रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@अमा, मला स्मरत नाही पण तुम्ही म्हणताय तसे पहिल्या भागात पोष्ट्या जर पाटणकरामागे उभा राहिलेला असेल तर आजच्या घडीला खालील शक्यता असु शकतात - Proud
१. पाटणकर - CNF
२. पोष्ट्या - RAC
३. पाटणकरीण - TQWL
४. चोंगट्या - GNWL
५. वच्छी - PQWL
६. शोभा - DPWL
७. नेने वकील - RQWL
८. माई - WEBCAN

१. पाटणकर - CNF
२. पोष्ट्या - RAC
३. पाटणकरीण - TQWL
४. चोंगट्या - GNWL
५. वच्छी - PQWL
६. शोभा - DPWL
७. नेने वकील - RQWL
८. माई - WEBCAN>>>>>>>??????? ह्यां काय तां??? Uhoh

ह्या समद्यांचे लाँग फॉर्म टाका की.

॓मला एक कळत नाही, पाटणकरला इतका वेळ लागतो बायकोचे प्रकरण समजायलस?
तो तर भविष्य सुद्धा सांगतो ना लोकांचे?
आणि अण्णा का गावात आल्यापासून इतकी मदत करतो कळत नाही... त्या पाटणकरणीला अण्णा म्हातारा का आवडला कळत नाही...

सुषमा अण्णांची मुलगी कशी काय? ती कधी पैदा होते?
आणि इतक्या बर्षात एकच पोरगी? मग आता परत एकदा गरोदर रहाते तर शेंवता का घाबरते?
—-
पाटणकर बायकोला, कुमुदिनी म्हणून हाक मारायचा .. एकले एका भागात..
कै च्या कै...

पाटणकर, शेवंता सर्वजण वर पोचूनपण बदला घेऊ शकलेच नाहीत त्या अण्णाचा. खुप वर्ष सुशेगात होता की तो. मी पार्ट वन काही भाग बघितलेले, तो किती वर्षानंतर परलोकी जातो. शेवंताने तरी त्याला पोचवून वर जायचं ना. मुर्ख लेकाचे Wink .

ह्या समद्यांचे लाँग फॉर्म टाका की>> हे घ्या रश्मी..वयनी Proud लंपन नी बरोबर ओळखले Bw
१. पाटणकर - CNF - Confirmed
२. पोष्ट्या - RAC - Reservation Against Cancellation
३. पाटणकरीण - TQWL - Tatkal Quota Waitlist
४. चोंगट्या - GNWL - General Wait List
५. वच्छी - PQWL - Pooled Quota Wait List
६. शोभा - DPWL - Duty Pass Waitlist
७. नेने वकील - RQWL - Roadside Quota Waitlist
८. माई - WEBCAN - Railway Counter Ticket Passenger cancelled through internet and Refund not collected Biggrin माईचा किस्सा माहिती आहे का..? Biggrin

@ झंपी : अहो पाटणकर खुप साधाभोळा असतो त्यामुळॅ त्याला काही समजत नाही. सुषमा ७-८ वर्षांपुर्वी जन्मली असेल.. कारण ती ३री-४थीत असेल.
पाटणकरचे व्रत असते म्हणुन तो १ महिना उपास करत असतो.. त्याचे उद्यपन झाल्या-झाल्या पाटणकरणीस दिवस गेल्याचे लक्षात येते.. नवर्‍याचा उपास असताना ती गरोदर राहिली म्हणुन ती घाबरते. Wink
तिचे नाव कुमुदिनीच असते पण ती आण्णाला पहिल्या भेटीत तिचे नाव शेवंता आहे असेच सांगते. माहेरी तिला शेवंता असे म्हणायचे म्हणे.

एखाद्या लहान गावात एखादे अफेअर इतके वर्षानुवर्षे सुरु राहू शकते आणि नवऱ्याला काहीही समजत नाही, हे पटण्यापलीकडे आहे.

अहो अन्जू.. दुसर्‍या गावातले समजते (माधवच्या पहिल्या प्रेमप्रकरणाअतील मुलीच्या आईचे नाव कसे माईनाव्पटकन ओळखले.. Light 1 ) पण स्वतःच्या गावातील नाही समजले कारण दिव्याखाली अंधार..!! Proud

पाटणकरला इतका वेळ लागतो बायकोचे प्रकरण समजायलस?>>>>>> पाटणकर सरळमार्गी आहे, डिजे म्हणतात तसा साधा भोळा त्यामुळे बायकोवर त्याचा अतोनात विश्वास व प्रेम.

