केसरी - चित्रपट परीक्षण/रिव्यू - स्पॉईलर अलर्ट

Submitted by भागवत on 24 March, 2019 - 09:59

“युद्धस्य कथा रम्या” असे म्हटले जाते. कारण युद्धात देशभक्ती, पराक्रम, त्याग, राजकारण, प्रखर संवाद, आरपारची लढाई, होत्याम्य, आणि बलिदान यांची भरपूर रेलचेल असते. बऱ्याच वेळेस आपल्याला कथा आपल्याला माहीत असते पण आपण चित्रपट बघतो कारण खरे कौशल कथेची मांडणी करण्यात असते आणि प्रेक्षक त्याकडे विशेष लक्ष देतात. केसरी हा चित्रपट ऐतिहासिक अश्या “सारगढीची लढाई” वर आधारित आहे. ही लढाई १२ सप्टेंबर १८९७ या दिवशी ब्रिटिश साम्राज्याच्या 36व्या शीख रेजिमेंटच्या २१ जवान आणि १०००० अफगाणी पठाण यांच्यात झाली होती. जगातील आता पर्यंतच्या पहिल्या पाच सर्वोच्च लढाईत या लढाईची गणना होते. त्यांच्या पराक्रम ऐकूनच आपण रोमांचित होतो. ते क्षण जर आपल्या डोळ्यासमोर साकारले तर काय होईल?

पहिला हाफ ठीकठाक आहे. चित्रपटाची पहिले १० मिनिटामध्ये सोडली तर त्यात विशेष काही नाही. अक्षय कुमार जो की हवलदार ईशर सिंह यांची भूमिका करतोय त्याचा प्रवेश ठीकठाक झाला आहे. इतर व्यावसायिक सिनेमा प्रमाणे डशिंग एन्ट्रीक टाळली आहे. सगळा फोकॅस ईशर सिंह या व्यक्तीरेखे वर आहे. खास करून खलनायकाचे पात्र चांगले फुलवता आले असते. खलनायकाला त्याच्या व्यक्तिरेखेला पहिले १० मिनिटे वगळता पहिल्या हाफ मध्ये वाव नाही. परिणीतीचे व्यक्तिरेखा सुद्धा आणखी चांगल्या पद्धतीने रंगवता आली असती. तिच्या व्यक्तिरेखेला थोडा वेळ आणि न्याय द्यायला पाहिजे होता. पहिल्या भागात चित्रपट संथ होतो पण त्यात विनोदी पेरणी उत्तम केली आहे. तेरी मिट्टी गाणे सुरेल झाले आहे.

सारगढीच्या किल्ल्याचे जागेचे खूप महत्त्व असते. दोन मोठ्या गुलिस्तान आणि लॉकहार्ट किल्ल्या मधील संभाषण पोहचण्याचे काम इथे होत असते आणि त्यासाठी हा किल्ला एक महत्त्वाचा दुवा असतो. खलनायक आणि त्याचे दोन साथीदार अचानक सारगढीच्या किल्ल्यावर आक्रमण करतात. त्यांना फक्त २१ सैनिक उत्तर देतात. पण का आक्रमण करतात यांचे थोडे जास्त कथानक दाखवले असते तर उत्तम झाले असते. दुसरा हाफ मात्र कमाल आहे. युद्धाचे प्रसंग चांगल्या रित्या दर्शवलेले आहेत. २१ सैनिकाचे हळवे क्षण आणि जबरदस्त मनोधर्य योग्य पद्धतीने दाखवलेले आहेत. ज्या वेळेस भोलाला एक बदाम मिळतो आणि तो जपून ठेवतो तो भावनिक क्षण छान टिपला आहे. भोला सिंहचे जाताना हसणे चटका लावून जाते.

छायाचित्रणाची कसब पणाला लागल्या मुले काम छान झाले आहे. पहिल्या भागाचे दिग्दर्शन ठीक आहे पण दुसरा भाग अप्रतिम आहे. दिग्दर्शकाने ऐतिहासिक कथेवर चांगले काम केले आहे. “अनुराग सिंग” यांचे हिंदीत पहिले दिग्दर्शन आहे हे जाणवत नाही. या आधी अनुरागने पंजाबीत काही हिट चित्रपट दिले आहेत. चित्रपटात लढाई दाखवताना पार्श्वसंगीताचा उत्तम रित्या वापर केलेला आहे. चित्रपटाचे दुसऱ्या भागाचे संपादन सुद्धा एकदम झक्कास झाले आहे. ईशर सिंहचे दुसऱ्या भागातील दृश्य बघताना अंगावर काटाच येतो. काही लढाईचे क्षण तर इतके जबरदस्त आहेत की तुमचे पैसे वसूल झाल्याचे समाधान तुम्हाला मिळते. संवाद मात्र करकरीत आहेत. अक्षय कुमारच्या वाट्याला उत्तम संवाद आले आहेत.

