केसरी - चित्रपट परीक्षण/रिव्यू - स्पॉईलर अलर्ट

Submitted by भागवत on 24 March, 2019 - 09:59

“युद्धस्य कथा रम्या” असे म्हटले जाते. कारण युद्धात देशभक्ती, पराक्रम, त्याग, राजकारण, प्रखर संवाद, आरपारची लढाई, होत्याम्य, आणि बलिदान यांची भरपूर रेलचेल असते. बऱ्याच वेळेस आपल्याला कथा आपल्याला माहीत असते पण आपण चित्रपट बघतो कारण खरे कौशल कथेची मांडणी करण्यात असते आणि प्रेक्षक त्याकडे विशेष लक्ष देतात. केसरी हा चित्रपट ऐतिहासिक अश्या “सारगढीची लढाई” वर आधारित आहे. ही लढाई १२ सप्टेंबर १८९७ या दिवशी ब्रिटिश साम्राज्याच्या 36व्या शीख रेजिमेंटच्या २१ जवान आणि १०००० अफगाणी पठाण यांच्यात झाली होती. जगातील आता पर्यंतच्या पहिल्या पाच सर्वोच्च लढाईत या लढाईची गणना होते. त्यांच्या पराक्रम ऐकूनच आपण रोमांचित होतो. ते क्षण जर आपल्या डोळ्यासमोर साकारले तर काय होईल?

पहिला हाफ ठीकठाक आहे. चित्रपटाची पहिले १० मिनिटामध्ये सोडली तर त्यात विशेष काही नाही. अक्षय कुमार जो की हवलदार ईशर सिंह यांची भूमिका करतोय त्याचा प्रवेश ठीकठाक झाला आहे. इतर व्यावसायिक सिनेमा प्रमाणे डशिंग एन्ट्रीक टाळली आहे. सगळा फोकॅस ईशर सिंह या व्यक्तीरेखे वर आहे. खास करून खलनायकाचे पात्र चांगले फुलवता आले असते. खलनायकाला त्याच्या व्यक्तिरेखेला पहिले १० मिनिटे वगळता पहिल्या हाफ मध्ये वाव नाही. परिणीतीचे व्यक्तिरेखा सुद्धा आणखी चांगल्या पद्धतीने रंगवता आली असती. तिच्या व्यक्तिरेखेला थोडा वेळ आणि न्याय द्यायला पाहिजे होता. पहिल्या भागात चित्रपट संथ होतो पण त्यात विनोदी पेरणी उत्तम केली आहे. तेरी मिट्टी गाणे सुरेल झाले आहे.

सारगढीच्या किल्ल्याचे जागेचे खूप महत्त्व असते. दोन मोठ्या गुलिस्तान आणि लॉकहार्ट किल्ल्या मधील संभाषण पोहचण्याचे काम इथे होत असते आणि त्यासाठी हा किल्ला एक महत्त्वाचा दुवा असतो. खलनायक आणि त्याचे दोन साथीदार अचानक सारगढीच्या किल्ल्यावर आक्रमण करतात. त्यांना फक्त २१ सैनिक उत्तर देतात. पण का आक्रमण करतात यांचे थोडे जास्त कथानक दाखवले असते तर उत्तम झाले असते. दुसरा हाफ मात्र कमाल आहे. युद्धाचे प्रसंग चांगल्या रित्या दर्शवलेले आहेत. २१ सैनिकाचे हळवे क्षण आणि जबरदस्त मनोधर्य योग्य पद्धतीने दाखवलेले आहेत. ज्या वेळेस भोलाला एक बदाम मिळतो आणि तो जपून ठेवतो तो भावनिक क्षण छान टिपला आहे. भोला सिंहचे जाताना हसणे चटका लावून जाते.

