सौर उर्जा

Submitted by दक्षिणा on 1 April, 2019 - 13:00

परवा आमच्या सोसायटीची जनरल मिटिंग झाली. ज्यात काही मुद्दे प्रामुख्याने चर्चिले गेले त्यात सौर उर्जा वापरून सोसायटीसाठीची वीज निर्मिती करणे.
आमची सोसायटी (एकूण) खूप मोठी आहे. सोळा इमारती आहेत. पण प्रत्येक इमारतीची सोसायटी स्वतंत्र आहे. आमच्या एकट्या इमारतीत एकूण ८६ फ्लॅट आहेत. तर त्याबद्दल.
कुणी असा प्रकल्प जवळून पाहिला आहे, अभ्यासला आहे तर मला खालिल माहिती मिळू शकेल का?

* सोसायटीसाठी सौर उर्जा प्रकल्प राबवताना साधारण किती गुंतवणूक असते?
* आमचे कॉमन मिटर आहे त्याचे बिल सध्या एकूण १६ ते १७ हजार महिना येते निदान ते वाचावेत म्हणून हा मुख्य मुद्दा आहे.
* वरचा मुद्दा + ८६ फ्लॅट्स ना पुर्ण पुरेल इतकी वीज निर्मिती करण्यासाठी काय लेव्हलचा सेटप लागू शकतो?
* फक्त कॉमन लाईट साठी हवे असेल तर कसला सेटप असू शकतो?
* सौर उर्जेतून वीज निर्मिती करतो त्यातूनच सोसायटीला गरम पाणी पुरवठा होऊ शकतो का? माझ्या मते त्याचा सेटप अजून निराळा असतो ना?
* त्याची ही गुंतवणूक काय असते?
* कोणताही सौर प्रकल्प राबवायला सध्या सरकार सबसिडी देते म्हणजे नक्की काय?
* या प्रकल्पासाठी कायद्याचे काही नियम आहेत का?

अजूनही शंका असू शकतात, पण आता एकदम सुचत नाहियेत.

या बद्दल आधीच एखादा धागा असेल तर तो कृपया देऊन हा धागा संबंधितांनी उडवावा ही विनंती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिणाताई, धाग्याबद्दल धन्यवाद !

पाच ते दहा किलोवॉट इंडस्ट्रीयल विजवापरासाठी सौरपैनल्स हवे असून कृपया पुणे परीसरातील उत्पादक/पुरवठादार सुचवा.

दक्षिणा,
आमच्या सोसयाटीत गेल्या वर्षी बसवली आम्ही सोलर पॅनेल्स..... ५-६ महीन्यापासून Generation and Supply to Grid सुद्धा चालू झाले आहे
साधारणत: ४-५ वर्षात Investment वसूल होऊन returns मिळायला लागतील असे प्रोजेक्ट रिपोर्ट सांगतोय!
Lets see!

तुला अधिक माहिती हवी असेल तर I can connect you to right person from our committee.

Submitted by शशिराम on 3 April, 2019 - 17:00
आनंद कृपया आपला मेल विपु करा>>>
माफ करा.
मला हवी असलेली प्राथमिक स्वरूपाची माहीती येथे धाग्यावर किंवा विपूमध्ये सांगितली तर बरं राहील. Happy
अनोळखी व्यक्तींबरोबर मी माबोबाहेर संपर्क ठेवत नाही. Happy

धन्यवाद. पण मला कुणालाही मदत करायला आवडते. मी संबंधित लोकांना तुम्हाला संपर्क करायला सांगणार होतो.
सोलर पॅनल मोनो/ पॉली प्रकारचे असतात.

Pages