जर बायकोला घटस्फोट नको असेल तर नवरा जबरदस्ती मिळवू शकतो का?

Submitted by निल्सन on 8 April, 2019 - 08:38

नमस्कार!

जर बायकोला घटस्फोट नको असेल तर नवरा जबरदस्ती मिळवू शकतो का? याबद्दल आणि घटस्फोट कायद्याबद्दल थोडी माहिती हवी होती.
पण त्याआधी पुर्वपरिस्थितीची माहिती देते. इथे मी कोणाचीही नातेवाईक म्हणून नव्हे तर न्युट्रल माहिती सांगते त्यामुळे तुम्हीही दोन्ही पक्षाच्या बाजुने माहिती देऊ शकता.
तर, दोघांच्या लग्नाला ७ वर्षे झाली आहेत. मुल नाही. नवरा/मुलगा गॅरेज चालवतो (त्याच्या वडिलांच्या नावाने आहे व धंदा खूप कमी आहे असे त्यांचे म्हणणे आहे) घर म्हणजे बंगला आहे (आजोबांच्या नावाने आहे) तीन पिढ्या एकत्र राहत आहेत. घरात कामाला कुणीच नाही. इन्कम सोर्स - २-३ घरे भाड्याने दिलीत त्यांचे भाडे येते.
बायको/मुलगी - दहावी शिक्षण. housewife. no income.

सहा महिन्यांपुर्वी अजितने अनुला (नावे बदलली आहेत) तिच्या माहेरी आणुन सोडले. आणि २ दिवसांपुर्वी घटस्फोटासाठी नोटीस पाठविली आहे.
मुलाची बाजू -
१) अनुने लग्नाच्या सुरवातीच्या ४ वर्षे शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिला.
२) ती सतत त्याच्यावर संशय घेऊन त्याला शिवीगाळ करते. तिच्या या संशयामुळेच तो वैतागून बाहेरख्यालीपणा करू लागला असे त्याचे म्हणणे आहे.
३) त्याचा मोबाईल चेक करते/ गुपचुप त्याच्यावर पहारा ठेवते.

मुलीची बाजू -
१) अजितचे बाहेर संबंध आहेत. याआधीही तीने ३ वेळा त्याला पकडले आहे. आता ४ थे प्रकरण सुरू आहे आणि हे सर्व त्याच्या घरातही माहित आहे.
२) तो घरी आल्यावरही तिच्याशी नीट बोलत नाही त्यामुळे संबंध तर दूरच राहिले (३ वर्षापूर्वी तिची एक छोटीशी शस्रक्रिया झाली तेव्हापासून त्यांचे शारिरीक संबंध सुरू झाले होते)

आता हे सगळं वाचल्यावर बरेचजण या दोघांनी घटस्फोट घेणेच योग्य आहे अशी बाजू मांडतील आणि अर्थातच तेच योग्य आहे पण अनु आणि तिची आई मात्र यासाठी तयार नाहीयेत (कारणे बरीच आहेत)

कोर्टाबाहेर सेटलमेंटसाठी मुलाकडील तयार होते पण मुलीकडच्यांनी नकार दिल्यामुळे कोर्ट नोटीस पाठविली.
सेटलमेंट रक्कम २ ते ३ लाख देतील असे मुलाच्या वकीलाने सांगितले होते. (मुलाचा वकील त्यांचा मित्रपरिवारातील असल्यामुळे मुलीलाही ओळखतो)
मुलीकडे वकील नेमायला पैसे नाहीयेत.

तर मला विचारायचे आहे की वरील कारणांमुळे अजितला घटस्फोट मिळू शकतो का?
जर अनु तयार नसेल तर पुढे काय करावे लागेल?
६ महिन्यांसाठी एकत्र राहून कॉन्सिलरची मदत हे कोणत्या केसमध्ये शक्य असते?
आणि जर अनु घटस्फोटासाठी तयार झालीच तर तिला पोटगी काय आणि किती मिळू शकते व त्यासाठी काय करावे लागेल?
आता जरी ती घटस्फोटासाठी तयार नसली तरी आलेल्या नोटीसचे उत्तर द्यावेच लागेल ना?

तुम्ही म्हणाल हे सगळे इथे सांगण्यापेक्षा चांगला वकील गाठा पण आधीच सांगितल्याप्रमाणे महिना १५ हजार कमावणार्‍या मुलीच्या बापाला वकील कसा परवडणार. तरीही वकील शोधावा तर लागेलच पण त्याआधी उपयुक्त माहिती आणि कायद्याचे नियम माहित व्हावेत यासाठी हा खटाटोप चालला आहे.

