रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते दत्त्ताचे शर्ट आणि माधवचा महागाचा लाइट ग्रे मुंबईत घेतलेला शर्ट हा फरक पण छान दाखवला आहे. एक भाउ बाहेर पडतो. चांगली लाइफ स्टाइल बिल्ड करतो. दुसरा तिथेच खातेर्‍यात पडून राहतो. शिक्षण नाही. त्यांच्या परिस्थितीत पडत जाणारा फरक दाखविला आहे. पहिल्या सीझन मध्ये जो फारच ग्लेअरिंग आहे.

हो ना.. पहिल्या भागापेक्षा मला हा भाग खुप आवडला.
पहिला भाग मालवणी समजण्याच्या आत संपला.. दुसरा भाग मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करत आणि काही माबोकरांची मदत तर प्रसंगी काहींचे राग्,वैताग झेलत मालवणी लवकरात लवकर आत्मसात करुन पहाणे सुरु झाल्याने अगदी इन्व्होल्व झालो. दिवाळी आधी तर थेट आकेरीत, सावंतवाडीत जाऊन प्रत्यक्ष सेट वर शुटींग पाहुन आल्यामुळे राखेचा-२ शी अक्षरशः नाळ जुळली Proud

माधवास चांगल्या ४-५ कानफाड देऊन झाल्यावर पाटणकरीणने आण्ण्याला आडवत मानभावीपणे दम दिला >>> Lol आईगं, बिचारा माधव.

अण्णांनी माधवला हाणला, म्हणून ती हाण्णा म्हणाली असेल. अण्णा विहिरीत पडले तर आतले किती बारके जीव बिचारे तडफडून मेले असतील.

Biggrin Biggrin

अण्णा विहिरीत पडले तर आतले किती बारके जीव बिचारे तडफडून मेले असतील.>> हो ना.. दारुच्या तंद्रीत आण्ण्या बावीत उलथला असेल. माईला पण लगेच सेवा-सुशृशा करायची आयती संधी चालुन आली. Uhoh

कालच्या भागात पाटणकरीण विहिरीत आत्महत्त्या करायला जाते तोवर तिला कोणीतरी आडवलेले दाखवले. बहुतेक आण्णाच असेल.
गावात बदनामी झाल्याने जगणे असह्य झालेली पाटणकरीण आण्णाला लग्न करुन वाड्यावर घेऊन चल असे म्हणत असावी असा माझा कयास.

प्रेकॅप मधे दाखवले त्यावरुन असे वाटते की त्यानंतर आण्णा पाटणकरणीला वाड्यात घेऊन येत असेल पण हे सर्व प्रकरण माईला समजले असेल त्यामुळे ती या 'सवती'ला वाड्याची पायरीही चढु देणार नाही असे सांगताना दाखवली आहे.

हो ना... मला काल वाटलं माईने शेवटी धाडस करुन आण्ण्याला दम भरलाच.
पण अ‍ॅक्चुअली काल जेव्हा सीन सुरु होता तेव्हा मी आधिच प्रेडिक्ट केलं की ही माई सवत म्हणजे 'दारु' च म्हणत असणार आणि झालंही तसंच..!! Proud

रात मोरे अण्णा ने ताक मांगा
मै कुंएमें धकेल आयी नींद के मारे
अण्णाको लात मार आयी नींद के मारे

असे त्या शेवंताचे झालेय. Proud

डिजे, सध्या राखेचा पहायलाच वेळ मिळत नाही.

रश्मी.. वैनी, भारीच गाणं लिहिलंत हो.. जुही चावलाची आठवण आली Bw
असा कसा वेळ नाही हो मिळत..? पहात चला.. थोडेच भाग राहिले असावेत. हरणखेडकर म्हणतात तसं पाटणकरीण आणि चोंट्याचा अवतार संपण्याची वेळ आली आहे... पोष्ट्याही जाणार फक्त त्या दोघांच्या आधी की नंतर ते बघायचं. रिटायर व्हायला ४ महिने राहिले म्हणत होता गेल्या महिन्यात.. आता ३ च उरले.. पोरिचं लग्न करायचं असं सांगत होता पोष्ट्या त्या माधवाला.. आता ह्याची रिटायर्मेंट पण हुकणार.

रिटायर व्हायला ४ महिने राहिले म्हणत होता गेल्या महिन्यात.. आता ३ च उरले..

नवीन Submitted by DJ.. on 15 January, 2020 - 14:21
>>>>
अहो जान्हवी १७ महीने गरोदर होती. हे सिरीयलवाले कितीही खेचतात.

अण्णा सुधरला म्हणून नेने आणि रघू हरखलेत ! अण्णा सगळ्या कुटुंबासोबत जेवतो म्हणून माई आनन्दात ! अण्णा बांगडा खाताना काटा लागतो ! शेवन्ता चाळ बांधुन नाचाची प्रॅक्टिस करत करत आनन्द शोधत आहे !

सगळा आनन्दी आनन्द !!!
Happy

हो ना... सगळा आनंदी आनंद होता कालच्या भागापर्यंत.
काल तर पाटणकरीण गावात शिरा वाटत फिरत होती. शिलाईचं मशिन पण घेणार आहे ती. पाटणकरणीला खुशीत बघुन चोंट्याला पण अत्यानंदाने रडु आलं.
माईने तर कहर केला.. कधी नव्हे ते डाळिंबी रंगाचं आणि सोनेरी काठाचं नवीन लुगडं नेसुन बोरमाळ घालुन नटुन-थटुन सरिताचा जळफळाट करवुन ठेवला.
आण्णा तर आक्खा दिवस ताकाला स्पर्श न करता निर्मळ राहिला उलट दुसर्‍या दिवशी सकाळी जिन्यातुन खाली येत घराबाहेर जाताना माईस "इंदो.. ईलंय गो.." असं सांगुन बाहेर पडला.

पण हे सर्वं कालपुरतंच दिसतंय.. आजचा प्रेकॅप दाखवला त्यात पुन्हा पहिले पाढे पंचावन्न व्हायची शक्यता आहे. वच्छीने आण्णाल उचकावलेले दिसले त्यावरुन आण्णा माईवर भडकला असं दाखवलं. शिवाय नेने वकिलाने आण्णाला पाटणकरणीबाबत काहीबाही सांगुन ठेवले होतेच त्यात तिला आण्णाने चोंट्यासोबत हसत हसत गावातुन फिरताना पाहिले म्हणजे चोंट्याची एग्झीट जवळ आलेली असणार यात शंका नाही..! Uhoh

कालच्या भागात पाटणकरणीने नवीन शिलाई मशिन घेतली. आता कपडे शिउन ती कमाई करणार. स्वतःच्या पायावर उभी राहुन सुषमाला चांगले शिक्षण देणार अशी तिची स्वप्नं आहेत. चोंट्याने पण तिच्या नवीन कामासाठी खुप मदत केली. या चांगल्या कामासाठी पुण्यवान माणसाच्या हातुन कामाची सुरुवात झाली तर बरं असा विचार करुन तिने चोंट्याकरवी माईस बोलावणे धाडले. आजुबाजुच्या साळकाया-म्हाळकाया पण पाटणकरणीचे शिलाई मशीन पहायला आल्या तेव्हा तिने सर्वांना चहा पाजला. त्यावेळेस आलेल्या बायकांनी त्यांचे ब्लाऊज शिवुन द्याल का असंही विचारुन दर किती अशी चौकशी केली. पाटणकरणीने सर्वांना हसुन त्यांचे हवे ते कपडे शिवुन देईन आणि पैसे कधीही द्या असं सांगुन खुट्टा मजबुत करुन घेतला. Bw इतक्यात चोंट्या माईला घेऊन आलाच. ( माईला वाड्यातुन चोंट्यासोबत बाहेर जाताना आण्णोबाने बघितलेच परंतु त्याने माईला कुठं जाते असं विचारलं नाही. )