आणि अण्णा का गावात आल्यापासून इतकी मदत करतो कळत नाही.>>>>> अण्णा, पाटणकर कडे जमिनीच्या कामानिमीत्त जातो. तिथे तो पाट्णकरणीचे नवर्‍याशी भांडण बघतो, ज्यात शेवंता उर्फ कुमुदिनी ( हे पाटणकरने तिचे लग्नानंतर बदललेले नाव ) पाटणकरने तिला कसलेच भौतिक सुख दिले नसल्याचे सांगुन तांडव करत असते. बेरकी अण्णा हे हेरतो आणी सुंदर, मादक अशा या बाईला दागदागिने वगैरे देऊन जाळ्यात अडकवतो.

त्या पाटणकरणीला अण्णा म्हातारा का आवडला कळत नाही...>>>>>> पाटणकरीण गावात येते तेव्हा अण्णा तसा तरुणच असतो, फारतर तिच्या पेक्षा १०-१२ वर्षाने मोठा.

सुषमा अण्णांची मुलगी कशी काय? ती कधी पैदा होते?>>>>> ह्यांच्या भानगडीतच पैदा होते.

पाटणकरला पत्रिका कळत असत्या तर बायकोचे सगळे त्याला आधीच समजले असते. ही वस्तुस्थिती आहे. पत्रिकेत रवी-शुक्र एकत्र युतीत असतील तर कुठल्याश्या स्त्री मुळे संसारात तणाव निर्माण होतो. मग ती नवर्‍याची प्रेयसी असेल किंवा बायकोचा प्रियकर ( इथेही बाई गृहीत धरावी, प्रियकर नव्हे ) किंवा सासुमुळे. मी अशी ३ उदाहरणे ( पत्रिका बघीतल्यात ) बघीतलीत. याचा अर्थ हा नव्हे की ज्यांच्या पत्रिकेत ही रवी-शुक्र युती असेल ते सगळे भानगडबाज असतात

ही युती असेल तर तणाव हा स्त्रीमुळे होतोच होतो. माझ्या माहितीत एका नातेवाईक स्त्रीच्या पत्रिकेत ही युती होती. तिला एका स्त्रीमुळे खूप मनस्ताप झाला, कारण ती दुसरी स्त्री तिच्या संसारात ढवळाढवळ करत होती. मात्र नवरा त्या दुसर्‍या बाईच्या प्रेमात अजीबत नव्हता. मला माहीत आहे पण बोलत नाही इतकेच.

>>अहो पाटणकर खुप साधाभोळा असतो त्यामुळॅ त्याला काही समजत नाही

ते ठीक आहे. पण छोटंसं गाव. त्यात हे प्रकरण सगळ्यांना माहित असणारच. मग कुठूनतरी हे त्याला कळणं शक्य आहे. तसं होत नाही हे अगम्यच. पण पांडू लेखक है तो सबकुछ मुमकिन है.

चला, शेवटाची सुरुवात झाली हेही नसे थोडके. कथा घोटाळायला लागली होती बरेच दिवस.

शेवंता मारे जीभ लांब करून अण्णाला सांगते की मला माझा संसार वाचवायचा आहे. हो ना बयो? मग कशाला स्लीव्हलेस घालून त्या अण्णाला जेवण द्यायला गेली होतीस जेलमध्ये? का त्याच्या घरी पातोळ्या शिकायच्या बहाण्याने गेली होतीस? का त्याला चहा नेऊन दिलास? का अत्तराची कुपी देऊन घरी बोलावलंस? Uhoh

त्या पाटणकरलाआपल्याच घराच्या मागच्या बाजूला खिडकी आहे हे माहित नव्हतं का?? कशाला त्या झाडामागे उभा राहून चोंगट्या जायची वाट बघत होता?

स्वप्ना_राज : अहो, चोंगट्या समोरच्या खिडकीशी आणि पाटणकर बाजुच्या खिडकीशी.. पहिल्यांदाच या बाजुने शुटिंग झाले.. Proud

अतोनात प्रेम असूनही बायकोने विश्वासघात केला असेल तर मनातून उतरायला हवीना, आपला जीव कशाला द्यायचा. सोडून द्यायची. एनीवे अशी माणसे असतात. एक माहितेय घटना, दोघांच्या अफेअरमध्ये एकीच्या नवऱ्याने आणि दुसऱ्याच्या बायकोने आत्महत्या केली. बाकी दोघे मजेत.

