कर्जत किंवा लोणावळा मधील रिसॉर्ट ची माहीती

Submitted by साहिल शहा on 24 March, 2019 - 09:14

पुढच्या महिन्यात मुलीचा वाढदिवस कर्जत /लोणावळ्यामधी एका रिसॉर्ट मध्ये करायचा विचार आहे जेणेकरुन मुंबई आणी पुण्यावरुन एकुण ५० लोक येउ शकतिल. तर त्याबद्दाल एखादे चांगले ठिकाण आणि बजेट बद्द्ल माहिती हवी आहे ?

धन्यवाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

होटेल? ट्रिवागो!

जोक्स अपार्ट, आधी गो आयबीबो वगैरे साईट्सवर रिसोर्ट्स पहा, बजेट बघा, अन मग स्वतः गाडी काढून तिथे जा, पर्सनली त्या लोकांशी बोलून जोरदार घासाघीस करा. त्याशिवाय जमत नाही. पुढच्या महिन्यात परिक्षा संपून सुट्या सुरू होतील, (एप्रिल) तेव्हा व्हेकेशन डेस्तिनेशन्स जरा महागडी होतीलच.

लोणावळ्यात अनेक बंगले, अपार्टमेंट/घरे आहेत, जिथे प्रायवेट पार्टीज अ‍ॅरेंज होऊ शकतात. लुक इंटू इट.

माबो वर्षासहल / गटग अ‍ॅरेंजमेंट करणार्‍या खंद्या शीलेदारांच्या विपुत रिक्वेस्ट टाकून मदत मागा.

पिल्लू ला हॅप्पी बड्डे अन आशिर्वाद इन अ‍ॅडव्हान्स.

लोणावळ्यात रॉयल सवेरा ला बरीच फंक्शन होताना पाहिली आहेत.तिथे एकदा राहिलो होतो तेव्हा अनुभव चांगला होता.खाणं आवडलं होतं.फक्त त्यांचा स्विमिंग पूल एकदमच चिमुकला आहे, बहुतेक स्विमिंग लोणावळ्यात येणारे विशेष करत नसावे.
हिलस्केप नावाच्या हॉटेल मध्ये राहिलो होतो.बंगला आहे, त्याच्या वेगवेगळ्या खोल्या रूम म्हणून देतात.तेही चांगले आहे.
एकदा गिरीवन/ढेपे वाडा/कोर्टयार्ड मॅरियोट च्या बजेट ची पण चौकशी करा.
गिरीवन मध्ये बरेच बंगले आहेत चांगले.मात्र फूड चे बघावे लागेल गिरीवन वाले कसं देतात ते.
हिंजवडी कोर्टयार्ड ला बरीच लग्नं होतात.रेट चे माहीत नाही.(पाहुण्यांना हिंजवडीत संध्याकाळी पार्टीला नेणे, तेही वर्किंग डे च्या ट्रॅफिक मध्ये हा जरा छळ प्रकारात मोडेल. पण रेट चांगले मिळत असल्यास पाहुणे सहन करतील.)
कर्जत ला सॅफ्रॉन स्टेज ची चौकशी करा.
मोबाईल रेंज नसलेली चालणार असेल तर भीमाशंकर च्या आधी ब्लु मॉरमन हॉटेलमध्ये मोठा बंगला घेऊन चालणार असेल तर बघा(अगदी लहान मुलं बोअर होऊ शकतील.)
मुलं रमवणं हा मूळ उद्देश असेल तर टॅटू आर्टिस्ट, प्रॉप फोटो स्टुडिओ,जंपिंग जॅक,ट्रॅमपोलिन आदी भाड्याने घेऊन कोणताही साधा सोसायटी हॉल पण चालेल
(सल्ले अति अवांतर वाटल्यास सोडून द्या)

धन्यवाद आ.रा.रा. आणि mi_anu .

भिमा शंकर मुम्बई पासुन लांब असल्याने आणी गिरिवन मध्ये जाउन आल्याने ते बाद . बाकीच्या पर्ययावर विचार चालु आहे. सोसायटीच्या हॉल बद्द्ल पण विचार चालु आहे. मागच्या वर्षाविहार च्या रिसॉर्ट चे पत्ते काढलेत आणि त्याना पण फोन करणे चालु आहे.

UKs resort

मला सोरटी सोमनाथ व जवळील पर्यटन स्थळे पहायचे आहे गाडी करुन जाणार आहे तेथील माहिती मिळू शकेल का

ढेपे वाडा छान अन परवडणेबल आहे. फक्त जरा अ‍ॅप्रोचला कठीण आहे. येणार्‍यांपाशी स्वतःच्या कार्स असतील तर मस्त जमते. नाहीतर ट्रान्सपोर्टचे बजेट हाताबाहेर जाते.