हेअर स्पा : गरज, फायदे आणि तोटे

Submitted by कच्चा लिम्बू on 24 February, 2019 - 11:11

माझे केस सध्या खूप गळतायत आणि विरळ झाले आहेत.
बऱ्याच जणांनी सांगितलं की हेअर स्पामुळे केस गळण्याचं प्रमाण कमी होतं. हे खरं आहे का?
पार्लर आणि माझा संबंध एरवी केस कापण्यापुरताच येत असल्याने मला अगदीच बाळबोध प्रश्न आहेत स्पा बद्दल
कृपया जाणकारांनी माहिती द्यावी.

प्र.१ हेअर स्पा म्हणजे नेमकं काय करतात?
२. ते करायला किती वेळ लागतो आणि अंदाजे खर्च किती येतो?
३. एकदा करून उपयोग होतो का? की frequently जावं लागतं?
४. हेअर स्पा साठी पुण्यात चांगली salons कुठली आहेत??
५. लॉंग टर्म मध्ये काही तोटे आहेत का?

अजून प्रश्न पडतील तशी लिस्ट अपडेट करत राहीन
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हेर स्पा नावाची ट्रिटमेंट असते बूटी पार्लरमध्ये. मोठ्या गोल मशिनीत डोकं घालून ठेवतात वगैरे. नियमित केली तर केस चांगले राहतात. थांबवली तर केस परत रूक्ष, राठ होतात.

चंपा नाही हो, व्यवस्थित निघता तेल पाण्यात शाम्पू कालवून लावला तर फक्त तेल आधीच मुरलेला असल्याने केस frizzy न dry नाही होत. तसेच तुम्हाला धुताना अंदाज येतोच तेल निघाले आहे की नाही ते so तुम्ही अजून थोडा शाम्पू न पाणी घेऊ शकता.

Pages