संगीत खुर्ची

Submitted by Asu on 27 March, 2019 - 01:21

संगीत खुर्ची

माणसाची किंमत खोटी
खुर्चीला पण किंमत मोठी
दुनिया फिरते खुर्चीपाठी
खुर्चीसाठी सर्व खटपटी

जगणे झाले संगीत खुर्ची
धावून पळून शक्ती खर्ची
टपून बसले एकेक जण
खुर्ची खाली होण्या वरची

मर्जी पाठी मिळते खुर्ची
खुर्ची पाठी मिळते खर्ची
देवा असू दे अशीच मर्जी
सतत मिळू दे वरची खुर्ची

संगीत हरवले जगण्याचे
ध्येय खुर्ची मिळवण्याचे
पाय ओढू, ढकलून देऊ
करून काहीही खुर्ची घेऊ

जमिनीवर ना पाय कुणाचे
खुर्चीत बसती ऐटीत राजे
खुर्ची जाता किंमत शून्य
रडण्याविना ना मार्ग अन्य

खुर्चीमहात्म्य सांगून झाले
खुर्चीविना बघ डोळे ओले
खुर्ची एक दिसता खाली
हसू फुटले उदास गाली

- प्रा. अरूण सु. पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults