चौकीदार

Submitted by DJ. on 19 March, 2019 - 05:38

चौकीदार

आमच्या बिल्डिंगचा आधीचा चौकीदार फार सज्जन माणुस. कोणाला काहीही बोलायचा नाही. त्याचं काम तो इमाने-इतबारे करायचा पण त्याच्या वागण्या-बोलण्यात धम्मक नसायची. आपल्या सोसायटीला कसा वागण्या-बोलण्यात वाकब्गार असलेला चौकीदार पाहिजे म्हणुन एक-दोन सभासद उगाच त्या चौकीदाराची निंदा-नालस्ती करु लागले. ते दोन सभासद हे सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळाणार्‍या कावेबाज संघटनेचे..! तिथे जी-जी शिकवण मिळेल त्याबरहुकुम वागणारे. झालं..! त्यांच्या कुजबुजीमुळे सोसायटीच्या इतर सभासदांना देखील आहे तो चौकीदार कमालीचा अकर्यक्षम वाटु लागला. चौकीदार कसा हवा - "एकदम तडफदार..!!" असंच सगळ्यांचं मत झालं.

इकडे त्या सार्वजनीक बागेतल्या कोपर्‍यात लाठ्या-काठ्या खेळाणार्‍या कावेबाज बुढाऊंनी त्यांच्याच संघटनेतल्या एका सफेद दाढीवाल्या चौकीदारास कामावर ठेवावे म्हणुन सोसायटी मिटिंगमधे सांगितले. त्याची खुप भलामण केली. त्याने तिकडे दुसर्‍या छोट्या सोसायटीत कशी चकाचौंद कामगिरी केली याचे फोटोशॉप विडीओ दाखवले. सफेद दाढीवाल्या चौकीदाराचे तडफदार वागणे-बोलणे पाहुन सर्वजण आश्चर्यचकीत झाले. लगोलग त्याला सोसायटी मधे भेटण्यास बोलवण्यात आले. "१०० दिवसात तुमच्या सोसायटीला कसा नावलौकीक प्राप्त करुन देतो ते बघा" असे वचन देऊन त्याने सर्वांच्या मनावर अक्षरश: गारुड घातले. सोसायटी मेंबर्सने मिटिंग बोलवुन आपला जुना-जाणता चौकीदार अत्यंत स्लो आहे असा ठराव पास करुन त्याला कामावरुन काढुन टाकले. जाता-जाता जुना-जाणता चौकीदार म्हणुन गेला "माझ्या कामाची आठवण तुम्हाला भविष्यात येईल..!"

सफेद दाढीवाला नवा चौकीदार कामावर रुजु झाला. नवीन-नवीन होता तोवर काही दिवस तो सर्व सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकायचा. बरे वाटायचे. कोणीही सभासद गाडी घेऊन आला की लगेच गेट उघडायचा. आम्हाला खुप कौतुक वाटायचे. त्याची सफेद दाढी, कडक इस्त्रीचा पोषाख आणि खणखणीत आवाजातले बोलणे ऐकुन हा पहिल्यापेक्षा १०० पटींनी चांगला चौकीदार आहे असे वाटायचे. असे थोडे दिवस गेले आणि मग नंतर-नंतर त्याने सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकणे बंद केले. गाडी घेऊन आल्यावर हॉर्न वाजवुनही तो गेट उघडेनासा झाला. दिवसा-ढवळ्या झोपुन राहु लागला. मग मात्र आम्ही त्याला हटकलं तर म्हणे "आधीचाही चौकीदार झोपायचा..! त्याला बरं कधी हटकलं नाहीत..??"

एक दिवस व्हायचं तेच झालं..! बिल्डिंग मधे चोरी झाली. याचा जाब विचारायला गेलो तर म्हणे "आधीच्या चौकीदाराच्या साथीदारांनी चोरी केली आसेल.. त्यालाच विचारा..!" बघता-बघता चोर्‍या वाढु लागल्या. रात्री-बेरात्रीच नव्हे तर दिवसाही चोर चोरी करुन पैशांच्या बॅगा भर-भरुन सोसायटीच्या बाहेर पडु लागले. सभासदांकडे येणार्‍या नातेवाईकांचे खुनही पडु लागले. त्यास खडसावायला गेल्यावर त्याने त्याचे नेहमीचे भसाड्या आवाजातले बोलणे बाणेदारपणे ऐकवले. म्हणाला - "जेव्हा ७० वर्षांपुर्वी ही बिल्डिंग बांधली तेव्हा जो चौकीदार इथे होता त्याच्या चुकीमुळे हे सर्व आता भोगावे लागत आहे. त्या पहिल्या चौकीदाराने चोरांवर धाकच नाही ठेवला त्याला मी तरी काय करणार..? सर्व चूक त्याचीच नव्हे काय..??"

