चौकीदार

Submitted by DJ. on 19 March, 2019 - 05:38

चौकीदार

आमच्या बिल्डिंगचा आधीचा चौकीदार फार सज्जन माणुस. कोणाला काहीही बोलायचा नाही. त्याचं काम तो इमाने-इतबारे करायचा पण त्याच्या वागण्या-बोलण्यात धम्मक नसायची. आपल्या सोसायटीला कसा वागण्या-बोलण्यात वाकब्गार असलेला चौकीदार पाहिजे म्हणुन एक-दोन सभासद उगाच त्या चौकीदाराची निंदा-नालस्ती करु लागले. ते दोन सभासद हे सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळाणार्‍या कावेबाज संघटनेचे..! तिथे जी-जी शिकवण मिळेल त्याबरहुकुम वागणारे. झालं..! त्यांच्या कुजबुजीमुळे सोसायटीच्या इतर सभासदांना देखील आहे तो चौकीदार कमालीचा अकर्यक्षम वाटु लागला. चौकीदार कसा हवा - "एकदम तडफदार..!!" असंच सगळ्यांचं मत झालं.

इकडे त्या सार्वजनीक बागेतल्या कोपर्‍यात लाठ्या-काठ्या खेळाणार्‍या कावेबाज बुढाऊंनी त्यांच्याच संघटनेतल्या एका सफेद दाढीवाल्या चौकीदारास कामावर ठेवावे म्हणुन सोसायटी मिटिंगमधे सांगितले. त्याची खुप भलामण केली. त्याने तिकडे दुसर्‍या छोट्या सोसायटीत कशी चकाचौंद कामगिरी केली याचे फोटोशॉप विडीओ दाखवले. सफेद दाढीवाल्या चौकीदाराचे तडफदार वागणे-बोलणे पाहुन सर्वजण आश्चर्यचकीत झाले. लगोलग त्याला सोसायटी मधे भेटण्यास बोलवण्यात आले. "१०० दिवसात तुमच्या सोसायटीला कसा नावलौकीक प्राप्त करुन देतो ते बघा" असे वचन देऊन त्याने सर्वांच्या मनावर अक्षरश: गारुड घातले. सोसायटी मेंबर्सने मिटिंग बोलवुन आपला जुना-जाणता चौकीदार अत्यंत स्लो आहे असा ठराव पास करुन त्याला कामावरुन काढुन टाकले. जाता-जाता जुना-जाणता चौकीदार म्हणुन गेला "माझ्या कामाची आठवण तुम्हाला भविष्यात येईल..!"

सफेद दाढीवाला नवा चौकीदार कामावर रुजु झाला. नवीन-नवीन होता तोवर काही दिवस तो सर्व सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकायचा. बरे वाटायचे. कोणीही सभासद गाडी घेऊन आला की लगेच गेट उघडायचा. आम्हाला खुप कौतुक वाटायचे. त्याची सफेद दाढी, कडक इस्त्रीचा पोषाख आणि खणखणीत आवाजातले बोलणे ऐकुन हा पहिल्यापेक्षा १०० पटींनी चांगला चौकीदार आहे असे वाटायचे. असे थोडे दिवस गेले आणि मग नंतर-नंतर त्याने सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकणे बंद केले. गाडी घेऊन आल्यावर हॉर्न वाजवुनही तो गेट उघडेनासा झाला. दिवसा-ढवळ्या झोपुन राहु लागला. मग मात्र आम्ही त्याला हटकलं तर म्हणे "आधीचाही चौकीदार झोपायचा..! त्याला बरं कधी हटकलं नाहीत..??"

एक दिवस व्हायचं तेच झालं..! बिल्डिंग मधे चोरी झाली. याचा जाब विचारायला गेलो तर म्हणे "आधीच्या चौकीदाराच्या साथीदारांनी चोरी केली आसेल.. त्यालाच विचारा..!" बघता-बघता चोर्‍या वाढु लागल्या. रात्री-बेरात्रीच नव्हे तर दिवसाही चोर चोरी करुन पैशांच्या बॅगा भर-भरुन सोसायटीच्या बाहेर पडु लागले. सभासदांकडे येणार्‍या नातेवाईकांचे खुनही पडु लागले. त्यास खडसावायला गेल्यावर त्याने त्याचे नेहमीचे भसाड्या आवाजातले बोलणे बाणेदारपणे ऐकवले. म्हणाला - "जेव्हा ७० वर्षांपुर्वी ही बिल्डिंग बांधली तेव्हा जो चौकीदार इथे होता त्याच्या चुकीमुळे हे सर्व आता भोगावे लागत आहे. त्या पहिल्या चौकीदाराने चोरांवर धाकच नाही ठेवला त्याला मी तरी काय करणार..? सर्व चूक त्याचीच नव्हे काय..??"

