रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागच्या एपिसोड मध्ये चोंगट्या एका मुलीला पटवायचा प्रयत्न करतो ते फार भारी विनोदी आहे. इथे मुडदा विहिरीत पडलेला आणि इथे हा
सिनेमाला येतेस का तालुक्याच्या गावाला लग्न करतेस का विचा रतो फार मजेशीर. >>>> ती भाची आहे माझी (नवऱ्याच्या सक्ख्या आतेबहीणीची मुलगी) तिचे खरे नाव शिल्पा आचरेकर आणि सिरीयल मध्ये सुद्धा चोंगट्या शिल्पा नावाने हाक मारत होता). Happy

क्यु ट होती ती. बिचारी घाबरून पळून जाते हंडा तिथेच विसरते. स्टीलचो हांडो. महाग असत ना. तिला घरी रागवतील म्हणून मला काळजी वाटलेली. छान बोलत होती.

क्यु ट होती ती. बिचारी घाबरून पळून जाते हंडा तिथेच विसरते. स्टीलचो हांडो. महाग असत ना. तिला घरी रागवतील म्हणून मला काळजी वाटलेली. छान बोलत होती.

नवीन Submitted by अमा on 30 September, 2019 - 05:14

धन्यवाद अमा!! लहान आहे ती वयाने. आचऱ्यातलीच आहे. इथे मुंबईत डॉन बॉस्को जवळ राहते बोरिवलीत. खूप मेहनती आहे. अगदी लहान सहानच भूमिका करते (खन्डोबा च्या सिरीयल मध्ये आणि त्या संतोष जुवेकर च्या सिरीयल मध्ये पण होती ऑफिसात), मिळतील हळू हळू मोठे रोल. मे मध्ये गावी गेली होती तेव्हा सांगितले होते तिने कि राखेच्या मध्ये येणार आहे ती.

IMG_20190926_224629.jpg

पाटणकरणीसाठी सगळे माफ..>>>>> आँ! किती ते जाड जाड व्हायचे?आधीची पाटणकरीण गोंडाळ दिशी होती.आता बुदँव झालीसा.मागे तो झीचो कसलो तो कार्यक्रम होतो,त्यातही पाटणकरीण जाडी दिशी होती. तिचा हसणां सुरेख असा.

मागे तो झीचो कसलो तो कार्यक्रम होतो>> झी गौरव..! त्यात पाटणकरीण शो-स्टोपर होती.. तिला पाहुन प्रेक्षकांत बसलेल्या सो-कॉल्ड मराठी हिरवीणींची तोंडे उतरली होती Proud आणि घरोघरीच्या महिलामंडळींची नाके लालेलाल झाली होती (मुरडुन-मुरडुन Biggrin )

घरोघरीच्या महिलामंडळींची नाके लालेलाल झाली होती>>>> कप्पाळ! एकच टाईप मादक हसणे पण कटाळवाणे झाले होते..त्या २ बटा मुद्दाम काढल्यासार्ख्या वाटायच्या.नंतर पाटणकरणीच्या लक्षात आले असावे की बाबा माणसां कंटाळततं म्हणून.

मला तर अपुर्वा अजिबात नाही आवडत पहील्यापासून, बोअर वाटते. पहीली सिरीयल होती त्यात फक्त आवडलेली, नंतर नाहीच.

झीच्या सिरीयल्सना कोणी असो नसो, कसाही टी आर पी मिळतो, कधी स्क्रीन ब्लॅक ठेवला काही तास झीने, तरी लोकं तेच चॅनेल लाऊन ठेवतील असं मला वाटतं Wink Lol

त्यात पण त्यांना मनोरंजन मूल्य दिसेल. जोक्स अपार्ट, झीच्या सिरियल्स कितीही फालतू असल्या तरी पहिल्या पाचात त्याच असतात. बाकी सगळे त्यानंतर. ही फालतू आहे असं माझं म्हणणे नाही, एकंदरीत आहे ते असं आहे.

>>तिला पाहुन प्रेक्षकांत बसलेल्या सो-कॉल्ड मराठी हिरवीणींची तोंडे उतरली होती  आणि घरोघरीच्या महिलामंडळींची नाके लालेलाल झाली होती (मुरडुन-मुरडुन  )

स्पष्ट बोलायचं तर शेवन्ताच्या रोलला चांगली फिगर, सेक्स अपिल आणि साजेसा चेहेरा मस्ट होता. पाटणकरीन डालडयाच्या डब्यासारखी फुगलेय. पेअर प्लस apple दोन्ही शेप्स एकाच बॉडीत आहेत एव्हढ्ं म्हटलं तरी पुरे. सेक्स अपिल कशाशी खातात हे तिला माहित नाही. त्या फुल नाइट स्टँड च्या वेळचे तिचे हावभाव विनोदी ह्या सदरात मोडणारे होते. आणि चेहर्याचं म्हणाल तर आपल्याकडे गोरागोमटा रंग असला की सुंदर म्हणुन आपोआप गणना होते तसला प्रकार आहे. डोळे निराळ्या रंगाचे आहेत म्हणून जास्त. पेपरात आपलं उगाच रसिकांच्या हृदयावर राज्य करतेय वगैरे वाक्यं छापून आणली आहेत. त्यापेक्षा काळीसावळी असली तरी भिवरीच अधिक sexy दिसत होती.

