही फेवर घेण्याऐवजी मी मरण पत्करीन.
- लिहिणार,
मु पो दुबई
अकाउंटंट - अल बशीर कम्पनी

Pages