त्यानंतर होणार्‍या चोर्‍यांवर आणि पडणार्‍या मुडद्यांवर आम्ही लक्ष ठेवले तेव्हा लक्षात आले की चोर्‍या फक्त आमच्यासारख्या सामान्य सभासदांच्याच घरी होताहेत. मुडदे देखिल आमच्याच नातलगांचे पडताहेत. सोसायटीचे सेक्रेटरी आणि खजीनदार आपल्याकडुन ज्या चोर्‍या-मार्‍या होताहेत त्याकडे काणाडोळा करण्यासाठी या नव्या चौकीदाराला लाच देत आहेत - त्यांच्या घरी तसेच ज्यांच्यामुळे हा नवा चौकीदार सोसायटीत आला त्या सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणार्‍या - २ कावेबाज सभासदांच्या घरी मात्र चोर्‍या होत नाहीयेत. त्यांच्याकडे येणार्‍या नातलगांचेही खुन पडत नाहित. हा नवा चौकीदार फक्त सेक्रेटरी-खजीनदार-कावेबाज सभासदांच्या घराचीच सुरक्षा करतोय हे लक्षात आल्यावर मात्र आम्हाला जुन्या चौकीदाराची आठवण आली. काहीही न बोलता देखील त्याने त्याचे काम नेहमीच चोखपणे केले होते. त्याला निकम्मा ठरवणार्‍या त्या कावेबाज सभासदांचे ऐकुन सोसायटीने मोठी चूक केली हे लक्षात आले.

उशिरा का होईना पण वेळेत चूक लक्षात आली म्हणुन लगोलग मिटिंग बोलवुन हा सारा प्रकार सर्व सभासदांच्या लक्षात आणुन दिला. सेक्रेटरी-खजीनदार आणि २ कावेबाज सभासदांच्या चेहर्‍यावर मात्र चिंता दिसुन आली. पुढच्या महिन्यापासुन चौकीदार बदलायचाच असा ठराव सोसायटीने बहुमताने मंजुर केला आणि नेमका त्याच रात्री सफेद दाढीवाल्या चौकीदाराने एक चोर पकडुन दिला. सगळी बिल्डिंग खुश झाली. आम्ही विचारलं, "बाबा, कशावरुन हा चोर आहे..? सी.सी.टी.वी. आहेत तर फुटेज तरी दाखव.." तर लगेच सेक्रेटरी कडाडाले - "तुम्ही चौकीदारावर संशय घेताय..? असे असेल तर सोडा बिल्डिंग आणि जा त्या शेजारच्या बिल्डिंगमधे रहायला..!" त्या भितीने इतर सभासद काही बोललेच नाहीत.

आता मात्र मोठा प्रश्न पडलाय - आता काय करायचं..?? हा सफेद दाढीवाला चौकीदार जर बदलला नाही तर काही दिवसांनी या बिल्डिंगमधे रहाणं मुश्कील होईल.. आपल्या कष्टाची कमाई डोळ्यांदेखत चोरी होताना पहावे लागेल.. आपल्या सग्या-सोयर्‍यांचे डोळ्यांदेखत मुडदे पाडले जातील आणि सेक्रेटरी-खजीनदार-सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणारे २ कावेबाज सभासद मात्र स्वतःची संपत्ती/कातडी वाचवुन आपल्यावर असाच अन्याय करत रहातील..!

असो.. पुढच्या पंधरवड्यात मिटिंग आहे. चौकीदार बदलणं अजुनही आपल्या हातात आहे हे बिल्डिंग मधील लोकांना समजेल हीच आशा..!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

<< अहो ७० वर्षांपुरवीच्या चौकिदाराला तुमचा सद्ध्याचा चौकीदार सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार धरतो त्याकडे तुम्ही कोणत्या चष्म्यातुन बघता? >>
------ पंतप्रधान हा पंतप्रधानच असतो... ते प्रधान सेवक, चौकीदार शद्ब म्हणजे अकलेचे दिवाळे आहे आणि लोकांना बनवा-बनवी साठी किंवा श्रोत्यांच्या टाळ्या मिळवण्यासाठी ठिक आहे. पण मागच्या सर्वच पंतप्रधानांना तो शब्द लावणे म्हणजे त्यांच्या थोर कार्याचा अपमान आहे. चौकीदार हा पंतप्रधानाला समानार्थी शब्द नाही आहे.

