रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अण्णुकला किती रोमँटीक आहे ना. पाटणकरीण आता नाही म्हणतेय म्हणून कळशीलाच कुर्ता बांधुन विहीरीत टाकलाय. आधी तो कुर्ता पाटणकरच्या तावडीत होता, पण अण्णाने हिसकला असेल त्याच्याकडुन ल्हान मुलासारखा. Biggrin

पाटणकर शहाणा आहे, त्याने अण्णाच्या विहीरीत जीव न देता वहीवाटेच्या विहीरीत जीव दिला, जेणेकरुन सर्व गाव बघेल. कारण अण्णाच्या विहीरीत जीव दिला असता तर अण्णाने पर्स्पर विल्हेवाट लावली नसती का?

अण्णा : मी डोलकर डोलकर आकेरी गावाचा राजा
नेहेमी पैताडुन गावात करतो गमजा आ ssआ sss

पाटणकर: न तू जमिं के लिए है ना आसमां के लिए
तेरा वजूद है, तेरा वजूद है अब सिर्फ दासतां के लिए ( पण पाटणकरसाठी मला खूप वाईट वाटले. ही कथा आहे पण कोणाच्याही वाटेला असले भोग नकोत )

पाटणकरीण : मी रात टाकली, मी कात टाकली
मी मोडक्या संसाराची बाई लाज टाकली

माई : भला है बुरा है जैसा भी है
मेरा पती मेरा देवता है

पांडु, छाया, सरीता , दत्ता, माधव, नाथा, सुसल्या यांच्या साठी नंतर गाणे आठवले की लिहीन. बाकीच्यांनी भर घाला.

विहिरीत नुसता शर्ट होता तर सरिता कळशी जड लागते म्हणत होती. त्या शर्ट च्या आत पाटणकर असता तर कळशी विहिरीबाहेर यायच्या ऐवजी सरिता च विहिरीत पडली असती की

पाटणकरीण- नजर लागी राजा तोरे बंगले पर

माई एकदा म्हणते की मरताना शेवन्ताची नजर वाड्याकडे होती. रच्याकने ती सिझन 1 मध्यए तिला शेवन्ता म्हणते. पाटणकर बाई नाही

अण्णांनी पाटणकराचा शर्ट घातलाय आणि पाटनकारान अण्णांचा शर्ट फक्त हातात च घेतलायन रागाने उद्वेगाने चोळा मोळा करतोय तो फक्त. पाटनकाराने अण्णांचा शर्ट अण्णांच्या विहिरीत फेकला असेल अण्णा फेकल्याचं प्रतीक म्हणून आणि स्वतः दुसऱ्या विहिरीत जाऊन जीव दिला असेल

अण्णाने त्या दिवशी शर्ट काढायलाच नको होता. खाया पिया कुछ नै गिलास तोडा बारा आना तशातली गत झाली की. Proud असो. आदत से मजबूर होता म्हणायचा.

छाया - ना कोई उमंग है
पांडू - दुनिया पागल है या फिर मै दिवाना
सरिता - सुबह और शाम काम ही काम क्यो नही लेते पिया प्यार का नाम
चोन्गटया - आते जाते हुये मै सबकी खबर रखता हू

पाटणकरच्या बॉडीजवळ नोटा कशा सापडल्या? आपण पैश्याचा घोटाळा केल्यामुळे आत्महत्या करावी लागली असं तो का दाखवेल? तसं नसेल तर त्याच्याजवळ नोटा कश्या असतील? अण्णाने त्याला मारलं असेल तर त्याचा शर्ट वाड्याच्या विहिरीत कसा मिळेल? का त्याने वाड्याच्या विहिरीत आत्महत्या केली आणि अण्णाने त्याची बॉडी नेऊन दुसर्या विहिरीत टाकली आणि संशय येऊ नये म्हणून नोटा फेकल्या? कारण पाटणकरने जीव दिला हे ऐकून अण्णाला आश्चर्य वाटलेलं दिसलं नाही. पाटणकरचा फोटो पण लगेच तयार करुन आणला.

आण्णानेच पाटणकराच्या हातुन शर्ट हिसकावुन घरामागे बावेत टाकलेला.. ते चोंगट्याने देखील पाहिलेले असते आणि पाहिले म्हणुन आण्णाची माफि मागुन 'माती खाल्लंय.. माती खाल्लंय' पण म्हणुन झालेलं असतंय.