कॄपया मार्गदर्शन करावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला पर्याय अॅमी.
मलातरी वाटतं की तिने सोडून द्याव अशा काम न करणाऱ्या अन् ज्यांना ति नकोय अशा माणसांना. डिव्होर्स द्यावा आणि काम करण्यात अडचणी न आणण्याची समज द्यावी त्या लोकांना अथवा तसं लेखि लिहून घ्यावे. आशा आहे याने तिचं आयुष्य मार्गी लागेल. आईला ही समजवावे तिच्या मुलीचं भलं कशात आहे ते.

लग्न हे जसे aayushatil सर्वात महत्वाची घटना आहे त्या मुळे जोडी दाराची निवड योग्य असायला हवी कारण जोडीदार पसंत नसेल तर बदलने सोपे नसते मुलांच्या भवितव्याची भीती सुधा असते .
हया case मध्ये पती पत्नी मध्ये खूपच कटूता
आली आहे असे दिसतय त्या मुळे ते परत aiktra premani राहतील ह्याची शक्यता खूप कमी आहे .
चुक कोणाची आहे त्रयस्थ माणूस ठरवू शकत नही .
पण मुलीला मारहाण किंवा छळ झाल्याचे दिसत नाही .
पण आपल्या च मतावर ठाम राहून आड्गे पणाने वागणे हेच न पटण्या च कारण आहे .

ह्या केसमधे मुलिच्या माहेरच्या लोकाना काउन्सिन्ग करणे अत्यत महत्वाचे आहे , लग्न झाल्या झाल्या सुरवातिचा काळच पति-पत्नीच नात इस्टॅब्लिश करतो पण इथे ते झालच नाही त्यामूले हे नात पुन:प्रस्थापित करण्यात काय हशिल आहे? मुलिने तिची आर्थिक बाजु कमजोर आहे म्हणून मन मारुन सासरी राहावे ही अपेक्षा इनह्युमन आहे. नवरा बाहेरख्याली आहे ही गभिर बाब आहे .
म्युच्यल घटस्फोट घेवुन मिळेल ती जास्तित जास्त पोटगी घेणे, त्यातली ठ्रराविक रक्कम भविष्याची तरतुद म्हणून ठेवावी. बालवाडि शिक्षक किवा टेलरिन्ग, ब्युटी पारर्ल असे कोर्सेस करुन तिला एखादी नोकरी सहज मिळु शकेल...
ठराविक काळ गेल्यावर मुलगी निरोगी आणि मनाने तयार असेल तर दुसर लग्नही करु शकते.

मुलीच्या बाजूनी विचार केला तर
ती मुलगी कोणत्या ही परिस्थितीत सासरी राहू शकते तशी तिच्या मनाची तयारी असेल तर सासरी जावून राहणे बायको म्हणून ती त्या gharat हक्कानी राहू शकते .
छळ केला तर kotumbik अत्याचार प्रतिबंध कायद्या चा उपयोग करू शकते त्या कायद्या नुसार पोलीस ना सासरच्या मंडळीना अटक करण्या चा अधिकार आहे .
नाहीतर घटस्फोट मुळे होणारे नुकसान म्हणून podgi किंवा rok रकमेची मागणी courtat करू शकते ती रक्कम पतीची आर्थिक स्थिती काय आहे त्यावर अव्लम्बुन आहे घरचा aiktrit इनकम हे पतीचे उत्पन्न मानता येणार नाही .नोकरी असेल तर ठराविक रक्कम podgi म्हणून मिळेल .
case चालू असेपर्यंत दुसरे लग्न करता येणार नाही

असतो ना पण अशा परिस्थिती मध्ये सहजासहजी कोण्ही देणार नाही .
आणि दिवाणी खटले किती वर्ष चालतील हे काही सांगता येणार नाही
case चा निकाल लागेपर्यंत वयाची सत्तरी सुधा ओलांडली जाईल .
आपल्या न्याय व्यवस्थेत हाच तर सर्वात मोठा दोष आहे
तया मुळे कोर्ट बाहेर च प्रकरण सोडवणे जास्त शहाणपणा च अस्ते

आईबापाकडे मुलगी रहाणार असेल तर उगाचच बाप 15000 कमावतो म्हणून रडायचे कशाला ? आता तुदेखील नोकरी कर

नाहीतरी बाप किती वर्षे जगणार ?