मोदी यांच्याच काळात, प्रशासनावर त्यांची पोलादी पकड असतांना ललित मोदी, विजय माल्या, चोक्सी, निरव मोदी पळाले. त्यांना पळवण्यात मदत झाली. अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे मस्त थंड आहेतच. खरा चौकीदार हा मालमत्तेचे रक्षण करतो... त्यामुळे हे "खरे चौकीदार" पण नाही आहेत. Sad

वर कुणी म्हटले या गोष्टी जनतेला माहित नसतील पण रॉ ला माहित होत्या... पण वृत्तपत्राला बातम्या लिक झाल्या. हास्यास्पद युक्तीवाद आहे. >>>

तुम्हाला हास्यास्पद वाटणारच , त्यात नवल नाही..

इम्रान खानने बाजी मारली >>

तुम्हाला तसे वाटणारच , नवल नाही.

आम्हाला तर एव्हढंच माहिती आहे की मोदी देशाच्या दुश्मनांना शुभेच्छा देतात आणि काही घातपात झाला की त्यांची व्यवस्थित मारूनही ठेवतात.

<< आम्हाला तर एव्हढंच माहिती आहे की मोदी देशाच्या दुश्मनांना शुभेच्छा देतात आणि काही घातपात झाला की त्यांची व्यवस्थित मारूनही ठेवतात.>>
----- तुम्हाला तसे वाटणारच, नवल नाही.

पुलवामा सारख्या घटना सहज टाळता येणारी होती. राज्यात एव्हढा मोठा कडेकोट बंदोबस्त असताना ३०० किलो स्फोटके आली कुठून ? जवानांचा भला मोठा ताफा जाणार्‍या मार्गाची तसेच त्या वेळेची खडान खडा माहिती जैश ला मिळाली कशी, कुणी पुरवली?
पुलवामा सारख्या घटनेची गंभिरता न समजता, वर जनतेचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी बालकोट करत असतील तर आणि तो आनंद हा क्षणिक आहे.

३०० किलो स्फोटके पाक मधुन भारतात आणली गेली आहेत हे रॉ आणि गुप्तचरांना माहित होते पण स्फोट झाल्यामुळे बातमी आधीच लिक झाली अशी भलामण वाचायची पण तयारी ठेवली आहे.

पुलवामा सारख्या घटना सहज टाळता येणारी होती. राज्यात एव्हढा मोठा कडेकोट बंदोबस्त असताना ३०० किलो स्फोटके आली कुठून
ते शोधायला थोडा वेळ लागेल . कोणाचा तरी हलगर्जीपामुळे स्फोटक काश्मीर मध्ये आली हे सत्य आहे पण सरकारनी तोंडी आदेश देवून ती येवू दिली हा जो टीकेचं सुर आहे तो चुकीचा आहे

"प्रधान मंत्रीजी आप मुझे बताईये, सारा कम्युनिकेशन भारत सरकार के हात मे है, आप कोई भी फोन टॅप कर सकते हो, आप् ने अभीतक क्या किया? अभीभी घुसपेटी भारत के अंदर कसे आते है ? कितने आतण्कवादीयोंको आपने विदेशसे भारत लाया?
आतंकवादीयोंके पास बाहर से गन आता है, गोला बारूद आता है, हवाला के माध्यमसे पैसा आता है, पैसा बँको के माध्यमसे आता है, प्रधान मंत्री, आप ईतनी निगरानी नही रख सकते? ये राज्योंका विषय नही है.. ये आपका विषय है.. काय किया है आपने ?"

नरेंद्र मोदींनी २०१२ मध्ये मनमोहन सिंगांना भाषणात विचारलेले हे काही प्रश्न.
(https://www.youtube.com/watch?v=SZQwy91riOo&t=737s २०:०० ते २३:००)

<< कोणाचा तरी हलगर्जीपामुळे स्फोटक काश्मीर मध्ये आली हे सत्य आहे पण सरकारनी तोंडी आदेश देवून ती येवू दिली हा जो टीकेचं सुर आहे तो चुकीचा आहे >>.
-------- सरकारने तोंडी आदेश दिला असे कोण म्हणाले? मी असे म्हटले नाही, सुचवले पण नाही.