आण्णानेच पाटणकराचा खुन करुन पैसे टाकले असणार जेणेकरुन हा खुन आपण केलेला नसुन लाचलुचपतीतुन झाला असावा असा संशय गावात पसरेल. हा खुन कसा झाला हे जेव्हा पाटणकरीण नंतर शोधुन काढेल तेव्हा मात्र तिचं तत्काळ वेटींग लिस्टचं तिकीट कन्फर्म झालेच म्हणुन समजा..!!

झाली बाई एकदाची विधवा Uhoh
नवरा मेला हे बघुन एवढ्या मोठ्या देहातुन फक्त "ऑ" एवढुस्साच आवाज आला.. हे काय माका पटलां नाय ..!! (धाय मोकलुन कसे रडायचे याची माईकडुन केटी घ्यायची होती तिने..!)

अण्णाने टाकला होय तो शर्ट. मग त्यानेच मारलं असणार पाटणकरला. शेवन्ता ओरडली की 'अहो' म्हणून केव्हध्याने. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही म्हणते आणि डोक्यावरुन आंघोळ करते सकाळी उठुन. आम्हाला अंगावरची सुध्दा सुचली नसती. पाटणकरला पोहता येत नव्हतं वाटतं. तरी मला आजवर बायका विहिरीत उडी घेतात हे माहित होतं. पुरुषाने असं केलेलं पहिल्यांदा पाहिलंय.

"ऑ" एवढुस्साच आवाज आला>> अगदी अगदी. आत्ताएपिसोड ३३ मध्ये शेवांता पहिल्यांदा घर बघते. पहिल्यांदा माई बरोबर आ. च्या खोलीत येते वर. खिडकीच्या पडद्याला हात लाउन बाहेर बगते तेव्हा काटा आला अंगावर. समोरच्या झाडाव र ती लटक णार एका क्षणी. पोरं बारकी. पाटणकर बाहेर झोपाळ्ञा शी बसून सर्व मुलांशी बोलतात. आणा ला म्हणतत मुले चांगलीच असणार तुमचे संस्कार आहेत. तर माधव गालावर हात फिरवतो. हे हे व्हेरी फनी.

त्या नोटा कदाचित शेअंताने चौकोनी डब्यात ठेवलेल्या दागिने पैशातले असतील. आ ने दिलेले.

माईने शेवन्ताला समजवयाच्या सीनमध्ये छान अभिनय केलाय. वाईट वाटलं तिच्याबद्दल. शेवन्ताच्ं प्रकरण ऐकून तिला किती धक्का बसेल. माणसाने एव्हढ्ं भोळं असू नये. शेवन्ताच्ं कितिही चुकलं असलं तरी तिच्याबद्दलही वाईट वाटलं थोडं. हे चूक का बरोबर माहित नाही. तिला तिची चूक कळली होती. तिला संसार सावरायचा होतां. अण्णाला आद्द्ल घडवायचा नाद सोडून तिने पाटणकरला बदली करुन घ्यायला लावायला हवं होतं.

दत्ता सरिताला ते पैसे आणि दागिने तिजोरीत ठेवायला लावेल असं वाटलं होतं. पण त्या सीननंतर पुढे काही दाखवलंच नाही. दत्ताच्या डोळ्यात पाणी का असतं? अण्णा आपण एव्हढ़ खपून आपल्याला काही देत नाहीत आणि शेवन्तावर पैसे उधळतात ह्याबद्दल का सरिताची हाव बघून वाईट वाटतं त्याबदड्ल?? छाया तर आजकाल कुठे दिसतच नाहीं

राखेचा-२ ला झी गौरव सर्वोत्कृष्ट कार्यक्रम साठी नामांकन मिळालेलं आहे..!

इथे आज महापुरागत प्रतिक्रिया येत आहेत हे बघुन झी गौरव सर्वोत्कृष्ट पुरस्कार 'राखेचा-२' लाच मिळणार असे वाटत आहे..