अरे जुना धागा वर आला Happy
@ ब्लॅककॅट, हो यानंतर तिने नोकरी करत होती. शिक्षण कमी असल्यामुळे पगार बेतचाच होता पण त्या नोकरीमुळे तिला आत्मविश्वास आला. काही महिन्यात ती घटस्फोटासाठी तयार झाली. नाते एकाबाजूने ओढण्यात काहीच हाशिल नाहीये हे तिला समजले. Mutual understanding मध्ये वर्षाच्या आत तिचा घटस्फोट झाला. पोटगी म्हणून एक लाख दिले तिला.
गेल्या वर्षी तिच्या आईने तिचे दुसरे लग्न लावून दिले. आता ती तिकडे सुखी आहे.
तिच्या पहिल्या नवऱ्याने ही त्याच्य गर्लफ्रेंड सोबत लग्न केले. तो पण त्याच्या संसारात सुखी आहे.

हा धागा मुळातूनच आत्ता वाचला. पण आत्ता वाचला हे एकप्रकारे बरं झालं. नाहीतर पुढे काय ची रुखरुख लागून राहिली असती मनाला २०१९ ते २०२२.

शेवटी त्या मुलीचं भलं झालं आणि त्या नवऱ्यालाही हवं ते मिळालं म्हणजे अगदीच win win situation झाली. देव दयाळू आहे.

हा धागा मुळातूनच आत्ता वाचला. पण आत्ता वाचला हे एकप्रकारे बरं झालं. नाहीतर पुढे काय ची रुखरुख लागून राहिली असती मनाला २०१९ ते २०२२.

शेवटी त्या मुलीचं भलं झालं आणि त्या नवऱ्यालाही हवं ते मिळालं म्हणजे अगदीच win win situation झाली. देव दयाळू आहे.

इथं एक प्रश्न उपस्थित करावासा वाटतो.

समजा नवरा बायको दोघं कमावते आहेत. आर्थिक गणितंही उत्तम आहेत. मुलं सेटल्ड आहेत, परंतु नव-याचा लग्नातला इन्टरेस्ट संपला/ जबाबदा-या नकोत/बाहेर काही चालू असेल आणि त्यानं घटस्फोट मागितला पण फक्त सोशल स्टॅबिलिटी हवी म्हणून बायकोला तो द्यायचा नसेल तर तिनं नाहीच दिला तर काय चूक आहे?

<< नव-याचा लग्नातला इन्टरेस्ट संपला/ जबाबदा-या नकोत/बाहेर काही चालू असेल आणि त्यानं घटस्फोट मागितला पण फक्त सोशल स्टॅबिलिटी हवी म्हणून बायकोला तो द्यायचा नसेल >>

बायकोने घटस्फोट दिला नाही तर उलट बाहेर मजा करायला नवऱ्याला रान मोकळं मिळेलच ना? बायकोने का घटस्फोट देऊ नये? केवळ "लोक काय म्हणतील" म्हणून?

बायकोने घटस्फोट मागू किंवा नवऱ्याने.
घटस्फोट घेण्याची इच्छा होणे ह्याचा अर्थ .
दोघात तीव्र मतभेद आहेत.
तीव्र मतभेद ह्याचा अर्थ त्यांना एकमेका विषयी तिरस्कार आहे म्हणजे शारीरिक आकर्षण बिलकुल नाही,त्या मुळे शारीरिक संबंध पण नाहीत.
सहजीवन नाही.
मग घटस्फोट ल नकार का पार्टनर देतो.
1) मुलांचे भविष्याची तीव्र चिंता ज्याला असते तो नकार देतो.
मग ती बायको असेल किंवा नवरा.
२) नवऱ्या पासून पैसा उकळून दुसरा बकरा शोधून आर्थिक फायदा करून घेणे हा बायकोचा स्वार्थी हेतू आहे ह्याची खात्री नवऱ्याला असते तेव्हा तो विरोध करतो पण.
घर सोडून जाण्यास त्याचा बिलकुल विरोध नसतो.
पैसे, प्रॉपर्टी हडपने आणि घटस्फोट मागणे ह्याचा पण जवळचा संबंध आहे

वैवाहिक स्टेटसमधे काहीही बदल नको असणे हेही एक कारण असू शकतं. एक आजी आजोबा सत्तरीचे. आजोबा हेकट. त्यांनी घ. स्फो. मागितला आमचं पटत नाही म्हणून.

आजी म्हणाली, निम्मी गेली मसणात....आता कशाला हे उद्योग? बस बोंबलत. मला नाही द्यायचा. अशा वेळेस पेच आलाच की.
कधीकधी घ. स्फो घेऊन न घेऊन काहीच वेगळं होणार नसतं. तेव्हा नाकारावासा वाटू शकतो.

घटस्पोट न घेण्यात सामाजिक कारणं ज्यास्त असतात, अगदी उच्चशिक्षित, मोठ्या पगाराच्या , मुलं नसलेल्या आणि स्वावंलंबी मुलींची/तिच्या कुटुंबाची सुद्धा हि कारणं पाहिलीत.

