दावणीला तुझ्या __

Submitted by Kirti d tekale on 24 February, 2019 - 02:59

#गझल

गाय मी बांधली दावणीला तुझ्या __
ठेव सीमा जरा मागणीला तुझ्या __

जाहली पाखरे रक्तबंबाळ ती,
घाल आवर जरा गोफणीला तुझ्या __

आज साकारला शेर लाखातला,
धार चढली किती लेखणीला तुझ्या __

कर सखे तू जरा दुःख हलके तुझे,
भार होतो किती पापणीला तुझ्या __

वागला केवढा तू नितीने तरी,
दुःख आले कसे वाटणीला तुझ्या __

© सौ. किर्ती ज्ञानेश्वर टेकाळे

Group content visibility: 
Use group defaults