टोकाचा हलगर्जी केली म्हणुन टिका होणारच, आणि तशी टिका होण्यात चुकीचे काहीच नाही. हल्ल्याची कसुन चौकशी करायला प्राधान्य देणे अपेक्षित होते तसे न करता बालकोट मधे धुळ उडवली... अर्थात त्या घुळीने देशांतर्गत जनतेची दिशाभूल करण्यात यश मिळाले असले तरी देश आधी होता त्यापेक्षा अधिक सुरक्षित झाला असे कोणी म्हणणार नाही.

जवानांचा भला मोठा ताफा जाणार्‍या मार्गाची तसेच त्या वेळेची खडान खडा माहिती जैश ला मिळाली कशी, कुणी पुरवली? >>> उदय, एवढा मोठा ताफा लपवून कसा नेणार? मार्गा लगतच्या गावांमधल्या लोकांना नेहमीच दिसत असेल की. उरला प्रश्न हा की तो ताफा जाताना रहदारी बंद का नाही ठेवली? नजिकच्या राहिवाश्यांसाठीच ती रहदारी चालू करावी लागली होती. ह्या दहशतवादी हल्ल्यानंतर ती बंद केली गेल्यावर लगेच आर्मीची वाहने जायच्या वेळेस रहदारी बंद केल्यामुळे कश्मिरींची हाल होत असतानाचे व्हिडिओ वायरल झाले.

आता मध्यंतरी वाचलं की सुट्टीवरून कामावर रुजू होणाऱ्या जवानांसाठी एअरलिफ्टची सोय करण्यात आली आहे. पण बाकी आर्मीची प्रत्येक हालचाल रस्त्यावरूनच होणार ना?

--=-=-=-=-
ही स्फोटके आली कशी आणि कुठून हे शोधले जातच असेल/गेले असेल. LoC porous आहे. LoC पार करण्याजोगे काही ठिकाणी नद्यांवर खूप जुने पुराणे निर्मनुष्य ब्रीज आहेत (एकसंध भारताच्या काही खुणा). जंगलांतूनही अनेक वाटा असतीलच. म्हणूनच तर भर हिवाळ्यात कार्गिलमध्ये घुसखोरी झाली होती.

<<ही स्फोटके आली कशी आणि कुठून हे शोधले जातच असेल/गेले असेल. >>
----- प्राधान्य मिळायला हवे होते...

<< LoC porous आहे. LoC पार करण्याजोगे काही ठिकाणी नद्यांवर खूप जुने पुराणे निर्मनुष्य ब्रीज आहेत (एकसंध भारताच्या काही खुणा). जंगलांतूनही अनेक वाटा असतीलच. >>
------ अश्विनी के वर ब्लॅककॅट यांनी एक लिंक दिली आहे... चित्रफित अभ्यासण्यासारखी आहे, २०.०० ते २३:००
https://www.youtube.com/watch?v=SZQwy91riOo&t=737s

Loc hi अत्यंत दुर्गम भागात आहे असे map वर सुधा दिसतंय .
त्यामुळे घुसखोरी वर पूर्ण नियंत्रण ठेवता येत नसेल .

एक प्रश्न नेहमी पडतो जेव्हा आपण पाकिस्तानचा पूर्ण पराभव केला होता पाकिस्तानचे 90000 सैन्य शरण आले होते aivdi अनुकूल परिस्थिती असून सुद्धा pok मधून पाकिस्तान ल बाहेर का नाही हाकले .
पूर्ण काश्मीर भारताने ताब्यात का नाही घेतला

उदय, बघितला तेवढा भाग. तुम्ही मला राजकारणाच्या गप्पांमध्ये खेचू नका Lol . असे व्हिडिओ दोन्ही बाजूंनी व विरोधात शोधाल तितके सापडतील Happy . असो ... पुलवामा धाग्यावर जेव्हा पुलवामा सोडून हळूच नेहमीची राजकीय चिखलफेक सुरू झालेली दिसली तेव्हा मी लिहिणं बंद केलं. कुणीही सत्तेवर असलं तरी माझं प्राधान्य देशाला होतं, आहे आणि असेल. माझा नेहमीच भारत सरकारला पाठिंबा असेल. मुंबई हल्ल्याच्या वेळी अनेक दिवस प्रचंड मनस्ताप चिडचिड झाली तरी भारत सरकारने पलटवार न करता नुसती डिप्लोमसी वापरायची ठरवली ते ही माझ्या सरकारचा निर्णय म्हणून मान्य केले. अनेक हल्ले झाल्यावर एकदा बालाकोट घडवण्याच्या माझ्या सरकारच्या निर्णयालाही माझा पाठिंबाच.

<< कुणीही सत्तेवर असलं तरी माझं प्राधान्य देशाला होतं, आहे आणि असेल. >>
------- मला माहित आहे आणि त्याबद्दल नितांत आदर आहे...