‘लोकं काय म्हणतील’ हा आजार अजून बर्‍याच लोकांना असतो.
किंवा त्या मुलींच्या मते, आता ह्या वयात(३५-३८) अजुन कोण शोधणार?
माझ्या पाहणीत दोन्ही मुली ३५-३८ गटात होत्या.
एका केसमध्ये नवरा नपुंसक होता. तरी मुलगी घटस्पोट नको म्हणत होती.
दुसर्‍या केसमध्ये, नवरा मानसिक आजार( स्प्लिट परसनॅलिटी) होता, तरी मुलीला घटस्पोट नको होता.

दोन्ही मुली उच्चपदाधिकारी, मोठा पगार, स्वतःचे घर वगैरे.

दोन्ही जोडप्यांची कुठलीच अफेअर्स वगैरे न्हवती. लग्न ओनलाईन एका नावाजलेल्या साईट मधून जमलेले.

मला पहिल्यांदा एकून आश्चर्य वाटलेले. पण असतात प्रत्येकांची कारणं.

घटस्फोट घेतलेला स्त्री किंवा पुरुष, मुल बाळ,कुटुंब नसलेली स्त्री किंवा पुरुष.

ह्याचे प्रतेक टप्प्यातील आयुष्य ,मरे पर्यंत .
ह्याचा अभ्यास करून त्याचे निष्कर्ष जगजाहीर होणे गरजेचे आहे.
आर्थिक स्थिती कोणती ही असू ध्या .
अशा लोकांच्या आयुष्यातील समस्या.
मानसिक कोंडमारा,असहाय ,आणि केविलवाणी अवस्था.
हे घटक समान असणार असे मला ठाम पने वाटते.

घटस्फोट साठी योग्य कारण असेल तर च तो घ्यावा. नट, नट्या ह्यांचे आदर्श ठेवू नयेत.
त्यांचा आदर्श ठेवून जीवनाकडे बघण्याची गरज नाही.
शक्यतो घटस्फोट टाळा.फालतू गोष्टी साठी तर बिलकुल नको.
उद्योगपती चे घटस्फोट खूप कमी बघायला मिळतील काही दोन चार च सापडतील.
पण समजतील काहीच घटकात ह्याचे प्रमाण जास्त मिळेल.
आर्थिक स्थिती हा निकष होवू च शकत नाही.

मूळ मुद्याकडे वळूया.
अशा परीस्थितीत बायकोनं घ.स्फो साठी होकार दिलाच नाही तरी नव-याला तो मिळवता येतो का?

तो पण प्रश्न पडण्याचा विषय नाही.
मन तुटली की आणि दोघे पण आपल्या मतावर ठाम असेल तर.
दुसऱ्या घरात लिव्ह इन मध्ये राहू शकतो.
दुसऱ्या स्त्री शी किंवा दुसऱ्या पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा नाही.
घरीच न जाणे.
हा पण पर्याय उपलब्ध आहे.
घटस्फोट नाही झाला तर काय होईल फक्त लग्न करता येणार नाही.ते पण फक्त हिंदू धर्मीय व्यक्ती लं.
कारण प्रयेकाचे नागरी कायदे वेगळे आहेत..
दुसरे नकार दिला तरी घटस्फोट होवू शकतो.
घटस्फोट हा एकच पार्टनर मागतो ज्याच्या वर अन्याय होत आहे अशी त्याची भावना असते.
किंवा त्याला पार्टनर बरोबर रहीचे नसते म्हणून.
सर्व संमतीने घटस्फोट हवा अशा केसेस खूप विरळ .
बायको नी नकार दिला तरी घटस्फोट होवू शकतो.
फक्त काही अटी मान्य करून
आणि घटस्फोट कधी मागू शकतो ह्याची कारण कायद्याने स्पष्ट केली आहेत.
ती कारण कोर्टात सिध्द झाली पाहिजेत

नक्कीच. घटस्फोट मिळण्यासाठी जी काही कारणं किंवा तरतुदी आहेत तीच वापरणं. मग केस लावल्यावर #अमुक कलमाखाली घटस्फोट हवा आहे' हे मागणे. मग कोर्ट काय करेल की खातरजमा ( वेरिफिकेशन) करेल .
पण काही वेगळेच कारण किंवा पद्धत वापरणे म्हणजे कायद्याचा कीस पडतो.
(( तुलनात्मक पाहा - घरमालक भाडेकरूला दिलेल्या जागेचा ताबा परत मिळवू शकतो का? - यासाठी कायद्यात जी कलमे आहेत त्याखाली ताबा मागायचा आणि कोर्ट मग ते लागू आहे का पुरावे पाहाते आणि निर्णय होतो. पण काही वेगळाच मुद्दा मांडला तर खटला लांबत राहातो . ))

Pages