कमीतकमी सुसाईड नोट लिहून कारण तरी लिहायचे ना, अडकले असते दोघे पण नाही. खूप वर्ष झाली, अजूनही हळहळ वाटते हे आठवलं की. नको होती आत्महत्या करायला त्या दोघांनी असं वाटतं.

क्राइम ऑफ पॅशन नावाची एक खुनाची जॉनर आहे. आपल्याशी प्रतारणा आपला पार्टनर करतो आहे हे समजल्यावर काहींना खून चढतो व भयानक पद्धतीने त्या व्यक्तीचा तिच्या लव्हरचा खून करतात व सुखाने जेल मध्ये जातात कारण त्यांच्या मनाने ते जस्टिफाइड शिक्षा आहे. काही भयानक डिप्रेशन मध्ये जाउन स्वतःला संपवतात.

थोडा आधीचा संदर्भ बघा. तिने किती व्यवस्थित त्याला फसवले आहे. वर लग्नाच्या वादिला किती गोड वागली व परत एक मूल होउदे वगिअरे संदर्भ आलेला. गजरा घालून घेतला वगिअरे. आपल्या अश्या व्यक्ती क डोन फसवले जायचे दु:ख फार अवघ ड आहे पचवायला. जीवनातला अर्थच गेल्या सारखे वाट्ते.
सरळ बदली घेउन मुम्बईला जाता आले असते की. पण हिच्यात जीव अडकला ना.

ती पोलिस स्टेशन मध्ये असा एकदम मॉड अवता र करून का जाते. आ. ला डिवचायला बहुतेक.

हकनाक बळी गेला पाट णकरचा.

क्राइम ऑफ पॅशन नावाची एक खुनाची जॉनर आहे. आपल्याशी प्रतारणा आपला पार्टनर करतो आहे हे समजल्यावर काहींना खून चढतो व भयानक पद्धतीने त्या व्यक्तीचा तिच्या लव्हरचा खून करतात व सुखाने जेल मध्ये जातात कारण त्यांच्या मनाने ते जस्टिफाइड शिक्षा आहे. काही भयानक डिप्रेशन मध्ये जाउन स्वतःला संपवतात.

थोडा आधीचा संदर्भ बघा. तिने किती व्यवस्थित त्याला फसवले आहे. वर लग्नाच्या वादिला किती गोड वागली व परत एक मूल होउदे वगिअरे संदर्भ आलेला. गजरा घालून घेतला वगिअरे. आपल्या अश्या व्यक्ती क डोन फसवले जायचे दु:ख फार अवघ ड आहे पचवायला. जीवनातला अर्थच गेल्या सारखे वाट्ते.
सरळ बदली घेउन मुम्बईला जाता आले असते की. पण हिच्यात जीव अडकला ना.

ती पोलिस स्टेशन मध्ये असा एकदम मॉड अवता र करून का जाते. आ. ला डिवचायला बहुतेक.

हकनाक बळी गेला पाट णकरचा.

८. माई - WEBCAN - Railway Counter Ticket Passenger cancelled through internet and Refund not collected Biggrin माईचा किस्सा माहिती आहे का..? Biggrin>> माईचं तिकीट अगदी प्रवास सुरु व्हायच्या वेळेस कॅन्सल झालं आणि ते तत्काल वेटिंग लिस्ट वर असणार्‍या भिवरीला कसं मिळालं हे माहिती आहे का..?? Proud Proud Proud

धन्यवाद लंपन आणी डिजे. Happy

शेवंता मारे जीभ लांब करून अण्णाला सांगते की मला माझा संसार वाचवायचा आहे. हो ना बयो? मग कशाला स्लीव्हलेस घालून त्या अण्णाला जेवण द्यायला गेली होतीस जेलमध्ये? का त्याच्या घरी पातोळ्या शिकायच्या बहाण्याने गेली होतीस? का त्याला चहा नेऊन दिलास? का अत्तराची कुपी देऊन घरी बोलावलंस? Uhoh>>>>> चोंगट्या शेवंताला स्पष्ट शब्दात सांगतो की अण्णाच्या तावडीतुन आता बाहेर पडणे फार कठिण आहे, पण शेवंता ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असते व चोंगट्याला सांगते की ती बरोबर यातुन निसटेल. आणी यातच मार खाते.

माईचं तिकीट अगदी प्रवास सुरु व्हायच्या वेळेस कॅन्सल झालं आणि ते तत्काल वेटिंग लिस्ट वर असणार्‍या भिवरीला कसं मिळालं हे माहिती आहे का..?? >>>> म्हणजे?