छायाचित्रणाची कसब पणाला लागल्या मुले काम छान झाले आहे. पहिल्या भागाचे दिग्दर्शन ठीक आहे पण दुसरा भाग अप्रतिम आहे. दिग्दर्शकाने ऐतिहासिक कथेवर चांगले काम केले आहे. “अनुराग सिंग” यांचे हिंदीत पहिले दिग्दर्शन आहे हे जाणवत नाही. या आधी अनुरागने पंजाबीत काही हिट चित्रपट दिले आहेत. चित्रपटात लढाई दाखवताना पार्श्वसंगीताचा उत्तम रित्या वापर केलेला आहे. चित्रपटाचे दुसऱ्या भागाचे संपादन सुद्धा एकदम झक्कास झाले आहे. ईशर सिंहचे दुसऱ्या भागातील दृश्य बघताना अंगावर काटाच येतो. काही लढाईचे क्षण तर इतके जबरदस्त आहेत की तुमचे पैसे वसूल झाल्याचे समाधान तुम्हाला मिळते. संवाद मात्र करकरीत आहेत. अक्षय कुमारच्या वाट्याला उत्तम संवाद आले आहेत.

चित्रपट संपल्या नंतर फक्त काही सह कलाकाराची नाव लक्षात राहतात. बाकी २० सैनिकाच्या उप-कथानक आणखी फुलवता आली असती तर चित्रपट आणखी बहरला असता. पहिल्या भागात काही दृश्य गुळगुळीत झाली आहेत. दुसर्‍या भागात प्रत्येक पात्राची भावनिक गुंतागुंत आणि कर्तव्य यांची छान पद्धतीने रेखाटणी झाली आहे. प्रत्येक सैनिक असलेल्या कलाकाराने अभिनयाचा आलेख उंच नेला आहे. कास्टिंग व्यवस्थित आणि चांगली झाली आहे. ईशर सिंह यांचे वरिष्ठ इंगज यांच्या वाट्याला फक्त २-३ दृश्य आहेत. व्हीएफएक्सचा वापर जरी कमी असला तरी युद्धाचे दृश्य एकदम कडक आहेत. ईशर सिंहचा त्वेष, शौर्य, जबाबदारी, गिळलेला अपमान आणि त्यातून पेटून उठून केलेला उत्तुंग पराक्रम उठून दिसतो. शेवटी अति तटीच्या संग्रामात २१ सैनिकाची आहुती पडते. शेवटी तर गुरमुख सिंह हे पात्र अद्भुत युद्ध करून मन जिंकतो.

व्हीएफएक्सचा आणखी चांगला वापर करून युद्ध दृश्याची परिणामकरता आणखी वाढवता आली असती. सह कलाकारांना आणखी चांगल्या पद्धतीने प्रस्तावित करता आले असते तर आणखी सुसंगत वाटले असते. पहिला हाफ आणखी सुंदर केला असता तर चित्रपटाला जास्त रंग चढला असता. खलनायक, सह-कलाकार यांना आणखी वाव द्यायला पाहिजे होता.

ऐतिहासिक कथा बीज, सह-कलाकाराचा उत्तम अभिनय, चांगली आणि भडकपणा नसलेली मांडणी, न्याय देणारी पटकथा, पार्श्वसंगीताचा योग्य वापर, लढाईचे उत्तम चित्रीकरण, ऐतिहासिक कथेला न्याय देण्याचा चांगला प्रयत्न आणि अक्षय कुमारच्या चांगला अभिनयाने नटलेला चित्रपट. यामुळे चित्रपट वेगळ्या उंची वर गेला आहे. दुसरा हाफ पहिल्या हाफची राहिलेली कसर भरून काढतो. एक चांगला चित्रपट बघितल्याचे समाधान आपल्याला भेटते. मला या चित्रपटाला ५ पैकी कमीत कमी ३.५ स्टार द्यायला आवडेल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

पहिल्या महायुद्धात ६७,००० भारतीय सैनिक मृत्युमुखी पडले, आणि तितकेच जखमी झाले. आणि दुसऱ्या महायुद्धात ९०,०००.

म्हणजे ब्रिटिशांच्या युरोपातील भांडणात त्यांनी बळी दिला भारतीय लोकांचा. अक्षरश माणसे, जनावरे, लाकूड, अन्नधान्य आणि जे जे म्हणून लूटता येईल ते ते लूटून घेऊन गेले.

आपली ग्रामव्यवस्था, हस्तमाग आणि एकूणातच वस्त्रोद्योग उध्वस्त झाला.

ती तशीही वाढती लोक्समख्या व शहरीकरणमुळे नष्ट होणारच होती, त्यात इंग्रजांचा सम्बम्ध नाही.

दुष्काळात इंग्रजानी धान्य नेले, नाहीतरी इथले राजे कुठे दामाजीपंतांचे अवतार होते ? सेना भाजपाने सगळ्या जागा आपापसात घेतल्या, बिचारे आठवले उपाशीच !