त्यानंतर होणार्‍या चोर्‍यांवर आणि पडणार्‍या मुडद्यांवर आम्ही लक्ष ठेवले तेव्हा लक्षात आले की चोर्‍या फक्त आमच्यासारख्या सामान्य सभासदांच्याच घरी होताहेत. मुडदे देखिल आमच्याच नातलगांचे पडताहेत. सोसायटीचे सेक्रेटरी आणि खजीनदार आपल्याकडुन ज्या चोर्‍या-मार्‍या होताहेत त्याकडे काणाडोळा करण्यासाठी या नव्या चौकीदाराला लाच देत आहेत - त्यांच्या घरी तसेच ज्यांच्यामुळे हा नवा चौकीदार सोसायटीत आला त्या सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणार्‍या - २ कावेबाज सभासदांच्या घरी मात्र चोर्‍या होत नाहीयेत. त्यांच्याकडे येणार्‍या नातलगांचेही खुन पडत नाहित. हा नवा चौकीदार फक्त सेक्रेटरी-खजीनदार-कावेबाज सभासदांच्या घराचीच सुरक्षा करतोय हे लक्षात आल्यावर मात्र आम्हाला जुन्या चौकीदाराची आठवण आली. काहीही न बोलता देखील त्याने त्याचे काम नेहमीच चोखपणे केले होते. त्याला निकम्मा ठरवणार्‍या त्या कावेबाज सभासदांचे ऐकुन सोसायटीने मोठी चूक केली हे लक्षात आले.

उशिरा का होईना पण वेळेत चूक लक्षात आली म्हणुन लगोलग मिटिंग बोलवुन हा सारा प्रकार सर्व सभासदांच्या लक्षात आणुन दिला. सेक्रेटरी-खजीनदार आणि २ कावेबाज सभासदांच्या चेहर्‍यावर मात्र चिंता दिसुन आली. पुढच्या महिन्यापासुन चौकीदार बदलायचाच असा ठराव सोसायटीने बहुमताने मंजुर केला आणि नेमका त्याच रात्री सफेद दाढीवाल्या चौकीदाराने एक चोर पकडुन दिला. सगळी बिल्डिंग खुश झाली. आम्ही विचारलं, "बाबा, कशावरुन हा चोर आहे..? सी.सी.टी.वी. आहेत तर फुटेज तरी दाखव.." तर लगेच सेक्रेटरी कडाडाले - "तुम्ही चौकीदारावर संशय घेताय..? असे असेल तर सोडा बिल्डिंग आणि जा त्या शेजारच्या बिल्डिंगमधे रहायला..!" त्या भितीने इतर सभासद काही बोललेच नाहीत.

आता मात्र मोठा प्रश्न पडलाय - आता काय करायचं..?? हा सफेद दाढीवाला चौकीदार जर बदलला नाही तर काही दिवसांनी या बिल्डिंगमधे रहाणं मुश्कील होईल.. आपल्या कष्टाची कमाई डोळ्यांदेखत चोरी होताना पहावे लागेल.. आपल्या सग्या-सोयर्‍यांचे डोळ्यांदेखत मुडदे पाडले जातील आणि सेक्रेटरी-खजीनदार-सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणारे २ कावेबाज सभासद मात्र स्वतःची संपत्ती/कातडी वाचवुन आपल्यावर असाच अन्याय करत रहातील..!

असो.. पुढच्या पंधरवड्यात मिटिंग आहे. चौकीदार बदलणं अजुनही आपल्या हातात आहे हे बिल्डिंग मधील लोकांना समजेल हीच आशा..!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

उद्योगपती,श्रीमंत लोक,आणि समाजातील प्रभावशाली लोकांची लॉबी >> त्यांनीच नवा चौकीदार आणला आहे. Proud

@DJ,

बेशरमपणाच्या फालतू जोकवर हसलात त्यावरून आठवलं.
मीरा नावाच्या आयडीने हा लेख फेसबुक वर बोक्याशेठ नावाच्या व्यक्तीने टाकलेला पहिला, तो लेख तुमच्या लेखाच्या आधी टाकला होता. त्यांनी तुम्हाला प्रश्न केलाय की तो बोक्याशेठ म्हणजे तुम्हीच काय म्हणून... त्यानंतर तुमचे 3 प्रतिसाद आलेत पण एकातही उत्तर नाही. म्हटलं आठवण करून द्यावी.