माईला त्या साळकाया-म्हाळकायांनी आण्णा-शेवंताबद्दल काही प्रश्न विचारु नयेत म्हणुन चोंट्याने मशिन पहायला आलेल्या सर्व बायकांना लगोलग वाटेला लावले ते पाहुन माईने त्यास "असां कित्या जाऊक सांगितला" असं विचारलं. नंतर मात्र लगेच पाटणकरणीचे तोंड भरुन कौतुक करुन आणि शुभेच्छा देऊन तिच्या पहिल्या कामासाठी स्वतःचा ब्लाउज शिवायला पिस दिला वर आगाऊ फी पण दिली (आता बघु तो ब्लाऊज ती कधी घालते ते Proud ). पाटणकरीण माईच्या प्रेमाने भारावुन गेली.

माई वाड्यात परत आली तेव्हा आण्णोबाने तिला दारातच गाठले व कुठे गेली होती म्हणुन विचारले. तेव्हा तिने पाटणकरणीकडे गेले होते असे सांगुन तिच्या नविन उद्योगाविषयी सांगुन कौतुक केले. नंतर लाईट गेल्यामुळे पुढे काय झालं ते कळालं नाही Uhoh कुणी पाहिलं असल्यास काय झालं ते सांगाल का..? प्रीकॅप मधे काय दाखवलं..??

नंतर काही विशेष झाले नाही. अण्णा त्याच्या खोलीत जातो, त्याचे औषध घेतो मग त्याला पाटणकराच जगप्रसिद्ध भूत येऊन खिजवून जातं. प्रेकॅप मध्ये माई आणि माधव पटांकरणीकडे आलेले दाखवलेत आणि माई चक्क तिला कापड देऊन अन्नूकल्यासाठी सदरा शिवायला सांगते आहे, बिचारी पाटणकरिण ...
बादवे गावात सगळ्यांना अण्णांनी पाटणकरणीची काढलेली धिंड माहिती आहे मग माईक कसा अजून कळूक नाय?
बिचारी माई....

धन्यवाद सान्वी. Bw

हो ना.. माई खुप सालस आहे त्यामुळे असल्या गोष्टी तिच्यापर्यंत पोचवण्याचे धाडस वच्छी सोडुन आजवर कोणी केलेले नाही.

पाटणकरीण आण्णोबापासुन दुर जायचा प्रयत्न करतेय तर माईने त्याच्यासाठी लाल रंगाचा कुर्ता शिवायला सांगितला Uhoh पण पाटणकरणीने पुन्हा त्या वासनेच्या वाटेला जायचे नाही असा निग्रह केलेला दिसला.

इकडे वाड्यात माईने वडे + काळ्या वाटाण्याच्या सांबराचा बेत आखला आहे. सिरिअल सुरु होऊन वर्ष झालं तरी अजुन वडे तळलेले नाहीत याची मला राहुन राहुन कमाल वाटत होती. आता मात्र पाटणकरणीकडे जाताना माईने वच्छीला वड्यांचं पीठ भिजवायला सांगितलेले होते. तिनेही ते मन लाऊन भिजवले आहे. परातीत चांगले चपाचपा चोपुन भिजवलेल्या पिठाच्या रिंगणावर ५ भोके पाडुन त्यात गरम केलेल्या तुपाची धार सोडुन मुरवत ठेवले आहे. आता बघु आज रात्रीतरी त्या दोघी वडे तळतात का ते.

सरिता एवढी आक्रस्ताळी का वागते हे तिलाच माहीत. वच्छी एवढी समजावते तरी हिची आपली ओव्हरअ‍ॅक्टिंग सुरुच Uhoh

सरिताचे आधीचे मूल कशाने गेलेले असते. गर्भपात होतो का. रात्री वडे खाताना वच्छी काहीतरी सांगत असते की खिडकीतून दोन लांब हात आले, वडे उचलत होते Proud सरिता तिथे असेल तर वच्छीचं काही खरं नाही आज. ती पीठ भिजवत असतानाच मला वाटलं कि ती पाच भोकं म्हणजे कवटी बनवतेय की काय. सोंत्याला फार काळजी वाटते शेवंताची.