>> जोक्स अपार्ट, झीच्या सिरियल्स कितीही फालतू असल्या तरी पहिल्या पाचात त्याच असतात.

Marketing gimmicks. विश्वास ठेवू नका ह्यावर. मी तर ते रसिकांच्ं ह्रदय काबीज वगैरे वाचून जाम हसले होते. ही अशी वाक्यं मधुबाला वगैरे साठी लागू होती. कहा राजा भोज...असो. त्यापेक्षा ती तेजस्विनी पंडीत आणि आदिनाथ कोठारेची सीरियल होती त्यात तेजस्विनी actually seductress वाटत होती

>> बघ ह्याची उत्त रे तुला नेक्स्त सीझन मध्ये नक्की मिळतील.

नको बाबा. झालं तेव्हढं पुरे आहे. तिसरा सिझन झेपणार नाही मला.

>> हरी नाइक लहान पना पासून कसा कृर होता. का असा झाला.

तो लहानपणापासुन असाच होता हे नानानी सांगितलंय आधीच.

>> स्वप्ना, तो गाववाला म्हणजे सदा असतो, ज्याची जमीन अण्णा हडपतो.

मी हे एपिसोड्स पाहिले नव्हते. धन्यवाद रश्मी

अरेच्चा! पाटणकरचं भूत तर म्हणतंय की मी जीव दिला. मग त्याच्या डेड बॉडीवर दौलतजादा कोणी केली?? का तोच घरातले पैसे घेऊन गेला होता? पण काहीही म्हणा पाटणकरचं भूत जाम पॉवरफुल आहे. अण्णुला धू धू धूतला त्याने. पूर्ण वाड्याची सहल घडवली. आणि इतकं होऊनही कोणाला जाग आली नाही घरात. अण्णुला सगळं स्वप्नात दिसत होतं का काय. त्याला बदडताना पाहून माझा जीव शान्त झाला अगदी. जियो पाटणकर!!

शेवन्ताला ती नणन्द म्हणतेय मुंबईला चल. तर हिला इथेच रहायच आहे. विनाशकाले विपरीत बुध्दी. पाटणकरने एव्हढा बहिणीचा संसार उभा करुन दिला पण तिचा नवरा आला नाही अन्त्यदर्शनाला की अन्त्यसंस्कार करायला. Uhoh

हो मला पण नाही कळलं की अण्णा म्हणतोय की पाटणकर ला मी मारलं, आणि भूत म्हणतंय की मी जीव दिला. नक्की काय झालं?
बादवे आज सुरुवातीला जेव्हा अण्णा बावीकडे बसलेल्या माणसाला सगळं सांगत असतात खुनाची कबुली देतात तेव्हा मला एकदा वाटलं की तो नवीन इन्स्पेक्टर असेल, हुशार आहे तो. म्हटलं आता अण्णा जाईल आत, पण हाय रे कर्मा, तो निघाला पांडबा, जाम मार खाल्ल्यानी...

एकदा वाटलं की तो नवीन इन्स्पेक्टर असेल, हुशार आहे तो.>> सेम सेम.. माकापण तांच वाटलां पण आपला पांडु निघालां. पण पांडु थंय केळीचो खुंटाखाली काय करत व्हया काय कळणा नाय..! Wink

आज बावीत छायाक काय दिसुचा व्ह्यईत काय म्हाईत.. छायाक मात्र काम कमी झालाहा..!

पण पांडु थंय केळीचो खुंटाखाली काय करत व्हया काय कळणा नाय..! Wink>> त्याला हरी ने तो पडवीत लपवलेला शर्ट साप डला काय? तो घालून बसला असंल. बाकी काय झाले?!

पुढे जे लोक अण्णा म्हणून उपनाव लावतील त्यांच्यासाठी आडनावे:- अण्णा भिरभिरे, अण्णा भेलकांडे, अण्णा कलमवाले, अण्णा टल्ली, अण्णा पेताड , अण्णा ताकवाले, अण्णा ताडीवाले, अण्णा झिंगाट, अण्णा सुसाट.

हो, तो पांडुच असतो, पाटणकरचा शर्ट घातलेला. पेताड अण्णा त्यालाच भूत समजतो, मग रात्री त्याला पाटणकर धू धू धुतो. Slapping

रश्मी Lol

नुसते धुऊन काय उपयोग, ढगात पोचवायला हवा होता.

धन्यवाद अंजु आणी डिजे. Proud

अगों पण त्याचे नाव काय असां ते काय कळणाक नाय ! Uhoh तुका कळला का चोंगट्योचे खरे नाव? तो चला हवा येऊ द्या मध्ये पण आला होता.

>> अण्णांका पाण्यानी ओढल्यानी काय

एव्हढं कुठलं आपलं भाग्य! सुषल्याला शेवंतेपेक्षा जास्त अक्कल आहे. शेवंता गावात राहुन काय करणार आहे ते तिचं तिलाच माहित. अण्णाची माफी मागायला सांगते ती सुषमाला. धन्य आहे! सुषमाने तो दगड अण्णाच्या डोक्यात घातलेला पाहायची माझी फार इच्छा होती. मेल्याचा कपाळमोक्ष व्हायला हवा होता. त्याचं ते धोतर आणि फेंगडं चालणं डोक्यात जातं माझ्या अगदी.

Pages