तरीपण आपण सर्वांनी हा पुरस्कार आपल्या आवडीच्या राखेचा-२ ला मिळवुन देण्यासाठी आपल्या (आणि अर्थात दुसर्‍यांच्याही Wink ) मोबाईलवरुन या क्रमांकावर मिसड्कॉल द्या - ८०८००७३०७३

पाटणकरच्या बहिणीचा नवरा आला नाही? रात्री तर ती बहिण डारडूर झोपली होती निवांत. गावातल्या लोकाना अण्णा शेवन्ताबद्दल कहीच माहित नाही असं दिसतंय. अजब आहे सगळं. मला वाटतं त्या रात्री दारु पिऊन पाटणकर घरच्या पायरीवर येउन बसला होता. शेवन्ताला चाहुल लागली तेव्हा तिने दार उघडून पाहिलं पण तिथे कोणी नव्हतं. बहुतेक अण्णाने त्याला तिथून उचलून त्याचे विहिरीत विसर्जन केलं असणार. काल पांढर्या डोळ्याचा पाटणकर अण्णुला बादलीच्या पाण्यात दिसला. म्हणत होता माझा श्वास कोंडतोय. मला बाहेर काढा. अण्णाला तर एव्हढी मस्ती आहे. तो बिचारा दत्ता गरम पाणी पाहिजे काय विचारायला आला तर म्हणे निघ इथुन. चांगलं बादलीभर कढत पाणी आणुन अण्णाच्या डोंबलावर ओतायला पाहिजे होतं त्याने.

पाटणकरची बहिण शेवंतापेक्षा बरीच बरी आहे दिसायला. तिने परत मुंबईला लवकर जायला हवं. नाहीतर अण्णु तिच्यामागे लागायचा. बिचार्या सुशमाची फुकट फरपट होणार ह्या सगळ्यात. आपल्या भावाची मुलगी नाही म्हटल्यावर ती आत्या पण तिची जबाबदारी घेणार नाही शेवन्तामागे. मेल्याच्ं आडनाव नाईक ऐवजी कलाम पाहिजे होतं.

अण्णाने भिवरी, पान्डूचा बाप, काशी ह्या तिघना मारलं होतं. तो कोण एक गाववाला होता त्याला का मारलं होतं मला आठवत नाही. आता पाटणकर, मग शेवन्ता, शोभा आणि अमा म्हणतात तसा पोष्टमन (ह्याने अन्ना पाटणकरला मारताना पाहिलं असेल काय?) एव्हधी कलमं लावून मगच अण्णा गप्प बसणार. मेल्याच्ं आडनाव नाईक ऐवजी कलाम हवं होतं

स्वप्ना, तो गाववाला म्हणजे सदा असतो, ज्याची जमीन अण्णा हडपतो. आणी वरतुन मानभावीपणाने रडारडी करतो, जशी कालच्या भागात पाटणकर कडे केली तशी. तो सदा अण्णाला मागे धमकी देऊन जातो, आणी अण्णा टल्ली असतांना मागुन त्याच्या टाळक्यात काठी हाणतो. पण नेमकी सदाची गळ्यातली चेन तिथे पडते व दुसर्‍या दिवशी ती अण्णाला दिसते, तेव्हा तो त्याचा बदला घेतो.

हो मला पण काल तसेच वाटले होते की अण्णाला गरम पाणी ओतुन हाणावे. अण्णा पाटणकर च्या बहिणी कडे पण बघतांना दाखवलाय. आधीच्या राखेचा मध्ये सुषमा, नाथाकडे रहातांना दाखवलीय. म्हणजे पाटणकरच्या बहिणीला कळलेच असणार ना, की सुषमा तिची खरी भाची नाही ते. नाहीतर ती तिला शहरात घेऊनच गेली असती. खरे तर कथानकात खूप त्रुटी आहेत, डायरेक्शन पण बरेच गंडलेय. साध्या साध्या गोष्टी या कलाकारांच्या पण लक्षात येत नाही.

अरे चोंगट्या राहिला की. काल बिचारा वकिलालाच सांगतोय मला सर्व माहीत आहे. अण्ना त्याचे कलम लाव्णार.

मागच्या एपिसोड मध्ये चोंगट्या एका मुलीला पटवायचा प्रयत्न करतो ते फार भारी विनोदी आहे. इथे मुडदा विहिरीत पडलेला आणि इथे हा
सिनेमाला येतेस का तालुक्याच्या गावाला लग्न करतेस का विचा रतो फार मजेशीर.

हो तो सदा. बिचारा पहिल्यांदा दत्ताला विचारायला येतो थोड्या उशीराने पैसे देउका कमी देउका तर आ. त्यांना मारतो. दत्ताला तर कायम
फटकारतच असतो.

अजून एक सीझन येइल त्यात हरी नाइक व भिवरीचे कसे जमले. माईशी लग्न कसे झाले हे ते दाखवता येइल.