सरिताचे आधीचे मूल कशाने गेलेले असते. गर्भपात होतो का.>> नाही.
सरिताचं मुल नेमकं कशानं गेलं हे गुपित पण त्याच्यासोबतच गेलं. त्याच्या बारशाच्या दिवशी अगदी पाळण्यात घालायच्या वेळेसच ते मुल गेलं. वच्छीसहीत सर्वांना ते मुल म्हणजे काशीचा पुनर्जन्म वाटत असतो त्यामुळे वच्छीला त्याच्याबद्दल खुप आत्मियता असते तर आण्णा, छाया त्यावर खार खाऊन असतात. या झोलझमेल्यात माई मात्र मूग गिळुन गप्प बसलेली असते त्यामुळे सरिताला हे सर्व असह्य झालेले असते. अशात ते मुल गेल्यामुळे आण्णा खुष तर वच्छी दु:खाने वेडीपिशी होते. वच्छीच्या आधिच्या कारस्थानांमुळे पोळलेली सरिता आता ताकही फुंकुन पीत आहे.

चोंट्याची पाटणकरणीशी दिसणारी जवळीक त्याला मरणाच्या दारात उभी करणार आहे. काल माधव पण पोस्टात जाणार होता तिथे पोष्ट्या भेटणार हे नक्की.. पोष्ट्याची कोणत्या कारणामुळे तिरडी उठते हे पहाणे मात्र औत्सुक्याचे ठरेल ('माईशी दिसणारी जवळीक' हे कारण असेल तर मला फार आनंद होईल Proud ).

चोंत्या आवडू लागला आहे दिवसेंदिवस..किती जपतो शेवंताला...वडे म्हणजे उडदाचे का..... जेवायला फक्त वडे आणि सांबार कसं पुरेल?? सरिता उगाच वसवस करते वछी ला... वछी आणि आबा पण आवडतात मला... शेवंता चा मुंबई प्लॅन कॅन्सल झाला का

हो वेडोबा. चोंट्या आवडु लागण्याचं कारण त्याची एक्झिट जवळ आली आहे त्यामुळे त्याला जास्त फुटेज मिळत आहे. (काशी, शोभा, पाटणकर यांना पण मरण्याआधी असंच फुटेज मिळालं होतं..!)

वडे म्हणजे उडदाचे का>> नाही. हे कोकणातले वडे असतात. तांदुळ + गहु आणि अजुन कहितरी घालतात त्यात (जाणकारांनी माहिती द्यावी). ते चवीला खुप छान असतात. लग्नात, कार्यात हे वडे करावेच लागतात. सांबार म्हणजे काळ्या वाटाण्याचं कालवण. हे पण चवीला छान असतं. गावाकडे जेवणात एवढं असलं तरी चालतं.

सरिता उगाच वसवस करते वछी ला..>> हो ना.. पुर्वीच्या त्रासामुळे सरिता वच्छीला आता वसवस करते. तिचा त्रागा कोणीही समजु शकतो पण ती फारच ओव्हरॅक्टिंग करते ते डोक्यात जाते.

पाटणकरणीचा मुंबईचा प्लॅन कॅन्सल झाला कारण ती ज्या एस.टी. ने मुंबईला निघाली होती त्या एस.टी. ला आण्णोबा स्टँड्च्या बाहेरच आडवा आला आणि पाटणकरणीच्या हाताला धरुन आख्या सावंतवाडी आणि आकेरीतुन वरात काढुन घरी सोडुन आला. Uhoh

काल सगळ्या भुतांची पंगत छान बसली होती Proud वच्छीला खरोखर भूतां दिसतात का, आधी फक्त शोभा दिसायची ना. सरिताला भारी चौकशा असतात. वच्छीला हाताला कसं लागलं. ती गरम तेल बाहेर उडवत असते आणि कढई फेकून मारायला जाते, सगळे तिला अडवतात ते बघितलं. चटका बसला ते नाही बघितलं. किती दिवस शर्ट शिवणार, फार हळू पुढे जातेय मालिका.