भाजप समर्थक आणि बेशरम >>>

मी केवळ एक साधा मोदिसमर्थक असल्यामुळे जास्त काही लिहीत नाही.

बेशरमपणाच्या अनेक पीएचडी केलेल्या कॉंग्रेसपुढे जगातील कुठलेही बेशरम फिके पडतील अस माझं मत आहे. शेवटी 70 वर्षाची लिगसी आहे. त्यांच्या समर्थकांबद्धल काय सांगावं? अडचणीचे प्रश्न आले की ते शेपूट पाठीला लावून इतक्या जोरात पळतात की उसेन बोल्ट सुध्दा त्यांच्यासमोर कासव वाटेल. बेशरमशिरोमणि राफुल गांधी तर दर दिवसाआड पत्रकार परिषदा बोलवून जे आरोप करतात आणि तथाकथित रिपोर्ट वा क्लिप्स ऐकवत असतात तेच रिपोर्ट आणि क्लिप्स संसदेत दाखवायला त्यांची फाटते. अर्थातच त्यापेक्षाही ग्रेट लोक इथे आहेत, जस मी आधी एका आयडीसमोर राफुल गांधीही किस झाड की पत्ती आहेत असं म्हटलेलं... अर्थात स्वतःच्या विनम्रपणामुळे तो आयडी तसे कबुल करणार नाही म्हणा.

Black cat, भाऊ, बाकीचे बिनपुराव्याचं राफेल राफेल असं ओरडत होते तेव्हा भाजपवले होमवर्क करत होते. भारतातील जवळजवळ 410 जागा अशा आहेत जिथे भाजपाला जिंकण्याच्या आशा आहेत नि जिथे बुथस्तरावर भाजपचा प्रचार सुरू आहे. बाकीच्या जागांवर शक्ती खर्च करण्यापेक्षा मित्रपक्षांना वाव द्यावा असे हे गणित आहे.

उद्योगपती,श्रीमंत लोक,आणि समाजातील प्रभावशाली लोकांची लॉबी
>> हे अर्धच वाक्य लिहलय मी तुमचा रिस्पॉन्स काय येतो ते baghayl मी पण तुमचा रिस्पॉन्स नेहमीप्रमाणे आला . हेटाळणी चा.
पूर्ण वाक्य असे आहे त्यासाठी पंतप्रधान हा strong , स्वतःच्या विचारावर ठाम असलेला आणि कोणाच्या प्रभावाखाली न येणारा असावा आणि असा ऐकच व्यक्ती आहे कोण ते तुम्ही ओळखा बघू

Rofl

मोदी , बिजेपी परत निवडून येऊ अथवा न येवो पण देशाचा आत्मसन्मान परत मिळालाय असे मला वाटते. व्यक्ती म्हणून मोदींना मर्यादा आहेतच, ते काय देव किंवा जादुगार नाहीत. जी अमेरिका व्हिसा द्यायला तयार नव्हती ती बॅकफूटवर आली. खरंतर मोदी भाजपचे एकमेव खांब आहेत ज्यावर तिचा तंबू उभा आहे. त्यांनी देशहितासाठी अनेक चांगले निर्णय घेतलेत. काही आडाखे चुकलेही असतील.
लोकशाहीत सत्ता मिळवून टिकवण्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागतात. आपल्या राज्यातील जे नेते सत्तेत सहभागी असुनही सतत मोदींना विरोध करत होते ते सत्तेसाठी किती लाचार आहेत हे लक्षात घ्या. असे अनेक केवळ मोदी लाटेवर स्वार होऊन एकत्र आले होते. सर्वच देशप्रेमी आहेत असेही नाही. मोदी घराणेशाही तून आलेले नाहीत.
So I support him. आम्ही भाजपचे भक्त तर कॉंग्रेसचे पाठिराखे काय अभक्त?

घरणेशाहीतून आले तर काय होते ?