पहिल्या महायुद्धात ६७,००० भारतीय सैनिक मृत्युमुखी पडले, आणि तितकेच जखमी झाले. आणि दुसऱ्या महायुद्धात ९०,०००.

लंकादहनात आणि महाभारतात किती मेले हो ?

"मी त्या काळात असते तर टिपू सुलतान किंवा सनातनि ब्राम्हण पेशवे यापेक्षा क्वीन व्हिक्टोरियाची इंग्रज राजवट ही नक्कीच प्रिफर केली असती." - हे तुम्ही 'आज' च्या तुम्हाला, १००-१२५ वर्षांपूर्वीच्या सामाजिक फ्रेम मधे बसवता म्हणून असं वाटत असावं का? भारतात (किंवा जो काही तो भूभाग होता, त्यात), स्त्रीयांची, जातीय उतरंडीत, ज्यांना सामाजिक निम्न स्तरांत गणलं गेलं, त्यांची अवस्था असमर्थनीय वाईट होती, हे निर्विवाद आहे. आणी दुर्दैवानं हे मानवी संस्कृतीत सगळीकडेच झालंय. बळी तो कान पिळी - मग ते कुठल्याही perceived hierarchy मधे - हा दुर्दैवानं जगाचा नियम आहे. भारतीय राजे-रजवाड्यांच्या, संस्थानिकांच्या, इतकच काय पण आशियातल्या इतरही देशातल्या राजवटीतल्या शुद्ध अडाणीपणाच्या, जुलूमाच्या कथा ऐकून खूप वाईट वाटतं. असो. भरपूर विषयांतर झालं. सिनेमा हा मनोरंजनासाठी आहे आणी आपण इथे गंभीर चर्चा करत बसलो आहोत. एंजॉय द मूव्ही!!

तेव्हाच्या व्यवस्थेचे कवतुक करत नाहीये, गैरसमज करून घेऊ नये

तेव्हा अन्याय होत होता याबद्दल कुठलाही वाद घालायचा नाहीये

माझे म्हणणे इतके आहे की इंग्रज राजवटीपेक्षा आपले लोक परवडले
जुलमी राजकर्ते काय फक्त भारतात नव्हते
फ्रेंच राज्यक्रांती झाली, रशियन झार चा निःपात झाला, मुसोलिनी ला उलटे टांगून मारले तसेच काहीसे आपल्याकडे होऊ शकले असतेय

परत एकदा या सगळ्या जर तर च्या गोष्टी आहेत पण काहीही असले तर इंग्रज राजवट चांगली होती हे सिद्ध होत नाही

लंकादहनात आणि महाभारतात किती मेले हो ?

या दोन्ही घटना प्रत्यक्ष घडल्या याचे पुरावे असतीलच तुमच्याकडे
ते कुपया सादर करणार काय

मी दोन्ही महायुद्ध झाल्याचे पुरावे देतो, चालेल?

आषुचँप
मुद्दा समजलेला नसतानाही आपलेच खरे करून वाद घालण्याच्या चिकाटीला सलाम ! आणि असेच असंबद्ध बोलत रहा.
असेच पुरावे मागत रहा आणि कुणावरही काहीही आरोप करत रहा. कुठलाही विषय स्वतःवर ओढवून घेत जा. अधले मधले काही वाचत जाऊ नकोस. कारण जेव्हां हेच प्रतिसाद पुन्हा पहिल्यापासून वाचशील तेव्हां जाम पस्तावशील, म्हणजे संघी नसशील तर. असशील तर नाही होणार !
(तुझा प्रयत्न यशस्वी झाला मी तुला उद्देशून प्रतिसाद द्यावा म्हणून, पण जी काही आदळ आपट चालू आहे त्यासाठी एक छोटीशी लस ही )

अहो मार्मिक काकू, मला ओळखतात इथे याच आयडीने. पण तुमची ती कुणी जिवाभावाची मैत्रीण दिसत असेल तर माझा नाईलाज आहे. तुमचे चालू द्या. लोकांचा काही काळ गैरसमज होईल इतकेच... मला काही प्रॉब्लेम नाही हो !
(आज च्चुकीच्या मुद्द्यांवर ठाम असणा-यांचे संमेलन भरलेले दिसतेय. कदाचित या धाग्याची ग्रहदिशा वाकडी असावी किंवा धागाकर्त्याचे ग्रह योग्य घरात नसावेत किंवा माझेच )