देवा, topless अण्णा पहायचं दुर्भाग्य कोणाच्याही शिरसि मा लिख, मा लिख, मा लिख Sad पाटणकरणीच्या माहेरचं कोणीही तिच्या घरी दिसलं नाही. हे वास्तव दाखवत आहेत का जास्त माणसं दाखवायला नको हे cost cutting आहे कळत नाही. माईच्या माहेरचे कधी कोणी दिसलेले नाहीत. 'दिल्या घरी तू सुखी रहा' असा काही प्रकार आहे काय?

तो इन्स्पेक्टर अमिताभचे पिक्चर्स बघून आल्यासारखा acting करतोय. अण्णा त्याचंही कलम लावायला मागेपुढे पहाणार नाही.

>>अजून एक सीझन येइल त्यात हरी नाइक व भिवरीचे कसे जमले. माईशी लग्न कसे झाले हे ते दाखवता येइल

बाप रे नको.......sequel करता येत नाही म्हणून भूतकाळात घुसताना पांडबाने एव्हढ्या कोलांटउड्या मारल्या आहेत....नाईकांवर आणखी एक सिझन नको. त्यापेक्षा दुसर्या कुटुंबाची कथा बघायला आवडेल.

तुम्हाला काही जाणवलं का..? पाटणकरणीच्या नणंदेने या सिझन मधे माईने अगदी पहिल्या पहिल्या काही भागात (शेपटा होता त्यावेळच्या) वापरलेली साडी आणि खणाची चोळी (टाचुन घेतलेली) घातली होती परवा..! Proud

ईच्या माहेरचे कधी कोणी दिसलेले नाहीत. 'दिल्या घरी तू सुखी रहा' असा काही प्रकार आहे काय?>> बघ ह्याची उत्त रे तुला नेक्स्त सीझन मध्ये नक्की मिळतील. हरी नाइक लहान पना पासून कसा कृर होता. का असा झाला. मग त्याच्या लग्ना पूर्वीच्या भानगडी, माईशी आधीच ठरलेले त्यामुळे करावे लागलेले लग्न . लग्नात झालेली भांडणे व माईचे तुटलेले माहेर, माधव छाया चा जन्म व बालपण भिवरीची एंट्री. वछी आबाचे लग्न काशीचा जन्म पोटेन्शिअल है भाई. शेवंताची नणंद पण लवकर जायला हवी. नाहीतर खरे नाही तिचे. नाकीडोळी नीटस आहे.

मी पूर्वीचे भाग बघत आहे. सुसल्याला झोपवून ह्यांचे चाळे चालतात व ती जागीच असते तिला पहिल्या पासूनच माहीत आहे. ते फार कसे तरी वटले बघायला. हरी नाईक प्रॅक्टिकली हर भेटेत खरेच तिला साडीतरी दागिने तरी वस्तू तरी सामन तरी देत असतो. तरी नवर्‍याला कळत कसे नाही. यप्पड निव्वळ. आनी ही दर वेळी अय्या हे माझ्यासाठी म्हणून घेत राहते. ह्याचा अर्थ काय ते तिला कळत नाही का?! स्वार्थी निव्वळ

वापरलेली साडी आणि खणाची चोळी (टाचुन घेतलेली) घातली होती परवा..>> अय्या हो का? बघते आज संध्याका ळी, मला माईचा तो शेपटा,
पोपटी चॉकलेटी बोर्डरचा खणाचा ब्लाउज व साडी लुक फारच आव्ड् लेला.

हो ना.. माई काळाबरोबर साड्या+ब्लाऊज बदलत गेली.. काळाचा आलेख दाखवण्यासाठी ड्रेपरी वाल्यांनी किती बारकाईने काळजी घेतली आहे..!!

पण शेवंता पोलिस स्टेशान मध्ये जाते डबा घेउन तेव्हाचा तिचा ब्लाउज जेम तेम. हा अगदी आजच्या स्टाइलचा होता. सवंग लोक प्रियतेचा मोह आवरलेला दिसत नाही. साडी दहा वर्शा पूर्वीची वाट्ते किमान. सुस्लया व्हायच्या आधी पण हरी तिला एक सिंथेटिक गुलाबी वरून टिकल्या व मणी लावलेली साडी देतो. अश्या साड्या तेव्हा नव्हत्याच नक्कीच अपरूपाची गोष्ट. ६४४ नावाचे सिंथेटिक मटेरिअल इंपोर्टेड यायचे व त्यावर कटवर्क भरत्काम मणी लावणे करायच्या बायका.

Pages