निर्णयांचा पाऊस

Submitted by Asu on 9 March, 2019 - 22:56

निर्णयांचा पाऊस

निवडणुकीचे ढग जमले
राजकारणी नभात
गडगडाट घुमतो घोषणांचा
सर्वत्र दशदिशात

‌ ‌‌ मृगाआधी पडतो पाऊस
गंधित वळवाचा
निवडणुकांआधी आणि
बंधित निर्णयांचा

वादळ उठले प्रचाराचे,
धूमधाम पक्षात
धूळधुरळा खूप उडाला
गेला गगनात

धूळ गेली डोळ्यात
झाले डोळे बंद
डोळे असून सगळे
झाले अंध-धुंद

काय करावे कुठे जावे
काही दिसेना
कोण मित्र, कोण शत्रू,
काही कळेना

अंधार सर्वत्र माजला
झाली अंदाधुंद
मतदार परि शहाणे
नसती मतिमंद

स्वार्थापोटी सगळे विसरले
आपला महाराष्ट्र
पक्षासाठी निवडून येण्या
झाले धृतराष्ट्र

‌ देवा पडू दे देशांगणी
पाऊस चांगला
नको ठरू दे,
निवडून येता चुनावी जुमला

शेतकऱ्यांची शेती
पिकू दे
कामकऱ्यांना काम
मिळू दे

जनता सर्व सुखी
होऊ दे
निवडणूक देवा आम्हां
एवढेच वरदान दे

- प्रा. अरूण सु. पाटील (असु)
(दि.07.03.2019)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults