.

Submitted by अज्ञातवासी on 13 April, 2019 - 08:19

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही तुमच्या लेखनाच्या फॅन्सची परीक्षा घेत नाही, असे गृहित धरून लिहितोय.

मायबोलीवरचं अकाउंट कायमचं डिलीट कसं करावं हे विचारायचंय का तुम्हांला?
१. अ‍ॅडमिन्/वेबमास्तरांना प्रत्यक्ष विनंती करून. पण ती विनंती मान्य होईलच याची खात्री नाही.
२. मायबोलीवर हाहाकार माजेल असा गोंधळ घातला तर वेमा स्वतःच तुमचा अकाउंट फ्रीज करतात, बहुतेक वेळा.

हाहा.. इस माबो मे इंसांन आता अपनी मर्जी से हैं, लेकिन जाता सिर्फ अडमीन की मर्जी से.....

1.राजकारण ग्रुप जॉईन करा आणि हाणामाऱ्या करा.
2. 15+ वर्ष जुन्या आयडीन सोबत वाद घाला.

थँक्स भरत!
आणि नाही नाही, परीक्षा वगैरे काही नाही. फक्त कुठेतरी थांबवस वाटतंय.
अर्थात विनंती करूनच अकाउंट डिलिट करावं लागेल, गोंधळ वगैरे घालणं काही जमणार नाही मला!

३ mhine idle rahile without login tar automatically deactivate honar ase navin mayboli niyamwali sangte

अज्ञात वासी अहो तीन महिने तुम्ही लॉगिन नाही केलेत तर ते आपोआप डिअ‍ॅक्टिवेट होते अकाउंट. पण अट्टल माबोकरास इतका धीर कधीही धरवत नाही. असे उदाहरन माझ्यादेखील पाहण्यात नाही. करून बघा. ऑफिसात अ‍ॅडमिनला माबो ब्लॉक करायला सांगायचे. व घरी क्रोम अ‍ॅप वरून साइट ब्लॉक करायची लॉग आउट करून. मग इतर काहीही ऑनलाइन करायचे पण अनब्लॉक करायचे नाही. हे अ‍ॅप फोन वर पण उपलब्ध आहे.

सभासदा कडून काही चुकीचे पोस्ट झाल्यास आपोआपच अकाउंट फ्रीज / ब्लॉक होते.

अगदी मनात विचार आला आणि बाफ दिसला म्हणून लिहीले.

रोमात किंवा वाचनमात्र राहणे. हे देखील कधी कधी अशक्य प्राय होते. पण आरोग्यासाठी उत्तम.

धन्यवाद अमा, पण कथा पूर्ण करून जायचंय.
आणि तीन महिने, अशक्यप्राय वाटतंय...webmaster ला विनंती हाच पर्याय वाटतोय.
पण बघेन प्रयत्न करून...

<अज्ञात वासी अहो तीन महिने तुम्ही लॉगिन नाही केलेत तर ते आपोआप डिअ‍ॅक्टिवेट होते अकाउंट> कुठे आहे असा नियम?

असा काहीही नियम नाही. आणि अकाउंट डिलीट होते का याबद्दल शंका आहे. कारण अडमिनने अकाउंट फ्रीज केले तरी त्या आयडीचे लेखन व प्रतिसाद दिसत राहतात. फेसबुकवर अकाउंट डीऍक्टिव्हत केले की त्या अकाउंटचा मागमूसही दिसत नाही. तसा पर्याय माबोवर नाही/नसावा.

अकाउंट चालू राहिले तरी काय फरक पडतोय. तुम्ही भेट देऊ नका, बस.

सर्व प्रतिसादकांचे आभार.

@कटप्पा - नको तिथे पिंका टाकायच्या थांबवा. मी पर्सनल अटॅक करत नाही, but who the **** are you? आणि एक अनाहूत सल्ला.. प्रेमबीम करायची मायबोली ही जागा नाही. जग फार मोठं आहे. आणि माझ्या पर्सनल गोष्टी विचारायचा अधिकार मी कुणालाही दिलेला नाही, कुणालाही नाही. मी जे शेयर करेन तेवढंच।

हा धागा आताच उघडला आणि माझे प्रतिसाद अगोदरच पाहून आश्चर्य वाटले. शिवाय "असे विचार कुठून आले तुझ्या डोक्यात?" असं कसं कधी लिहिलं मी?

(( मग लक्षात आले प्रतिसाद @Srd ने लिहिले आहेत, आणि मी Srd आहे!!))
- Srd ( शरद )

धागा बंद झाला म्हणजे प्रश्न सुटला असेलच.अडमीन ना विनंती करून करता येत असेल.किंवा मायबोलीवर न लिहिते न वाचते राहून स्वतःपुरता प्रश्न सोडवता येत असेल.
सोशल नेटवर्क गंभीर घ्यायची वस्तू नाही.तो खऱ्या जगाचा अगदी लहानसा भाग.ज्यात लोक विचार करायला पुरेसा वेळ घेऊन स्वतःला पाहिजे तश्या पर्सनॅलिटी प्रोजेक्ट करतात.बरेचदा या व्यक्तिमत्वाची सर्वांना इतकी सवय होते की त्यात ते खऱ्या व्यक्तीच्या भावना अपेक्षित करू लागतात.त्या मिळाल्या नाही किंवा त्याही खोट्या प्रोजेक्ट झाल्या तर अपेक्षाभंग होतो.

>>सोशल नेटवर्क गंभीर घ्यायची वस्तू नाही.>>
पण काही प्रश्नांची उत्तरे जवळच्या ओळखीच्या लोकांकडे नसतात त्यासाठी उपयुक्त आहेच.

अज्ञातवासी यांना मायबोलीचा कधीना कधी उपयोग होईलच. विनोद आणि करमणुकीसाठी येऊ नका फारतर.

पिंक टाकणे म्हणजे काय हो. प्रेमभंग झाला विचारलं तर चिडायला काय झाले.
वड्याचे तेल वांग्यावर कशाला काढताय।