चित्रपट संपल्या नंतर फक्त काही सह कलाकाराची नाव लक्षात राहतात. बाकी २० सैनिकाच्या उप-कथानक आणखी फुलवता आली असती तर चित्रपट आणखी बहरला असता. पहिल्या भागात काही दृश्य गुळगुळीत झाली आहेत. दुसर्‍या भागात प्रत्येक पात्राची भावनिक गुंतागुंत आणि कर्तव्य यांची छान पद्धतीने रेखाटणी झाली आहे. प्रत्येक सैनिक असलेल्या कलाकाराने अभिनयाचा आलेख उंच नेला आहे. कास्टिंग व्यवस्थित आणि चांगली झाली आहे. ईशर सिंह यांचे वरिष्ठ इंगज यांच्या वाट्याला फक्त २-३ दृश्य आहेत. व्हीएफएक्सचा वापर जरी कमी असला तरी युद्धाचे दृश्य एकदम कडक आहेत. ईशर सिंहचा त्वेष, शौर्य, जबाबदारी, गिळलेला अपमान आणि त्यातून पेटून उठून केलेला उत्तुंग पराक्रम उठून दिसतो. शेवटी अति तटीच्या संग्रामात २१ सैनिकाची आहुती पडते. शेवटी तर गुरमुख सिंह हे पात्र अद्भुत युद्ध करून मन जिंकतो.

व्हीएफएक्सचा आणखी चांगला वापर करून युद्ध दृश्याची परिणामकरता आणखी वाढवता आली असती. सह कलाकारांना आणखी चांगल्या पद्धतीने प्रस्तावित करता आले असते तर आणखी सुसंगत वाटले असते. पहिला हाफ आणखी सुंदर केला असता तर चित्रपटाला जास्त रंग चढला असता. खलनायक, सह-कलाकार यांना आणखी वाव द्यायला पाहिजे होता.

ऐतिहासिक कथा बीज, सह-कलाकाराचा उत्तम अभिनय, चांगली आणि भडकपणा नसलेली मांडणी, न्याय देणारी पटकथा, पार्श्वसंगीताचा योग्य वापर, लढाईचे उत्तम चित्रीकरण, ऐतिहासिक कथेला न्याय देण्याचा चांगला प्रयत्न आणि अक्षय कुमारच्या चांगला अभिनयाने नटलेला चित्रपट. यामुळे चित्रपट वेगळ्या उंची वर गेला आहे. दुसरा हाफ पहिल्या हाफची राहिलेली कसर भरून काढतो. एक चांगला चित्रपट बघितल्याचे समाधान आपल्याला भेटते. मला या चित्रपटाला ५ पैकी कमीत कमी ३.५ स्टार द्यायला आवडेल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

आज घरातला गॅस संपला तर बायकोने चक्क लॅपटॉप घेतला आणि मायबोली साईट ओपन करून स्क्रीनवर पोळ्या भाजल्या. आता दुपार झाले पण डब्यातल्या पोळ्या अजूनही तशाच गरमा गरम आहेत. मी लाभार्थी ही माझी मायबोली.

ओ बोकलत ,
माझा काही एक संबंध नाही लॅपटॉप तापवण्यात.

एकाला राष्ट्रवाद चुलीत घाला म्हटल्याचा राग आला तर एक परदेशस्थ भारतीय महिला एका भारतीय नारीसोबतचे युद्ध खेळण्यासाठी जाणतेपणे मला त्या महिलेचे रूप ठरवून बाण सोडत आहे. हे दोन जीव तापलेले राहीले तर तुमचे गॅसचे बील एकदमच कमी होऊन जाईल. मग त्या वाचलेल्या पैशात मला पार्टी द्या.

किरण्याची मंदबुद्धी त्याला अजूनही सोडून गेलेली नाही असे दिसत आहे

आचरटपणा करण्यात पटाईत दिसतोय हा, आधी बरा वाटलेला
आता पूर्ण कामातून गेलाय असं दिसतंय

आवा चालली पंढरपूर, वेशीपासून आली दारा

वाद घालायचा नाही, बाय म्हणून गेलेलं मांजर गोणत्यात घालून सोडलं तरी परत परत येऊन राहिलंय:)

मी काही चित्रपट पाहिलेला नाही, पण मुळात त्या केसरी पगड्या आणि म्हणून चित्रपटाचं नाव, हे इतिहासाला धरून नाही. ब्रिटिश सैनिकांचे पोशाख खाकी असत. भगवा रंग वापरायला अजिबात परवानगी नव्हती.