ऐका :
मागे भिवरी लहान दत्ताला घेऊन वाड्यात घुसते त्यावेळेस माईने रडुन रडुन गोंधळ घातला होता. कोणत्याही परिस्थितीत भिवरीला सवत म्हणुन वाड्यात घ्यायला तिचा ठाम विरोध होता. पण आण्णा पुढे कोणाचे काही चालत नाही. छाया-माधव पण छोटेच असतात. त्यामुळे आण्णा भिवरीला घरात घेतात.. आणि माईचे तिकिट कन्फर्म करायचे असे ठरवतात. पण माई दिसते तेवढी पण खुळी नव्हती.. रात्री झोपायच्या वेळेस ती स्वतःच्या खोलीत स्वतःच्या अंथरुणात भिवरीस झोपवते आणि स्वतः बाहेरच्या खोलीत छया+माधवास घेऊन झोपते. मध्यरात्री आण्णा ताक पिऊन येतो.. आता माईचे कलम लावायचे असा विचार करुन तो माईच्या खोलीत शिरतो आणि पाठमोर्‍या झोपलेल्या भिवरीच्या नरडीवरुन खस्सकन चाकु फिरवतो Uhoh
हा सर्व प्रकार माई बाहेरच्या खोलीतुन चोरुन बघते आणि स्वतःचे काउंटर वर काढलेले कन्फर्म तिकिट वेबवरुन कॅन्सल करुन तत्काळ वेट्लिस्टेड भिवरीचे तिकिट कन्फर्म झाल्याचे बघते मग भलेही त्या तिकिटाचा परतावा नका का मिळेना . Proud

हो की. तो भाग पाहीला होता. पण ते मला भूमिकेबद्दल वाटले. म्हणजे ऐन वेळी भिवरीला माईची भूमिका न मिळता भिवरी ची म्हणजे गचकण्याची भूमिका मिळाली असे वाटले. Proud

हा सर्व प्रकार माई बाहेरच्या खोलीतुन चोरुन बघते आणि स्वतःचे काउंटर वर काढलेले कन्फर्म तिकिट वेबवरुन कॅन्सल करुन तत्काळ वेट्लिस्टेड भिवरीचे तिकिट कन्फर्म झाल्याचे बघते मग भलेही त्या तिकिटाचा परतावा नका का मिळेना . Proud>>. फार भारी. झिंदाबाद. भिवरी कोलित दाखवते ते पण क्लास होते. भिवरी बेस्ट होती आ. ला. टू क्रास पीपल मेड फॉर इच अदर. मग दत्ता राज कुमार झाला असता.

सगळे सारखे चहा पीत असतात. मी पण घरी गेल्यावर वाइ च चाय पीतच बघते.

Biggrin आहे की नाही आय.आर.सी.टी.सी. तिकिट फ्लो स्टेटस फॉर करंट सिच्युएशन..!! Biggrin

१. पाटणकर - CNF - Confirmed
२. पोष्ट्या - RAC - Reservation Against Cancellation
३. पाटणकरीण - TQWL - Tatkal Quota Waitlist
४. चोंगट्या - GNWL - General Wait List
५. वच्छी - PQWL - Pooled Quota Wait List
६. शोभा - DPWL - Duty Pass Waitlist
७. नेने वकील - RQWL - Roadside Quota Waitlist
८. माई - WEBCAN - Railway Counter Ticket Passenger cancelled through internet and Refund not collected

पाटणकरीण - TQWL - Tatkal Quota Waitlist>> अपग्रेडेड टू बिझनेस क्लास हँगिग टू हेवन.

नेने वकील - RQWL - Roadside Quota Waitlist>> अपग्रेडेड टू टू पार्ट्स इन बॅक टू द फ्युचर लास्ट सीझन कर्टसी डिआय एल.

काय करेल बिचारी..? तिला कुणाचा आधार नाही. तिच्या महेरचं एकही माणुन कधी दिसलं नाही.. ना आई ना बाप ना भाऊ ना बहिण ना भाचे ना भाच्या.. कुण्णी-कुण्णी नाही.. नाईक वाड्याशिवाय कोणतंही छप्पर तिला आसरा म्हणुन नाही (एवढा मोठा ऐसपैस वाडा सोडुन कोण जाईल.. मग नवरा कितीही लफडी का करेना..!) ... त्यामुळे आहे त्या परिस्थितीत खितपत पडण्याशिवाय तिला गत्यंतर नाही.

Pages