<<मुंबई हल्ल्याच्या वेळी अनेक दिवस प्रचंड मनस्ताप चिडचिड झाली तरी भारत सरकारने पलटवार न करता नुसती डिप्लोमसी वापरायची ठरवली ते ही माझ्या सरकारचा निर्णय म्हणून मान्य केले. अनेक हल्ले झाल्यावर एकदा बालाकोट घडवण्याच्या माझ्या सरकारच्या निर्णयालाही माझा पाठिंबाच. >>
-------- सहमत. दोन्ही वेळेचा प्रतिसाद वेगळा होता... असे हल्लेच न होणे, किंवा ते होण्याच्या अगोदरच त्यांना निस्तेज करणे हे बघायला आवडेल.

चौकीदार स्वतःच्या सोसायटीत कमी आणि आजूबाजूच्या सोसायटीत जास्त फेऱ्या मारतो हा मुद्दा अजून कोणी उचलला कसा नाही

असे हल्लेच न होणे, किंवा ते होण्याच्या अगोदरच त्यांना निस्तेज करणे हे बघायला आवडेल. >>>

मग विविध राज्यांतील ATS ने घातपात घडविण्या आधी दहशतवाद्यांना अटक केल्या त्या तुमच्या मते फार्स असतील.

"He said that he did not change his name to Chowkidar Subramanian Swamy on Twitter because he is a Brahmin and hence, cannot be a Chowkidar. The video clip is now going viral on social media.

"I cannot become a Chowkidar because I am Brahmin. Brahmins can't be chowkidars. It's a fact. I will give orders that the Chowkidars have to execute. That's what everyone expects from the appointed Chowkidars. So, I cannot be one," Subramanian Swamy said."
https://www.indiatoday.in/elections/lok-sabha-2019/story/cannot-be-chowk...

मी कोणत्याच पक्षाच्या सरकारला दोष देत नाही .
पण आपल्या प्रशासकीय व्यवस्थेत आमूलाग्र बदल केला पाहिजे
सर्वच सरकारी प्रशासकीय व्यवस्था सुस्त आहे आणि कोणतीच जबाबदारी योग्य रीत्या सांभाळत नाही .
त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे .
नोकरीची शास्वती हा नियम बदलणे गरजेचे आहे chukila माफी नाही असेच सरकारी निर्णय असावेत

चायवाला पाँच साल में चौकीदार बन गया
चौकीदार एक हफ्ते में सेल्समन बन गया

अहो किती हळहळताय आणि इतक्यातच?

तुमच्यासाठी म्हणूम सांगतो

भाजप ला जेमतेम 160 जागा मिळणार आहेत आणि सुमारे तेवढ्याच काँग्रेसला

भाजप ला जेमतेम 160 जागा मिळणार आहेत आणि सुमारे तेवढ्याच काँग्रेसला>> म्हणजे सद्ध्याचा चौकीदार १००% बदलला जाणार म्हणताय की काय..??

200 टक्के

चौकीदार बदलणारा मी एकटा कोण.. ते तर सोसायटी मेंबर्स ठरवतील...!

बादवे, तुम्ही का उगा टेंशन घेताय... एकतर स्वत: विचार करुन लिहा नाही तर मग समोर येईल ते वाचा.. उगीच हे काय लोंबतय ते काय लोंबतंय विचारु नका.. Proud

काल चार अमेरिकन चिनूक हेलिकॉप्टर्स भारतीय वायुसेनेत सामिल झाली. भाजपा सरकारने २०१५ मधे, १५ चिनूक हेलिकॉप्टर्स घेण्याचा करार अमेरिकी सरकारशी केल्यानंतर अवघ्या तीन वर्षात ही चार हेलिकॉप्टर्स भारतीय सेनेला मिळाली देखील.

या जागी जर घोटाळेबाज व भ्रष्टाचारी कॉंग्रेस सरकार असते तर ऑगस्टा वेस्टलॅंड चॉपर घोटाळ्यासारखा ह्या हेलिकॉप्टर्स खरेदीत देखील घोटाळा करुन ही हेलिकॉप्टर्स भारतीय वायुसेनेला मिळायला आणखी कित्येक वर्षे लावली असती.

पहिल्यांदाच भारतीय सेनेला काहीतरी मिळाल्याबद्दल अभिनंदन. आजवर भारतीय सेना तीर कमठ्याने लढत होती व बैलगाडीवरुन प्रवास करत होती. नमोनमो.

Pages