सौदी अरेबियन बाईट्स

Submitted by राजेश्री on 21 March, 2019 - 10:50

#सातारा_डायरी
सौदी अरेबियन बाईट्स
प्रवासात जगातल्या कानाकोपर्यातील बातम्या कळतात.प्रवासात माणसे कळतात,एका विशिष्ट सेवेतील लोकांच्या अडीअडचणी समजतात... आपण नाही सोडवू शकत त्या समस्या पण आपल्या समस्या यापुढे फार किरकोळ आहेत ही होणारी जाणीव आपली जगण्याची सकारात्मकता वाढविते.
काल ट्रॅव्हलसच्या केबिन मध्ये ड्रायव्हर आणि दुसरी ड्रायव्हर व्यक्तीचा संवाद कानावर पडत होता.ड्रायव्हर म्हणून नोकरी करायला एजंट मार्फत सौदी अरेबियात गेलेल्या तरुणाची चित्तरकथा त्याच्याच तोंडून सांगते...
त्याची गोष्ट आधीच्या प्रवासात अर्धी सांगून झाली होती...पण पुढच ऐकताना हे लक्षात आलं की तो एजंट मार्फत सौदी अरेबिया ला गेला होता आणि तिथे व्हिसा नसल्याने कोणत्याही क्षणी तिथले पोलीस पकडून तुरुंगात टाकतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तो सांगू लागला...तो एजंट आता त्याला सौदी मधून भारतात पाठवायच्या हालचाली करीत होता...त्याने दिलेले अडीच लाख रुपये परत द्यायचे नाव त्याने काढले नाहीच..उलट आता पैसे गेले तर गेले आयुष्यभर सौदी अरेबियाच्या तुरुंगात खितपत पडायची वेळ येऊन ठेपली होती...मी माझ्या नशिबाला दोष दिला..जे जे समोर येईल त्याला तोंड द्यायचे ठरवले...दुसरा पर्याय नव्हताच...मग एजंट ने त्याच्या हातात कसले आयकार्ड दिले आणि कुणी अडवले तर दाखवायला सांगितले.मी म्हंटल यावर माझं नाव नाही काय नाही हे दाखवून माझ्याबद्दल दुसरीच शंका आली तर काय करायचं.तो काही न बोलता माझ्या हातावर अडीचशे रुपये टेकऊन निघून गेला.मला एजंट ने बसवलेली गाडी चालू झाली माझ्यासोबत भारतातील तामिळनाडू,चेन्नई,बांग्लादेश,म्यानमार देशातील चारजण होते.आम्ही पाच जण नशीब काढायला सौदी अरेबियात आलो होतो आणि आता पुरते अडकलो होतो कारण त्याचवेळी नेमकी पोलिसांची व्हिसा नसणाऱ्या लोकांना पकडून जेल मध्ये टाकण्याची मोहीम सुरू झाली होती. आम्ही एजंट मार्फत आलो असल्याने असही काही घडू शकत आम्हाला कल्पना नव्हती.कर्माची फळे म्हणून आम्ही मुकाट्याने गाडीत जाऊन बसलो होतो.त्या गाडीत चेकर आला काही माणसांना पकडले.मी माझं एजंटने दिलेले ओळखपत्र दाखवले.ते बघून मला परत केले.मी सुटकेचा निश्वास टाकला.त्या गाडीतून दुसऱ्या दिवशी एका आम्हाला माणसाने एका घरात नेऊन बसवलं आणि मी सांगेपर्यंत बाहेर पडायचे नाही अस सांगितलं. आम्ही पाचजण स्वतःकडील पैसे शिल्लक राहावेत म्हणून पाच दिवस फक्त एक ताट पाचजनात जेवत होतो...सगळ्यांकडचे पैसे संपले शेवटी फक्त पाणी पिऊन दोन दिवस काढले.एका माणसाने त्याच्याजवळचा फोन विकायचा ठरवला आम्ही फोन घेवून खूप फिरलो पण फोन विकला गेला नाही.चार दिवस आम्ही उपाशी पोटी झोपलो.एका माणसाच्या मित्राने एजंटला घायला अडीचहजार रुपये त्याला दिले.तो आम्हा चौघांना म्हणाला चला जेवायला जाऊया आम्ही म्हणालो तुला एजंट ला द्यायला कमी पडतील तू तरी जा पैसे आहेत तर तुझ्या घरी तो म्हणाला ती काय करायचं पुन्हा ठरवू आधी जेऊया...आम्ही त्यादिवशी एकूण पाच दिवसांनी पोटभर जेवण केले.आता त्याच्याकडे फक्त दोन हजार रुपये राहिले.एजंट आला त्याला त्याने ते दोन हजार दिले...त्याने वर त्याला दोनशे मागितले..तो म्हणाला नाहीत.मग त्याने ते पैसे त्याला परत देत तुझं काम होणार नाही म्हणाला...
एवढं सांगून झालं ऐकणारा ड्रायव्हर तो सांगेल तस ह ह असे हुंकार भरत होता..उंब्रज ला रस्त्यावर जाम ट्रॅफिक लागलं.सगळीकडे हॉर्न,गोंगाट मी मनात विचार केला की आता काही आपल्याला पुढची घडामोडी ऐकायला मिळणार नाही.पुढं काय झालं सांगा अस कसं म्हणायचं...आमची गाडी पुढं गेली.बस ला मागून कुणी धडकल अस त्यो सौदी अरेबियन बाईटस सांगणारा व्यक्ती म्हणाला...पोलीस गाडी होती तिथे...गर्दी पांगवत होते...हळूहळू का होईना आमची गाडी मार्गाला लागली आता मी ती गोष्ट मार्गी लागावी या विचारात होते...
सौदी अरेबिया वरून परत आलेला माणूस माझ्या समोर बसुन त्याची चित्तथरारक कथा ऐकवितो आहे हे मला अनाकलनीय आश्चर्यकारक वाटत होतं..विचार केला आता या व्यक्तीला माहीत पण नाही की आपण एखाद्या लिवत्या व्यक्तीसमोर ही कथा सांगतोय...ही कथा शब्दबद्ध होईल त्याच्या ध्यानीही नव्हती...माझे कान पुढचा भाग ऐकायला आसुसले होते जसे तुमचे पुढचा भाग वाचायला आसुसतील...(क्रमश:)

©राजश्री

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हि गोष्ट/ कहाणी वाचून मला नॉट विदाउट माय डॉटर हे पुस्तक आठवलं. अमेरिकन लेखिका किती भयानक परिस्थितीतून जाते व शेवटी मुलीला घेऊनच इराणमधून बाहेर पडते ही अतिशय चित्तथरारक कहाणी आहे. प्रत्येकाने वाचलंच पाहिजे असे पुस्तक आहे.
आई-बाप जैविक गरजेपोटी कुवतीबाहेर पोरं जन्माला घालतात. नीट पालनपोषण करू शकत नाहीत, त्यातून शोषण जन्माला येते. अनेक निरपराध जीव भरडले जातात.