अ‍ॅडमिन / वेमा
मार्मिक कोण आहेत मला कल्पना नाही. ते/त्या कोणत्या ताईंबद्दल बोलताहेत याचीही कल्पना नाही. यांचा काही तरी गैरसमज झालेला असेल म्हणून खुलासे केले. पण ही पलिकडची केस वाटतेय. तुम्हीच त्यांना (त्या मागच्या आयडीला) समजावून सांगणे योग्य होईल.

>>तरी मला वाटलेच अजून अ‍ॅडमिन / वेमांचा धावा कसा केला नाही. जुनी सवय आहे ही. बाण वर्मी बसायला लागले की रडत अ‍ॅडमिनकडे जायची. कधी मोठ्या होणार तुम्ही? Lol

असो. माझ्या पोस्टमध्ये एक जरी वावगा शब्द असला तर अ‍ॅडमिन योग्य ती कारवाई करतीलच. दर वेळेस तुम्ही रडत गेलात की त्यांनी धावून यायलाच पाहिजे अशी अपेक्षा करून कसे चालेल बरे? Proud

अहो मार्मिकताई

तुम्ही तुमच्या ओरिजिनल आयडीने तुम्हाला ज्यांच्याशी भांडायचेय त्यांच्या ओरिजिनल आयडीशी चांगले कचकचून भांडा की. कोण नाही म्हणतंय ? आम्ही येऊ की पॉपकॉर्न / कोल्ड्रींक्स घेऊन गंमत बघायला. मला ओढून काहीही होणार नाही. मला आता हसू यायला लागलंय. मी बाई नाही हे सांगूनही फायदा नाही हे लक्षात आलेलं आहे. तुमच्या समाधानासाठी झालोही असतो, पण इतकी वर्षे सवय नाही ना, अवघड होईल हो आयुष्य, दुसरे काही नाही !

अ‍ॅडमिन / वेमांकडे धावा बिवा नाही केलेला. त्यांच्याकडे आयपी अ‍ॅड्रेस असतात. तुमची केस हाताबाहेर जायच्या आधी तुम्हाला ते मदत करू शकतात इतकेच. आमच्यावर थोडे ना विश्वास ठेवताय तुम्ही ? त्यांनी सांगितलेलं कसं बरं नाकारणार ?

तुम्ही तुमच्या ओरिजिनल आयडीने तुम्हाला ज्यांच्याशी भांडायचेय त्यांच्या ओरिजिनल आयडीशी चांगले कचकचून भांडा की.

>> ये हुई ना बात! अहो, तेच तर म्हणणे आहे माझे. तुम्ही तुमच्या ओरिजिनल आयडीने हवा तो गोंधळ घाला. पण जरा आयडी उघडकीला येतो असे वाटले की तुम्ही पळ काढता आणि दुसरे रूप घेऊन येता. पण आतल्यासहित माणूस उघडा पडतोच. Lol
माझे पर्सनली तुमच्या ओरिजिनल आयडीशी काहीच भांडण नाही, मग करकचून भांडण कुठल्या बेसिसवर करणार?
माझा विरोध फक्त एकाच गोष्टीला आहे की तुम्ही ड्युप्लीकेट आयडी घेऊन लोकांच्या मूळ आयडीशी भांडता. थोडक्यात तुम्ही नखशिखान्त चिलखत घालून येता आणि ज्यांच्याशी लढता त्यांना बिचार्‍यांना माहितच नसते की वार कुठे करायचा आहे.
ये तो अनफेअर हुआ ना?
मूळ कपड्यात या आणि ज्या काही सा नी ध प ताना मारायच्यात त्या मारा. I promise की मी ज्यांची युद्धे त्यांना लढू देईन. आणि इतकासाही हस्तक्षेप करणार नाही.

