काही इतर हिपोक्रिसी

Submitted by कटप्पा on 13 April, 2019 - 12:57

१. मला स्मोकर्स अजिबात आवडत नाहीत.
हो का? तुझी आवडती व्यक्ती कोण आहे?
शाहरुख खान !

२. मी एक ओपन माइंडेड नवरा आहे, पण तू शॉर्ट स्कर्ट घातलेले मला आवडले नाही.

३.भारतात काय साला करप्शन आहे, कधी थांबणार काय माहीत. मागच्या सिग्नल वर 500 ची नोट द्यावी लागली पोलिसाला सिग्नल तोडला म्हणून.

४. मुक्या प्राण्यांवर दया करा. भूतदया विसरत चालले आहेत लोक.
जेवताना - ही घ्या तुम्ही ऑर्डर केलेली चिकन बिर्याणी आणि मटण करी.

५. ती-प्रेमात लुक्स आणि पैसा कधीच नाही बघितला पाहिजे. सौदा नाही आहे हा, प्रेम बघितले पाहिजे.
तो -बरे झाले तू म्हणालीस - बरेच दिवस तुला माझया मनातले सांगावं म्हणतोय. आय लव यु.
ती- काय? थोबाड पाहिलंयस का आरशात. माझ्या एक वेळचा शॉपिंग चा खर्च तरी झेपणार आहे का तुला??

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

६.
"साला ह्या मराठी लोकांना झाले तरी काय? मद्राशी सिनेमे आवडतात त्यांना आजकाल. असा एक लेख पब्लिश करतो ना, की ह्यांनी मद्राशी सिनेमे बघायचंच सोडून द्यावं"

"वा वा, छान कल्पना. आयडी काय म्हणालात तुमचं?"

"बाहुबली!"

4 नाही कळले.
जेवणासाठी आयदर प्लॅन्टस मारा नाहीतर कोंबडी. काय डिफेरेन्स आहे.

दूध पिणारे आणि स्वतःला व्हेजिटेरिअयन समजणारे तर माझ्या डोक्यातच जातात.
प्राण्यांचे दूध चालते, मग अंडे का नाही?

हे मद्रासी लोक... जातात तिकडे स्वतः चे लोक आणतात,
परांजपे साहेबाच्या वेळेला आपल्या सेक्शनला एक नॉन मराठी येऊ दिला नव्हता त्याने, हे सुब्रमण्यम साहेब आले, आणि हळूहळू सगळे आंडूगुंडू लोक भरले

माझ्याकडे आयफोन, हार्ले डेव्हीडसन, मर्सीडिझ आहे. तुझ्या कडे कोठून आले? चोऱ्या करत असशील.

४. मुक्या प्राण्यांवर दया करा. भूतदया विसरत चालले आहेत लोक.
जेवताना - ही घ्या तुम्ही ऑर्डर केलेली चिकन बिर्याणी आणि मटण करी.
<<

जेवण अन भूतदया यात फरक आहे. जे चिकन अन बकर्‍या मटणासाठीच वाढवल्या जातात, त्याला पोल्ट्री/गोट "फार्म"च म्हणतात, ते मारून खाल्लेच जाणार.
त्यात भूतदया येते, ती त्या प्राण्यांच्या ट्रान्स्पोर्ट, कत्तलखान्यात हालहाल न करता, वेदना कमीत कमी होतील या पध्द्तीने मारणे. त्या प्राण्यांना आजारपण आल्यास त्याचे उपचार करणे, इत्यादि प्रकारांनी. एवढे करूनही तो प्राणी नंतर मारून खाल्लाच जाणार हे तर नक्कीच.

****
माझ्याकडे आयफोन, हार्ले डेव्हीडसन, मर्सीडिझ आहे.

<<
अन लेका तू दिवाळीला चायनीज दिवे घेतोस? आपल्या देशातले कारागीर इतक्या कष्टाने पणत्या बनवतात, त्यांची पोटं भरत नाही. अरे देशद्रोह्या, तुला लाज कशी नाही वाटत ?

"५० दिवसात तुम्हाला तुमच्या स्वप्नातला भारत नाही मिळाला तर मला भर चौकात शिक्षा द्या"

"अहो पण ७० वर्षात त्यांना जे जमलं नाही ते मला ५ वर्षात कसं जमणार?"

शबरीमला मंदीर प्रवेशासाठी हिंदू स्त्री किती दुय्यम स्थानावर आहेत हे इतर धर्मीय स्रियांची मानवी साखळी.
>> आमच्या धर्मात ढवळाढवळ करण्याचा अधिकार कुणाला नाही.

आरक्षण मिळालेच पाहिजे.
>>> आर्थिक आधारावर नाही तर जन्माने मिळालेल्या जातीवर आधारितच पाहिजे.

जात नष्ट झालीच पाहिजे.
>> जातीनुसार जनगणना झाली पाहिजे. जात प्रमाणपत्र वेळेत मिळायलाच हवे.

बायको शिकलेली व नोकरी करणारी असावी.
>>> सुगरण असावी, चारी ठाव स्वैपाक करता आला पाहिजे.

काही रिपीट झाल्या असतील..

गावाकडील.. आम्ही शाकाहारी आहोत, गळ्यात माळ्ळे तुळशीची.
>> थोड्याफार शेळ्या आहेत नि आपली पोल्ट्री हे भाऊ बॉयलरची.

पाचशे हजार या मोठ्या रकमेच्या नोटांमुळे भ्रष्टाचार करणं आणि काळा पैसा साठवणं सोपं होतं म्हणून त्या रद्द केल्या
आणि दोन हजाराची नोट आणली.

उत्तरपूर्व भारत, केरळ , गोवा आणि इतर जागा सोडून जिथेजिथे मत मिळायला गरज आहे तिथे सर्वत्र गाय आमची माता आहे.

बाहेर लोकांमध्ये वावरताना काहीजण अंधश्रद्धा/बुवाबाजीला विरोध करतात;घरात मात्र स्वतःच याला खतपाणी घालतात!(स्वानुभव)

काही म्हणा मोदींनी आपले ते खरे केलेच. नोटबंदी, जीएसटी, तीन तलाकचा पाठपुरावा, समान पेन्शन वगैरे वगैरे वगैरे.

Pages