आशुला संघी बुद्धीचा म्हणणे गैरसमजातून घडले असावे, आता माघार घेता येत नसल्याने किरनुद्दीन रेटून नेट असावेत. दोघांना विनंती, नका भांडू विनाकारण. विनंती आहे बरे, नैतर माझ्यावरच भडकाल.. Happy

हेला, माझ्या कुठल्याही प्रतिसादातून संघी बुद्धीचा किंवा संघी म्हटल्याचे दाखवा.
संघी राष्ट्रवाद असे म्हटलेले आहे. त्याचा विपर्यास केलाय.

पुन्हा देतो

माझा पहिला प्रतिसाद
सर्वप्रथम राष्ट्रवाद चुलीत घालायला शिकले पाहीजे. शीख ब्रिटीशांकडून लढत असोत अथवा बारामतीकडून.. २१ शिखांनी १०००० सैनिकांशी दिलेली लढत यात शौर्य आहेच आहे. सिनेमा पाहिलेला नसल्याने इतकेच.

Submitted by किरणुद्दीन on 26 March, 2019 - 07:48

असेच शौर्य मग मराठा सेनानी प्रतापराव गुजर यांनी दाखवले आहे. ते तर केवळ ७ जणच होते.

अजून इतिहासातले दाखले हवे असतील तर दहाव्या शतकात इंग्लंडमध्ये स्टॅमफोर्ड ब्रिजची लढाई प्रसिद्ध आहे. त्यावेळी एकट्या वायकींग वीराने शेकडोंच्या संख्येत असलेल्या इंग्लिश सैन्याला रोखून धरले होते. आपल्या सैन्याला सज्ज व्हायला वेळ मिळावा म्हणून त्याने वायकींगची ओळख असलेली डबल अॅक्स घेऊन ब्रिजची एक बाजू रोखून धरली आणि एकाही शत्रूला पूल पार करू दिला नाही. अखेरीस एकाने नदीतून पोहत जाऊन ब्रिजखालून त्याच्यावर भाला मारला तेव्हा तो जखमी होऊन मागे हटला.

Submitted by आशुचँप on 26 March, 2019 - 07:49

सर्वप्रथम राष्ट्रवाद चुलीत घालायला शिकले पाहीजे.

म्हणजे उद्या पाकिस्तानने भारतावर सर्जिकल स्ट्राईक केला तर त्यांचे कौतुक करणार का?

Submitted by आशुचँप on 26 March, 2019 - 07:53

राष्ट्रवाद ब्रिटीशांमुळे भारताला माहीत झाला. नाहीतर सगळे इथे एकमेकांच्या रक्ताचा घोट घ्यायला टपलेले होते.

टिपू सुलतान ब्रिटीशांविरुद्ध लढत असताना आणि त्या सैन्याला त्याने जेरीस आणले असताना पेशव्यांनी ब्रिटीशांना मदत करून टिपू सुल्तानाचा पराभव केला.
पेशव्यांना राष्ट्रवादी म्हणणार की देशद्रोही हे ठरवा तुम्हीच. उत्तर आपोआप मिळेल. बाकी विपर्यासासाठी अनेक धन्यवाद.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इथे स्पष्ट व्हायला हवं होतं. हा सिनेमा स्वातंत्र्या आधीचा आहे. तेव्हां राष्ट्रवाद कुणाला माहीत होता ? हे बळंच राष्ट्रवाद घेऊन भांडण उकरून काढत आहेत. माझ्या प्रतिसादात खटकण्यासारखं काहीच नव्हतं. ज्या राष्ट्रवादाचा ते सहारा घेत आहेत तो संघी आहे इतकंच म्हटलंय. त्यावरची त्यांची पुढची आदळआपट पण मजेशीर आहे.
त्यांना उद्देशून संघी म्हटलेलंच नाही. ते त्यांनी ओढवून घेतलेलं आहे. एक राष्ट्र म्हणून स्वतंत्र झालेला भारत आणि ब्रिटीश इंडीयातला भारत या राष्ट्रवादाची तुलना करून ते असंबद्ध वाद घालत आहेत इतकेच. म्हणून त्यांना पेशव्यांचे उदाहरण दिले. तिथेही आक्रस्ताळेपणाच आहे.

इथे शीख ब्रिटीशांच्या बाजूने लढले म्हणून काही लोक आक्षेप घेत आहेत. तर पेशवे पण ब्रिटीशांच्या बाजूने लढले होते एव्हढाच विषय होता. आता हे समजले असेल तर सगळे प्रतिसाद (उत्साह असेल तर) पुन्हा वाचून पहा. विशेषतः आदळआपट वाले.

समजून घेतल्याबद्दल धन्यवाद हेला

पण किरण्याला समजावून काही उपयोग नाही, त्याला शाळेत हट्टी बालक स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले होते

तो जे म्हणतोय मि कुठं काय म्हणालो तर हे

 ब्रिटीशांविरुद्ध टिपू लढला तर तो राष्ट्रवाद नाही, इतर लढले की राष्ट्रवाद ही काय भानगड ? आपल्या डोक्याच्या बाहेरचे आहे हे सोयीचे. आता बास करा जमल्यास..>>>>>

संघी राष्ट्रवादाच्या सोयीच्या व्याख्या आपल्या डोक्याच्या बाहेरच्याच आहे>>>

मला तुमच्याशी वाद घालण्यात रस नाही. तुमची बैठक उघड झाली आहे इतकेच.>>>>

राहिली संघाची बात. तर घरात बसून राष्ट्रवादाच्या गप्पा मारणे ही संघीत शैली आहे. त्यासाठी घरातील प्रत्येकाने संघात जावे लागत नाही.
शिवाय आजकाल ऑनलाईन शाखा भरतात. कुठून ना कुठून या राष्ट्रवादाच्या कल्पना डोस्क्यात शिरत असतात. ज्या तुमच्या डोक्यात आहेत. हे सुद्धा नाकारणार असाल तर बिन्धास्त नाकारा, मला काही एक फरक पडत नाही.>>>>
राष्ट्रवाद हे बदमाषांचे शेवटचे हत्यार आहे. नाझी राष्ट्रवादाने जर्मनीचे भले झाले असे तुमचे म्हणणे असेल तर तुम्हाला तुमच्या राष्ट्रवादाच्या कल्पना मुबारक. >>>

ज्या राष्ट्रवादात मुसलमानांना स्थान नाही त्या राष्ट्रवादाची गंमत मला समजून घेण्याची इच्छा नाही. तुमचे बेसिक्स क्लिअर करा.>>>>

एकदा म्हणता ब्रिटीशांच्या बाजूने टिपूशी लढणे योग्य होते, हजारो वर्षांची परंपरा होती एकदा म्हणता केसरी मधला राष्ट्रवाद गंडलेला आहे. गंभीर लोच्या आहे.>>>>

मुसलमानांना स्थान नाहीं काय आणि नाझी काय
इतका असम्बध बरळत चाललंय बाळ की पुरेवाट झाली हसून

पन्नाशीचा बाळ मला काका म्हणतो म्हणजे मी ७५ त गेलो. थोडक्यात ते फेक प्रोफाईल तुमचंच होतं की काका काका म्हणणारं... त्या प्रोफाईलची मानसिकता पूर्ण सडकी आणि घाणेरडी होती. अगदीच शिवराळ नाही पण समकक्ष भाषा होती. >>>>

पुढे हे चिमखडे बोल

एक घाणेरडं, सडकं आणि अत्यंत विकृत असं प्रोफाईल आहे ते काका काका म्हणतं त्याची माहिती मी दिली आहे फक्त. तुम्ही नेहमीच्या पद्धतीने ओढवून घेतली असेल तर माझा नाईलाज आहे.>>>>

आणि मग ही सारवासारव

मला खात्री आहे हाच संघात जातो कारण गिरे तो भी टांग उपर करणारे लोक त्यांना हवेच असतात, खेरीज ऑनलाईन शाखा वगैरे असतात हे मला याकडून कळल्यामुळे हाच त्या चालवत असावा अशी शंका येते आहे

किरण्याने वर जे केलं आहे त्याला संघी भाषेत आक्रस्ताळेपणा आदळआपट म्हणत नसावेत बहुदा

त्या लोकांना मुद्दे मांडता आले नाहीत की असे फ्रस्ट्रेशन येऊन करतात त्याला समजावून सांगणे म्हणत असावेत बहुतेक

हासुचँप
तुकडे तुकडे तोडून छान चालू आहे. मला वाटतं तुमच्या या भांडणात (एकतर्फी) ज्याला रस असेल तो एकदा तरी पहिल्यापासून सगळे प्रतिसाद नक्कीच वाचेल. चालू द्या आदळआपट.