हा इथला आणि इतर धाग्यांवर होत असलेला गोंधळ बघुन असं वाटायला लागलं आहे कि माबोवर एक असा पर्मनंट धागा हवा कि जिथे डुप्लिकेट, फेक, जेन्युइन आय्डींच्या जोड्या जुळवण्याची (अर्थात योग्य अभ्यास, रिसर्च करुनच. Proud ) सोय असावी. मीच काढला असता पण विषयाचा आवाका माझ्या क्षमतेच्या पलिकडे आहे... Wink

प्रिय अ‍ॅडमिन,
किरणुद्दीन परत तुमच्याकडे रडत येणार (ह्या किंवा ओरिजनल आयडीने) ह्यात शंका नाही.
परंतु, ह्यावेळेस माझा मेसेज उडवला गेला तर कृपया कारण नक्की द्या.
कारण ड्यूप आयडीची शंका घेणे ह्यात कुठल्याही सभ्यतेच्या मर्यादांची पातळी ओलांडली जात नाही.

ऍमेझॉन प्राईम वर केसरी बघायचा प्रयत्न केला
कमालीचा भिकार आणि कंटाळवाणा आहे. अक्षय कुमार आणि परिणीताची साईड स्टोरी कधी एकदा संपून मुख्य विषयाकडे येऊ म्हणून ढकलत ढकलत पुढे नेला तर तिथेही निराशा.
प्रत्येक युद्धात एक नुकताच लग्न झालेला पण सुहागरात्र न केलेला सैनिक असलाच पाहिजे असा नियम आहे का? मध्येच गाणी काय, क्लिशे संवाद काय.
किती ते भावनिक उमाळे, किती भिकार व्हिजुअल इफेक्ट, कमालीचा खोटा किल्ला, पुण्यातली पोरे दिवाळीला बरा किल्ला करतात. आपल्या लोकांनी युद्धपट काढूच नयेत.

ज्या पद्धतीने हा किल्ला लढवला गेला त्याचा दाखला युद्धशास्त्राच्या विद्यार्थ्यांना देतात म्हणे, पण अक्षय कुमार, त्याचे लार्जर दॅन लाईफ असणे आणि एकुणच बहुदा शिख समुदायाला खुष करून टाकणे यापलिकडे चित्रपट जात नाही.

शेवटच्या लढाईच्या प्रसंगात चांगला वेग घेतला आहे, पण तिथेही थोडी माती खाल्ली आहेच. समजा तुम्ही अफगाणी सैनिक आहात, तुमच्याकडे बंदुका आहेत. समोर अक्षय कुमार एकटा तलवार आणि कडे घेऊन उभा आहे, मरण्यासाठी तयार. तर तुम्ही काय कराल...

बरोबर, बंदुका बाजूला ठेऊन एकावेळी एकेक त्यावर चाल करून जाल जेणेकरून तो सविस्तरपणे एकेकाला भोसकू शकेल. शेवटी प्रत्येकाची सोय बघितली पाहिजे.

Mi anek varsha Ma. bo. cha vachak matra aahe. Khup sakas lekhan hota ithe.
Aaj Sadsaya fakta evdhya sathi zalo aahe ki ithe ek Hindu dvesta far far purvi pasun karyarat aahe to pratyek Dhagyavar yeun nehmichach gondhal sadar karto. id navin asto bhasha tich aste!
Kadhi kadhi vatata muslim aakramak velich haklun dile aste tar ya desha chi kevdhhi tari hani vachali asti. Sarva, agadi sarva thikani hi liability gheun deshacha gada odhhala jatoy!
Parantu, tari ya deshala manapasun aapla mannarya sarva muslimana matra mi bandhuch manto. Jyancha sathhi aaplyala sarva kahi denara ha desh, dharma chya hi var aahe tya sarva Hindu /Muslims na mazyakadun aadar.
Tar mudda evdhhach ki tya updravi id/ids chya veglech valan lavnarya Pratisadkankade laksha devun aapli shakti v vel vaya ghalvu naye. To sudharnar nahi, mi hey geli 5/6 varshye baghtoy.
Baki aavad jyachi tyachi.
Dhanyawad

"शेवटच्या लढाईच्या प्रसंगात चांगला वेग घेतला आहे, पण तिथेही थोडी माती खाल्ली आहेच. समजा तुम्ही अफगाणी सैनिक आहात, तुमच्याकडे बंदुका आहेत. समोर अक्षय कुमार एकटा तलवार आणि कडे घेऊन उभा आहे, मरण्यासाठी तयार. तर तुम्ही काय कराल.." - Happy इथे आशुचँप मधे फारएण्डानं परकायाप्रवेश (ओम फट स्वाहा!) केल्यासारखं वाटलं. Happy

बिंगो, हे त्याच्याच चित्रपट परीक्षणाच्या शैलीत लिहिलं आहे
आमराईत बॉम्ब फोडण्याचा सिन आणि घोड्यावरून येऊन भोसकणे आणि वर हा हा करून हसणे Happy

Pages