केसांना कोणता कलर लावावा?

Submitted by इंद्रा on 13 March, 2019 - 08:28

माझे केस पांढरे होत आहेत. डोक्याचा मध्यभागी जास्तच. मेहेंदी लावून झाली, पण पांढऱ्या केसांचे प्रमाण वाढत आहे.
त्वचा 'सेन्सिटिव्ह 'प्रकारात मोडते. एकदा कलर लावेल कि ने हमी लावावा लागेल हे माहित आहे.
आता पर्यत लॉरियल,मॅट्रिक्स, बी ब्लॅट ,गोदरेज , गार्नियर , हे सर्व केमिकल मिश्रित आहेत असे ऐकले आहे. खादी , बायो टेक , यांनी कलर
नीट होत नाही .
कृपया मार्गदर्शन करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अमा आणि मानव जी छान पोस्ट
आजकाल फोटो पोस्टिंग कल्चर मुळे सुंदर व तरूण दिसायचे भरपूर प्रेशर आहे. >> अगदी खरय हो>>>>>> +१.

किल्ली Proud
आता संपादनाची कालमर्यादा संपली असल्याने दुरूस्ती करता येणार नाही, पण तिथे मला तशी कोटी करायची नव्हती ती खरी चूक आहे असे नमूद करतो.

inoa hair color by loreal कोणी केला आहे का? केला असेल तर review टाका तसेच किती दिवसांनी करावा लागतो? Touch up? Washing care? Etc etc

Inoa बद्दल मागच्या पानावर मीरा यांची टिप्पणी आहे. कुठे मिळेल हा कलर. नायकावर शोधलं तर या नावाचा मास्क आहे केसांसाठी पण हा कलर नाही.

Pages