माझीही तीच इच्छा आहे की सगळे प्रतिसाद नीट वाचले जावेत म्हणजे मग संघी कोण, राष्ट्रवादी कोण, मुस्लिम आणि नाझी चा विषय आणला कोणी, दुआयडी असल्याचा बिनबुडाचा आरोप केला कोणी हे सगळे नीट कळेल. आक्रस्ताळेपणा कोण करतंय हेही दिसेल.

राष्ट्रवाद म्हणजे काय नीट माहीत असतं ना तर एव्हढे प्रतिसाद देऊन पुन्हा पुन्हा इथे यावं लागलं नसतं. बाय. रहा इथेच.

का शाखेत चालला का? अंगाशी आल्यावर पळ काढणे खासियत आहेच तुमची, परंपरा चालू ठेवल्याबद्दल अभिनंदन

हासुचँप आता मात्र तू पक्का संघी असल्याचे सिद्ध केले. तिथे शिशुवर्गात पळ काढला का वगैरे चर्चेतली वाक्ये शिकवत असतात. मी फक्त संघी राष्ट्रवाद म्हणालो ते तुला इतके लागले की बस्स. म्हणजे तू संघी नसतास तर नसते लागले एव्हढे. पण छुपा संघी म्हणून वावरायचे, तटस्थतेचे सोंग आणायचे हे फार काळ चालत नसते. तुला एकदाही मी संघी म्हणालो नाही तरी तुझा आक्रस्ताळेपणा चालूच आहे तर मग मी म्हणतोच तुला.

आहेस तू संघी.
तू मला शाखेत जायचे म्हणालास तरी मला आला का राग ?
कारण मला ते लागलेच नाही.

तू संघी होतास, आहे आणि राहणार.
संघी ! संघी !! संघी !!!

ये आता Lol

राग कोणाला आला तो दिसतोच आहे, चुकार ढोरांगत जातो जातो म्हणत परत इथेच घोटाळतो आहेस
बोलायची इच्छा नाही म्हणत परत परत बरळतो आहेसच

तू कोण आहेस ते पक्के कळलं आहे मला बाळा

शिशुवर्गात पळ काढला का वगैरे चर्चेतली वाक्ये शिकवत असतात. >>>

बघ हे सुद्धा तुला माहितीये जे मला माहिती नव्हतं
म्हणजे कोण शिशु असल्यापासून शाखेत जातोय हे उघड झालं

तू आता कीव येण्याच्याही पलीकडे चालला आहेस. मी संघी म्हणजे एक शिवी समजतो, आता हे तुझ्या शाखेतल्या कुठल्याही छुप्या संघोट्या ला म्हणायला सांग बघू म्हणतोय का.

अरे मंदबुद्धी बालक, माझे इतके माबोवर लिखाण आहे त्यात एकतरी संघीय लिखाण असल्याचे दाखवून दे नायतर तोंडघशी पडला आहेस हे मान्य कर.

आशुचँप, कुणाशी वाद घालताय? अहो, भल्याभल्यांना लोळवले आहे ताईंनी. त्यांचा दरारा माहित नाही का तुम्हाला? Lol
एकदा त्यांनी हुप्पाहुय्या करून गोंधळ घालायला सुरूवात केली ना, की नदी वाहते तशी वळणं फुटत्तात वादाला.
ताई, इतके सध्या पुरे की आणखी लिहू? Proud

अ‍ॅडमिन / वेमा
मार्मिक कोण आहेत मला कल्पना नाही. ते/त्या कोणत्या ताईंबद्दल बोलताहेत याचीही कल्पना नाही. यांचा काही तरी गैरसमज झालेला असेल म्हणून खुलासे केले. पण ही पलिकडची केस वाटतेय. तुम्हीच त्यांना (त्या मागच्या आयडीला) समजावून सांगणे योग्य होईल.

Pages