तसलं काही नसतं

Submitted by जोतिराम on 25 February, 2019 - 23:53

कार्यालयाच्या पाठीमागे
सगळे व्यवहारात व्यस्त
अन रांगेमधल्या आम्हाला
सांगा "तसलं काही नसतं"

सगळंच झालय फार महाग
काय राहिलंय स्वस्त
तरीही सगळे आनंदात
हो त्यांचंच चाललंय मस्त
अन रांगेमधल्या आम्हाला
सांगा "तसलं काही नसतं"

शासक आमचे आरामात
त्यांनी पैसा केला फस्त
पोलीस धाडलेत वेशीबाहेर
गावात चोरांचीच गस्त
अन गावामधल्या आम्हाला
सांगा "तसलं काही नसतं"

सबसिडी आणि सापशिडी
आम्ही दोन्ही मध्ये कनिष्ठ
वरचे सगळे डाव खेळी
अन आमच्या पदरी कष्ट
का वाट बघणाऱ्या आम्हाला
सांगता? "तसलं काही नसतं"

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults