काय देऊ मी तुला

Submitted by Asu on 20 March, 2019 - 00:40

काय देऊ मी तुला

भरकटलेल्या आयुष्यात
दिशा दिली तू मला
काय देऊ मी तुला
प्रीतीच्या फुला
नवजन्म दिला तू मला
काय देऊ मी तुला
इंद्रधनूच्या हिंदोळ्यावर
नभी बसविन तुला
केसांमध्ये माळीन तुझ्या
चमचमती चंद्रकला
नवजन्म दिला तू मला
काय देऊ मी तुला
सोने चांदी, गाडी बंगला
तवहास्याचि सर ना त्याला
अढळ प्रीतीचे स्थान दिले
हृदयांतरी तुला
नवजन्म दिला तू मला
काय देऊ मी तुला
तीन तपांची साथ लाभली
परिसस्पर्श जाहला
सात जन्मी साथ मिळू दे
हेच मागणे तुला
नवजन्म दिला तू मला
काय देऊ मी तुला

- प्रा. अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults