तलवार

Submitted by अजिंक्यराव पाटील on 25 March, 2019 - 04:06

आमच्या घरात एक पूर्वापार चालत आलेली तलवार आहे, पण नीट काळजी न घेतल्याने फार खराब कंडिशन मध्ये आहे. माझी इच्छा आहे की एखादी तेग / गोलाई (जवळपास अर्धवर्तुळाकार तलवार) घरात असावी. तर, थोडाफार research केला असता असे समजले की ५ (की ८?) इंचाहुन अधिक लांबीचे पाते असलेले कोणतेही शस्त्र आर्म्स ऍक्ट नुसार तलवार समजले जाते आणि ते बाळगणे गुन्हा आहे. यावर बऱ्याच लोकांचे दुमत आहे. जसे की कुणी म्हणतंय घरात ठेवता येईल, पण बाहेर न्यायचे नाही, तर कुणी म्हणतंय लायसन्सच लागत नाही!

मायबोलीकरापैकी कुणाकडे तलवार आहे का? त्यासाठीचे लायसन्स कसे मिळवायचे? आणि महत्वाचे कुठून घ्यायची? माझ्या माहितीनुसार विक्रेता पण परवानाधारक असावा लागतो. कृपया सुचवा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हाला हवी असलेली माहिती माझ्याकडे नाही, पण तलवारीचा फोटो तरी दाखवा. त्या तलवारीचा काही तरी इतिहास असणार तो पण लिहा. फार उत्सुकता आहे.

इतिहास म्हणाल तर भाट सांगतात की आमचे खापरपणजोबा किंवा त्यांचे आजोबा वगैरे सूर्यवंशी नावाने सिंदखेडराजाच्या जाधवरावांकडे चाकरीला होते, त्यांची ती तलवार असावी. या भाटांना पण वडील भेटले होते माझ्या जन्मावेळी. आता ते भाट पुन्हा येतील मला मुलगा झाल्यावर, ते होईल लगीन झाल्यावर.. तेव्हा काढतो पूर्ण माहिती. फोटो सध्या नाहीये, गावी असते तलवार.

ती तलवार घेऊन अथवा न घेऊन तुम्ही बाहेर कुठे राडा केलात व ते प्रकरण पोलीसात जाऊन त्यांनी तुमच्या घरावर छापा टाकला व त्या छाप्यात तलवार त्यांना मिळाली तरच तुम्ही गोत्यात येऊ शकता. अन्यथा तुमच्या दिवाणखान्यातील एकाद्या भिंतीवर शोपिस म्हणून, ती तलवार तुम्ही टांगून ठेवलीत तर कुणाला ही हरकत नसावी.
--

आता ते भाट पुन्हा येतील मला मुलगा झाल्यावर, ते होईल लगीन झाल्यावर.. >>>>> Timeline द्या हो. माहिती मिळवण्यासाठी अशी endless वाट कशी पहाणार? Proud

ते झालं, पण लीगल आहे का तलवार बाळगणं? >>>>> सिनेमातल्या जमीनदारांच्या भिंतीवर लावलेली असते तेव्हा खाली काही वॉर्निंग येत नाही, जशी हिरो सिगारेट ओढताना किंवा अल्कोहोल पिताना येते, म्हणजे लीगल आहे असं समजावं का? Wink

पण नीट काळजी न घेतल्याने फार खराब कंडिशन मध्ये आहे.

<<

यूट्यूबवर रिस्टोरेशन व्हिडिओज असतात. ते पहा. युज्वली पातं गरम करून टेंपर करता येईल, सँडपेपरने घासून चकाचक दिसेल. त्याआधी मूठ काढावी लागेल. मूठ त्याकाळी धातूच्या नळीत लाखेत बसवली जात असे, असे माझे ज्ञान सांगते. ती सोडवून घेऊन मग पातं रिस्टोअर करा. मूठ्/हँडल कसलं आहे त्यानुसार ते रिस्टोअर करा.

लीगल फिगल विसरा, जेन्युइन परंपरागत शस्त्र आहे, बाळगल्याबद्दल तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आपल्या हिंदू धर्मात गुढीपाडव्याला, दसर्‍याला वगैरे शस्त्रपूजन करायची प्रथा आहे. भगव्या रंगाच्या रिबिनी डोक्याला बांधून रस्त्यावर तलवारी नाचवल्या तरी हरकत नसते. Wink (सभ्य असाल, तर नाचवायचे शस्त्र शोभेचेच असेल याची काळजी घ्या. अन्यथा चालून जाते. अनेक नेत्यांना सेरिमोनियल तलवारी स्टेजवर भेट म्हणून दिल्या जातात. त्या ब्लंट स्वोर्ड्स असतात, त्याच्या बद्दल उपकायदे आहेत.)

कायदाच हवा असेल, तर इथे पहा : https://indiankanoon.org/doc/1934415/

चांगल्या लोहाराकडे घेउन जा आणि टेंपर करून घ्या. लोहार आळीत चौकशी करा, कोणीतरी 'राजपूत' आडनावाचा असेल. त्यातल्या जर्‍या शहाण्या माणसाकडून करून घ्या.
सांगली-मिरजेकडचे असाल तर मिरजेत रेवणी गल्लीत एक मुका आहे. त्या मुक्याला येतं असलं नीट.