भुते आण्णोबाला दिसत असतात. वच्छीला फक्त मेलेली माणसे दिसत असतात.
कालच्या भागात तिने नक्की कोणाच्या पंगतीला जेवायला वाढले ते माहित नाही पण आण्णोबाला मात्र ती पंगत त्याने मारलेल्या माणसांची आहे असे वाटले.
कदाचित वच्छीला तिची मेलेली सासु, जाऊ दिसत असावी असे मला वाटते.. बघु आज रात्री काही लिंक लागली तर.

वच्छीला काही लागले नाही तर भाजले आहे.. ती उकळते तेल झारीने खिडकीत बसलेल्या लावसाटीनीवर उडवत असते तेव्हा ते भाजले आहे (तिला भास होत असलेली अवदसा म्हणजे कुत्रे असावे असे वाटते कारण तिने उकळते तेल खिडकीतुन बाहेर फेकले तेव्हा कुत्रं केकाटल्याचा आवाज ऐकु आला. Proud )
हे असे करत असताना तिला भाजले असणार म्हणुन तर ती परातीत पाणी घेऊन हात बुडवुन बसली होती.

किती दिवस शर्ट शिवणार, फार हळू पुढे जातेय मालिका. >>>>>>>> कोणाचा शर्ट? अण्णाचा?

लावसाटीनीवर >>>>>>>> लावसाटीनी? Uhoh

@ सुलु_८२ , झाला हो आण्णाचा शर्ट शिऊन आणि त्याने तो टराटरा फाडला पण..! Uhoh

लावसाटीन माहिती नाही का हो तुम्हाला..? भुतांच्या कॅटेगरीतील सर्वात भयंकर स्त्री असती ही. भुतांमधे साधारण खालील कॅटेगरी असतात बघा :

पुल्लिंगी भुते : मुंजाबा, वेताळ, महांकाळ
स्त्रीलिंगी भुते : हडळ, जखीण, चेटकीण, लावसाटीन

कालच्या भागात चोंट्याला नवा हाप शर्ट शिऊन मिळाला त्याचे त्याला आणि गावाला किती अप्रुप वाटले. त्याच्याकरवी पाटणकरणीने आण्णोबाचा नवा आणि मापाचा जुना शर्ट वाड्यात माईकडे पाठवला. तो बघुन माई खुश झाली आणि लगोलग आण्णोबाला घालायला सांगितला. त्यानेही तो घातला आणि त्याचं रुपडं(?) बघुन माई खुश झाली. त्या खुशीत तिने तो शर्ट पाटणकरणीने शिवला असंही सांगितलं. बोलण्याच्या ओघात चोंट्याचा शर्टही तिने शिवला असं सांगितल्यावर आण्णोबाने तिला तिथुन जायला सांगितलं आणि ती गेल्याबरोबर त्याने तो घातलेला नवा शर्ट मधोमध टरकावला Uhoh

बाकी पाटणकरणीच्या घरी ती आण्णोबाच्या स्वप्नरंजनात रमलेली असतानाच चोंट्या भजी+मिरच्या घेऊन येतो तो सीन मस्त जमलाय. चोंट्याचा शर्ट बघुन गाववाले टुकार इसम पण पाटणकरणीकडे शर्ट शिवायला द्यायचा विचार करत आनंदुन जातात. त्यातलाच एक आज नवे कापड घेऊन पाटणकरणीडे येतो आणि तिचा विनयभंग होईल असं काहिसं वागतो असं प्रीकॅप मधे दिसलं. शिवाय वच्छी पण लवंगा, मिरे अजुन कसलेले मसाले अंधारात कुटत बसली आहे असंही दिसलं. बघु आज काय होतं ते.

Thanku Dj....Vada sambar mast lagat asel....agri vivahat vade kartat yavar ek lekh vachlay jagu yancha...tech ka he vade??? Annya la dhada shikvla pahije changla shevantane...;

वच्छीने कसला भयंकर काढा केला होता. अण्णा निघालाय रागाने. शेवंता, पोष्ट्या आणि चोंत्याची एकत्र मोळी बांधणार बहुतेक.

Pages