राज ठाकरे व उद्धव ठाकरे , दोन्हीतले घरानेवाले कोण , नव्याने उभे राहिलेले कोण ?

भारतीय राज्यव्यवस्थेत घराणेशाही नाही. लोकांमधून निवडून यावे लागते. निवडलेल्या प्रतिनिधींकडून पंतप्रधान केले जाते. जो एकदा निवडून आला त्याला आजन्म सदस्यत्व मिळत नाही, त्याच्या घराला ते सदस्यत्व इनाम म्हणून घोषित होत नाही. म्हणूनच मोदी निवडून येऊ शकला. हे सर्व होऊ शकले कारण काँग्रेसने देशाला लोकशाही दिली म्हणून. मनुवाद्यांच्या, ब्राह्मणवाद्यांच्या, सरंजामवाद्यांच्या कलाने देश चालवला असता तर मोदी आजही कोण्या गावात तेल काढत आणि गल्ल्यांमधून फिरत आवाज देऊन तेल विकत फिरला असता.

परत चुकीचं उत्तर ,
पक्ष पातळीवर जी घराने शाही चालते त्या विषयी बोलतोय आपण पक्षप्रमुख जनता निवडून देत नाही
पक्षप्रमुख हुकूमशाही वृत्तीचा असेल तर आपल्या अधिकाराचा वापर करून दबाव टाकून कोणालाच पक्ष प्रमुख होऊन देत नाही तो विषय आहे ।
राष्ट्रवादी, काँग्रेस ,शिवसेना,राष्ट्रीय जनता दल, करुणा निधी ,जयललिता ,अशी खूप उदाहरण घराने शाहीची आहेत

पक्षांतर्गत लोकशाही असलीच पाहिजे असं तुम्हाला वाटतं नाही का.
Bjp हा असा राष्ट्रीय पक्ष आहे त्याचा पक्ष प्रमुख घराणे शाहिने नाहीतर लोकशाही मार्गाने निवडला जातो

Bjp हा असा राष्ट्रीय पक्ष आहे त्याचा पक्ष प्रमुख घराणे शाहिने नाहीतर लोकशाही मार्गाने निवडला जातो>> उचलबांगडी करुन का? Proud

भाजपमध्ये पक्षप्रमुखासाठी कधी निवडणूक झाली आणि कोण कोण उभे राहिले होते, कुणाला किती मते मिळाली त्याची माहिती मिळेल का?

WhatsApp Image 2019-03-23 at 14.56.45.jpeg

भाजप ला लोकशाही आवडते का? तिकडे दुसऱ्या धाग्यावर तर निरर्थक आहे म्हणून विव्हळत आहेत सगळे.

भाजप ला लोकशाही आवडते का? तिकडे दुसऱ्या धाग्यावर तर निरर्थक आहे म्हणून विव्हळत आहेत सगळे.

कायच्या काय लिहितात यार... लोकशाही निरर्थक आहे म्हणून कोणी लिहिलंय असं दाखव म्हटलं की हा माणूस पळ काढेल !

पक्षप्रमुख हा जनता निवडत नाही पक्ष निवडतो नरेंद्र मोदींना जनता निवडून द्यायची रीतसर मतदान करून .
जनतेच प्रेम होत त्यांच्या वर

मोदी 20 वर्षे गुजरातेत निवडून येत होते, तिथे लोकशाही नव्हती का ? >>>

म्हणजे मोदी हुकूमशहा नाहीत हे तुम्ही मान्य करता?

मोदींचा एकेरी उल्लेख करणारांची खालावलेली पातळी कळली. मोदींनी तेल विकून सन्मानाने पोट भरलेच असते पण मग आपण काय केले असते? या देशात समानता केवळ कॉंग्रेस मुळेच आली असा अभक्तांचा विश्र्वास आहे वाटतं.

Rofl

हे सर्व होऊ शकले कारण काँग्रेसने देशाला लोकशाही दिली म्हणून>>>>

धन्यवाद..... लोकशाहीच्या बुरख्याखाली राजेशाही.

अजून काय काय काँग्रेसने दिले ते इथे छापले तर बरे होईल.

पक्षप्रमुख हा जनता निवडत नाही पक्ष निवडतो नरेंद्र मोदींना जनता निवडून द्यायची रीतसर मतदान करून .
जनतेच प्रेम होत त्यांच्या वर

Proud

Pages