लोकशाहीचा महाउत्सव सुरु झाला। काही काळका होईना मतदार राजा झाला।तेच जुने प्रश्न तेच आहेत यांचे नारे।बदलल नाही काही तेच आहेत तारणहार जुने चेहरे।आता होईल आश्वासनांचि खैरात ।आणि करतील एकमेकांवर आरोपांची बरसात।हाम्हणेल मी चौकिदार आहे ते म्हणतात चौकिदार चोर आहे।कुणी म्हणेल आमची 56 ईंच छाती।दुसरा म्हणतो कशाला वाटते मग भीती।आता आवागमन सुरु आहे ।निष्टा विसरुन सत्तेसाठी धावपळ सुरू आहे।एकेकाळी ज्याला चोर,ब्रष्टाचारी म्हटले ।ते कळपात येताच पवित्र झाले।कुणी पाय गरिबांचे पाय धुणार तर कुणी मंदिराकडे वळणार।लोक म्हणतात मिडिया विकला गेला सांगत नाही खरे। जो देईल पैसा त्याच्या मागे धावतात सारे।सत्ताधारी म्हणतात आम्ही विकास केला देशाचा।मग प्रश्न का निर्माण होतो शेतकरी आत्महत्यांंचा।पहेले मंदिर फीर सरकार म्हणणारेही आता शांत झाले।एकमेकांना शिवी देणाऱ्यांनी आता गोडवे गाणे सुरु केले।नोटबंदी, हमिभाव, काळापैसा आणि रोजगार यावर कुणी बोलत नाही।मागच्याच सरकारला दोष देणे सुरु आहे।निवडून गेल्यावर पाच साल दिसत नाही ज्यांचे थोबडे ।तेच येतील आता मतासाठी घालतील साकडे।राजा होतो एक दिवस भिकारी। मतांचा जोगवा मागत फिरतो दारोदारी।कधि यांना तर कधि त्यांना आम्ही देत असतो सत्ता।आम्ही बनतो गरीब नेत्यांची वाढत जाते मालमत्ता।सारे सारखेच आहेत दोष द्यावा कुणाला।पण एक खरे आहे काही दिवस का होईना मतदार राजा झाला।
लोकशाहीचा महा उत्सव
Submitted by ashokkabade67@g... on 26 March, 2019 - 12:34
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
<< आणि मी भविष्य वगैरे सांगत
<< आणि मी भविष्य वगैरे सांगत नाही. फक्त डोळे उघडे ठेऊन... कोणताही चष्मा ना घालता आजूबाजूच्या घटना बघतो. भाजपा ३५०+ आणि NDA ४००+ मारणार असे वाटत आहे. >>
----- मोदी शहा यांचा पण विश्वास बसणार नाही यावर... खरी परिस्थिती अगदी वेगळी आहे... शहा यांना उद्धवाच्या दारी झोळी घेऊन यावे लागले नसते...
India Shinning, part II
लख्या रिसबुड , तू तुझे बूड
लख्या रिसबुड , तू तुझे बूड सँभाळ.
खरे आहे मोगा !!
समर्थ सांगूनच गेलेत "आधी प्रपंच करावा नेटका "!
अनुभवामुळे काहीजणांना सगळीकडेच अशीच कटुता दिसते.
तुमच्या काळजीचा विचार केला जाईल.
हेला माझ्याविषयी काही महिती
हेला माझ्याविषयी काही महिती नसताना तुम्ही मला भामटा म्हणले आहे हे योग्य आहे का? मी फक्त २०१४ मधे कोणी कोणी २ जागा लढवल्या ते उकरून काढू नका असे म्हटले याचे कारण म्हणजे त्यावेळी अनेक कॉन्ग्रेस व भाजप- वाल्यानी दोन ठिकाणाहून जागा लढवल्या होत्या आता असे करायला राहुल गान्धीना का लागले याची चर्चा करायचे सोडुन मला शिव्या देऊन तुम्ही शिविगाळ करून मोकळे. Put this in your pipe and smoke it. इत्यलम.
रेखा चा उत्सव चित्रपट मी
रेखा चा उत्सव चित्रपट मी पाहिलेला नाही. लखू तुम्ही शेंडा ना बुडूख कसे लिहीता वो. You are just confused.
Pages